HomeArchiveपणती..

पणती..

Details
पणती..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विंग कमांडर मनीष मैंदरगी – भारतीय वायू सेना

दिवाळी पण काय जबरदस्त सण आहे!!!.. सगळ्या सणांचा बादशाह!! म्हणजे दिवाळीची  नुसती चाहूल जरी लागली तरी एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच उमेद जागृत होते.. त्या चार दिवसांत आणि त्याच्या आधीच्या चार दिवसात एक वेगळंच जग निर्माण होतं.. निदान आपल्या भारतात तरी!.. काहीही खास कारण नसताना उगीचंच खूप आनंद होतो.. खूप खुशी होते.. सगळं कसं छान वाटायला लागतं.. त्राशिक शेजारीसुद्धा प्रेमळ वाटायला लागतात.. इथं ऐपतीचा काहीही संबंध नसतो.. ऐपत असो किंवा नसो.. सगळे आपापल्या परीने जमेल तशी साजरी करतात.. फराळ, फटाके, नवीन कपडे, दागिने, भेटवस्तू या सगळ्याला एक वेगळाच दर्जा प्राप्त होतो.. एरव्ही वर्षभरात केलेल्या चकलीला किंवा बेसनाच्या लाडवाला इतकी किंमत नसते.. पण दिवाळीतली चकली म्हणजे काय औरंच!!!..

“यंदा चकली घरी केली आहे” हे सांगणाऱ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर ‘ऑस्कर’ मिळल्यासारखा भाव असतो.. याच्या अगदी उलट, “मी या वेळी बायकोला सांगितलं.. घरात अजिबात काही करू नकोस.. सगळा फराळ बाहेरून आणूया.. रिलॅक्स अँड एन्जॉय धिस दिवाळी” असं म्हणणारा नवरा ‘आदर्श नवरा’ या कॅटेगरीत नामांकन झाल्यासारखा खुश असतो.. पण एकंदरीत मज्जा असते..

पण, आमची दिवाळी जरा वेगळी असते.. म्हणजे काय आहे.. की तुम्हाला संतू आठवतोय का?.. संतू म्हणजे कर्नल संतोष महाडिक.. हा आमचा सैनिक स्कूलचा बॅचमेट.. म्हणजे अगदी चड्डी बड्डी.. तीन वर्षांपूर्वी दिवाळीच्या महिन्यातच अतिरेक्यांशी लढताना शहीद झाला.. शरीररूपी जरी तो इथं नसला तरी आम्हा मित्रांच्या मनात अजूनही जिवंत आहे.. तसाच!!!!.. त्याचं आपल्या युनिटच्या जवानांवर फार प्रेम होतं.. मग, आम्ही पण सगळ्यांनी ठरवलं की त्याच्या युनिटच्या जवानांना दर दिवाळीला मिठाई पाठवायची.. त्याची आठवण म्हणून!!!.. गेली तीन वर्षे आम्ही हे करतोय.. आणि खरं सांगू का? मूळ दिवाळीच्या उत्साहापेक्षा या गोष्टीचा उत्साह जास्त असतो..

यावेळीही तसंच होतं.. मी दिवाळीच्या एक दिवस अगोदर अडीचशे किलो मिठाईची ऑर्डर देऊन आलो होतो.. आज ती सगळी मिठाई पीकअप करायची होती.. फ्लाईंग करून घरी येईपर्यंत संध्याकाळ झाली होती.. माझ्या घरी जय्यत तयारी सुरू होती.. रांगोळी काढून झाली होती.. घराची लायटिंग झालेली होती.. माझी बायको आणि मुलगी पणत्या लावत बसल्या होत्या.. नेहमीप्रमाणे मी ऐनवेळी पोहोचलो होतो.. मी उगीचंच सगळ्या माळा नीट लागल्यात की नाही वगैरे तपासून बघितलं.. नेहमीप्रमाणे, “तू दिवाळीच्या तयारीला कधीही नसतोस” हा टोमणा बायकोने यावेळी मारला नाही.. मला हायसं वाटलं.. मुलगी माझी हट्ट धरून बसली होती की सगळ्या पणत्या तीच लावणार.. प्रत्येक पणतीला काडेपेटीतली एक काडी पेटवून ती पणत्या लावत होती.. बायकोची शिकवणी सुरू होती.. “अगं सय्यु, दर वेळी वेगळी काडी पेटवायची गरज नाही.. एक पणती लावली ना की मग त्याच पणतीने बाकी पणत्या पण  प्रज्वलित करता येतात आणि काम पण पटापट होतं”.. बायको  ‘प्रज्वलित’ वगैरेसारखे  अवघड मराठी शब्द वापरत होती..

मी तिथून सटकलो.. सरळ मिठाईच्या दुकानात गेलो.. आज सगळी मिठाई पीकअप करायची होती.. आणि उद्या ती श्रीनगरला पाठवायची होती.. दुकानाचा मालक ओळखीचा होता.. मिठाईचे बॉक्सेस तयार होते.. पटापट सगळी मिठाई माझ्या कारमध्ये लोड केली.. “सर, एक बात पुछूँ?”.. मालक म्हणाला. “हाँ पुछो”.. मी म्हटलं. “पिछले दो साल से देख रहा हूँ, आप यह इतनी बडी आर्डर देते हैं.. इतनी सारी मिठाई किसके लिए?”.. मालकानं विचारलं. “दरअसल हम यह मिठाई बॉर्डर पर भेजते हैं.. हमारे सोल्जर्स के लिए”.. मी सांगितलं. “क्या वो लोग दिवाली पर घर नही जाते सर?”.. मालकाच्या कपाळावर प्रश्नचिन्ह होतं.. “सगळे सैनिक बॉर्डर सोडून घरी दिवे लावायला गेले तर देशाचे दिवे लागतील”.. हे मी मनात म्हणालो.. “नही जाते.. और इसीलिए हम यह मिठाई उनको भेजते हैं, बस यह बताने के लिए की बाकी कोई करे या ना करे हम उन्हें याद करते हैं”.. मालक जरा विचारात पडला.. “सर, थोड़ा रूकिए.. मैं अभी आता हूँ”.. माझ्या होकाराची वाट न बघता तो आत गेला.. थोड्या वेळाने मिठाईचे आणखीन बॉक्सेस पॅक करून घेऊन आला.. “सर, यह पच्चास किलो मिठाई मेरी तरफ से.. हमारे जवानों के लिए”.. मालक म्हणाला.

मी जरा थबकलो.. “सर, प्लीज मना मत करना.. यह मत समझना की इसमें कोई बिज़नेस है.. हम तो बनिए हैं.. कई सारे बड़े ऑर्डर्स हमनें सप्लाई किए हैं.. पर इतना कीमती आर्डर?

पहली बार भेज रहा हूँ सर”.. मी ते सगळे बॉक्सेस कारमध्ये ठेवले.. कार स्टार्ट केली आणि घरी निघालो.. रस्त्यात सगळीकडे रोषणाई होती.. कारच्या काचेवर त्या चमकणाऱ्या दिव्यांचे प्रतिबिंब आणखीनंच मोहक दिसत होतं.. मी थोडासा भारावलेल्या अवस्थेत होतो.. एका पणतीने बाकीच्या सगळ्या पणत्या ‘प्रज्वलित’ करता येतात म्हणे.. ‘प्रज्वलित’.. काय अवघड शब्द आहे हा!!!!”
 
“विंग कमांडर मनीष मैंदरगी – भारतीय वायू सेना

Continue reading

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...
Skip to content