HomeArchiveभेसळखोरांना कायद्याचा इंगा...

भेसळखोरांना कायद्याचा इंगा दाखवाच!

Details
भेसळखोरांना कायद्याचा इंगा दाखवाच!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]

शुद्ध, सकस सध्या काहीच मिळत नाही असा एक समज दृढ झाला आहे. आणि तो खराही आहे. त्याला कारणीभूत आहे भेसळबाजांची दुनिया. हे भेसळबाज कशातही गोलमाल करू शकतात. पाणी मिसळून दूध वाढवणे याला प्रामाणिकपणा म्हणावा अशाप्रकारे आता दुधात भेसळ सुरू असते. आता तर रसायनिक पावडरपासून, साबणचुऱ्यापासून, अमोनिया वापरून दूध बनवतात. साबणचुराही डुप्लिकेट मिळतो आणि लोक तो सुट्टी सर्फ पावडर, वेष्टन नसलेला रिन सोप वा अन्य साबण म्हणून घरी घेऊन येतात. मग हाताला खाज सुटल्यावर, फोड आल्यावर, चट्टे प़डल्यावर कधीतरी जे असली वाटलं ते नकली होतं याची उमज येते. दूधच कशाला चहा पावडर पण नकली आणि मसाला पण नकली. हळदीतही रसायन आणि रंग. पावभाजी, सँडविचवाल्यांच्या स्टॉलवर, गाड्यांवर अमूल बटरचे खोकेच्या खोके दिसतात. अमूल बटरचा पॅक उघडून हे विक्रेते भसाभसा त्यातील बटर तव्यावर चुरचुरणाऱ्या भाजीवर टाकतात, सँडविचच्या ब्रेडला अगदी प्रेमाने फासतात. मस्त चटकदार मस्का पावभाजी आणि स्पेशल बटर सँडविच तयार. अनेक दुकानांत फ्रीजमध्ये अमूलचे नेहमीचे परिचयाचे वेष्टनबंद बटर खोके आणि अमूल बटरचा तो विशिष्ट मस्का पेपर गुंडाळलेले अर्धा किलोचे वेष्टनविना तुकडेही विकले जातात. ठाणे ग्रामीण पोलिसांनी घोडबंदर रोडवर नकली अमूल बटर बनवून एकदम अस्सल वाटणाऱ्या अमूलच्याच खोक्यात भरून विकणाऱ्या एका कारखान्यावर धाड टाकली. ते वाचत असताना लक्षात आलं की कदाचित दुकानात पाहिलेलं ते सुट्टं बटर असलंच असावं. पावभाजी आणि सँडविचवाले जे सढळ हस्ते वापरतात ते बटरही याच प्रकारातील असावं.

काही विक्रेते बटरऐवजी मार्गारिनही वापरतात. कलर तसाच आणि चवीत थोडासा फरक असला तरी तो भाजी वा चटणीच्या एकत्रित चवीत लपवता येतो. भेसळ कळत नाही. जसं लिंबू सरबतवाले साखरेऐवजी सॅकरिन वापरतात तसंच. दोन्हीही शरीराला घातकच. घोडबंदर मार्गावर काशीमीरा येथे नकली बटर बनवून अमूलसारखे पॅकिंग करून विकण्याचा गोरखधंदा जोरात सुरू होता. डालडा, दूध पावडर, बटर कलर, खारट चव येण्यासाठी मीठ असे वापरून हे बटर मनोज अग्रवाल यांच्या कारखान्यात बनवले जात होते. सहा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकातील सपोनि लहांगे आणि टीम, एफडीएचे अरविंद खडके यांनी ही भेसळ पकडली. अमूल बटरसाठी डालडा वापरतात आणि आईस्क्रीम बनवण्यासाठीही डालडा वापरतात. आईस्क्रीमचे थंडगार पाकीट बर्फ झटकून निरखून पाहिले तर कुठेही मिल्क प्रॉडक्ट शब्द आढळणार नाही पण बारीक अक्षरांत व्हेजीटेबल ऑईल लिहिलेले नक्की आढळते आणि हे व्हेजीटेबल ऑईल म्हणजेच डालडा. वनस्पती तूप. हेच वनस्पती तूप वापरून बनवलेले तूप हे गावठी तूप असल्याची लोणकढी ठेवून दिली जाते आणि ती अनेकांना पचतेही.

दूध, तूप, बटर, आईस्क्रीम, हळद, मसाले, चहा पावडर अशा रोजच्या खाण्यातील कितीतरी गोष्टींमध्ये बेमालूम भेसळ केली जात असते. हे रोगट खाणे आपण दररोज पोटात घालतो आणि पुढे आजारांना बळी पडतो. महागड्या औषधोपचारांचा खर्च करतो. काही महिन्यांपूर्वी ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘इझी मिल्क टेस्टिंग केमिकल किट’ तयार केले होते. दूध, तूपच नव्हे तर हळद, मसाले, चहा पावडर अशा अनेक जिन्नसांतील भेसळ या कीटमधील घटक वापरून ओळखता येणे शक्य आहे. दुधात सोडा मिसळतात, स्टार्च मिसळून दूध दाट करतात, पीठ टाकतात तसेच वनस्पती तुपातही घट्टपणा दिसण्यासाठी उकडलेल्या बटाट्याचा किस मिसळला जातो. कोल्हापूरचा प्रसिद्ध गुळही आता भेसळमुक्त, शुद्ध राहिलेला नाही. या गुळाच्या ढेपेला पिवळाधमक रंग येण्यासाठी अन्न सुरक्षा कायद्यानुसार ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा ५ ते १० पट अधिक सल्फर मिसळले जाते. सोडियम कार्बोनेट, मेटानिल यलो, झेएफएस, सोडीयम हायड्रोफॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट अशी अन्य रसायनेदेखील पिवळेपणासाठी बिनदिक्कत गुळात मिसळली जातात. कर्नाटक राज्यात तर गुळात साखर मिसळून गोडवा वाढवला जातो. मिठाईला लावली जाणारी चांदीही नकली असते. मधही आजकाल शुद्ध मिळत नाही. साखरेत खडूची भुकटी मिसळली जाते. चहात लाकडाचा भुसा, इतर झाडांच्या पानांचा चुरा मिसळतात, वापरलेली चहापावडर सुकवून पुन्हा मिसळतात. जिरे, मोहरीही शुद्ध मिळत नाही. अशी भेसळ अनेक ठिकाणी बिनदिक्कत सुरू असते. भेसळ प्रतिबंधक कायदा आहे. जन्मठेपेची शिक्षा पण आहे, पण भेसळखोरांना त्याची तमा नाही, धाक नाही. कायद्याची हवी तशी जरब नसल्यामुळेच लोकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ या दगाबाजांनी मांडला आहे. यांना कायद्याचा इंगा दाखवायलाच हवा. तरच जनतेच्या आरोग्याशी चाललेला हा निर्घृण खेळ बंद होईल.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content