HomeArchiveकाँग्रेस वाचवायला, प्रियांका...

काँग्रेस वाचवायला, प्रियांका आल्या!

Details
“काँग्रेस वाचवायला, प्रियांका आल्या!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
राजस्थानचे नवे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कालपर्यंत काँग्रेसचे संघटक महासचिव होते. काल त्यांनी आपले पक्षातील पद सोडून दिले. गाजलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा थेट पराभव त्यांनी राजस्थानमध्ये केला आणि ते मुख्यमंत्री बनले. त्यामुळे आता पक्षातील जबाबदारी त्यांनी सोडली. पण जाता जाता त्यांनी पक्षासाठी जे शेवटचे आदेश काढले ते ऐतिहासिक ठरले. त्यांच्या दोन आदेशांतील पहिला होता प्रियांका गांधी वाड्रा यांची नियुक्ती काँग्रेसच्या महासचिवपदावर करण्याचा आणि दुसरा होता मध्य प्रदेशातली एक महत्त्वाचे नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनाही महासचिवपदावर नेमण्याचा. हे दोन आदेश त्यांनी काढले. तिसरा आदेश राहुल गांधींनी काढला. त्यांनी गेहलोत यांच्या जागी के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्ती काँग्रेसचे महासचिव म्हणून केली. वेणुगोपाल कर्नाटक राज्याचे प्रभारीही असतील. या नेमणुकांच्या बरोबरीने राहुल गांधी यांनी आणखीही बरेच बदल अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या रचनेमध्ये केले आहेत. उत्तर प्रदेशाचे प्रभारी असणारे गुलाम नबी आझाद आता हरयाणा सांभाळणार आहेत. आपले नागपूरचे ज्येष्ठ काँग्रेस नेते अविनाश पांडेंकडे आता राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे. इत्यादी अनेक बदल संघटनेत झाले आहेत. पण या सर्व वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच सर्व समाजमाध्यमांनी डोक्यावर घेतलेला निर्णय ठरला आहे तो प्रियांका गांधी वाड्रा यांच्याकडे सोपवण्यात आलेली पक्षाची जबाबदारी, हाच!

सुहास्यवदना आणि बहुतेक वेळा सुती साडीमध्ये वावरणाऱ्या प्रियांका गांधी यांचे दिसणे, हसणे आणि बोलणे हे थेट इंदिरा गांधीसारखे आहे. पण आजीसारखे त्यांचे राजकीय वागणे आहे का, इंदिराजींप्रमाणे प्रियांका याही खमक्या राजकारणी आहेत का, हे मात्र अद्याप पुढे आलेले नाही. पण, त्यांचे जे काही मोजके जनसंपर्क झाले आहेत, काही टीव्ही चॅनेलवरून त्यांनी पूर्वी काही मते व्यक्त केली आहेत, त्यामधून प्रियंका या एक विचारी व हुषार व्यक्ती आहेत हे नक्कीच प्रकट झालेले आहे. प्रियंका गांधींकडून सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना याआधीच अशा थेट राजकीय प्रवेशाची अपेक्षा होती. प्रियांका लाओ देश बचाओ अशा घोषणा याआधीही काँग्रेस महाअधिवेशनांमध्ये देण्यात आल्या होत्या. या घोषणा 2014 च्या आधी होत होत्या हे उघड आहे. कारण तेव्हा देशात काँग्रेसची सत्ता होती. प्रियांका यांना सोनिया यांच्यानंतरचे स्थान पक्षात देण्यात यावे म्हणजे त्याच देशाचे नेतृत्त्व करतील अशा आशेने, अपेक्षेने काँग्रेस कार्यकर्ते त्या घोषणा देत असावेत. पण 2014 मधील पक्षाच्या दारूण पराभवानंतर मात्र, प्रियांका लाओ, पक्ष बचाओ, काँग्रेस बचाओ अशा प्रकारची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच दिसत होती.

काँग्रेस पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींकडे याआधीही बऱ्याचादा अशा मागण्या केल्या होत्या की, “प्रियांकाकडे पक्षातील एखादी मोठी जबाबदारी द्या, युवक आणि महिलांमध्ये त्यांच्याविषयीचे मोठे आकर्षण आहे. राहूल गांधींपेक्षाही त्या अधिक लोकप्रिय आहेत…”. पण जुन्याजाणत्या नेत्यांचे हे म्हणणे काही सोनिया गांधींनी मनावर घेतले नव्हते. त्याचे एक कारण त्यांना राहुल गांधींच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह नको असणार. दुसरे कारण, स्वतः प्रियांका यांची मानसिकता राजकारणात उडी घेण्याची नसावी. इतकी वर्षे स्वतः प्रियांका याच राजकारणात थेट उतरण्यासाठी नाखुष होत्या. पती रॉबर्ट वाड्रा, त्यांचा व्यवसाय, मुलगा व मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी यातच त्या गुंतलेल्या होत्या. त्यांचा ओढा जरी राजकारणाकडे होता व काँग्रेस पक्षाचे हित हे त्यांच्या डोळ्यापुढे सतत असावे, तरीही प्रियांका यापूर्वी कधीच राजकीय नेता म्हणून जनतेपुढे प्रकट झाल्या नव्हत्या. पण त्यांचा संबंध पक्षाबरोबर पडद्यामागच्या कालाकार म्हणून सततच होता.

देशभर फिरून प्रियांका जाहीर सभा जरी घेत नव्हत्या वा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत नव्हत्या. पण प्रियांका गांधी वाड्रा नेहमीच त्यांची आई सोनिया व भाऊ राहुल यांच्यासाठी पडेल ते काम करण्यासाठी, या दोघांच्या मदतीसाठी उभ्या असायच्या. 2004 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी राहुल गांधी प्रत्यक्षात निवडणुकीच्या राजकारणात उतरले. त्यांनी अमेथीमधून लोकसभेची निवडूक लढवली. त्याआधी 1998 मध्ये सोनिया गांधी यांनी रायबरेलीमधून खासदारकी घेतली. या दोघांच्याही मतदासंघांमधील कामांवर प्रियांका याच लक्ष ठेवून असायच्या. अमेथी व रायबरेलीमध्ये त्यांचे दौरे सतत होत असायचे. या मतदारसंघांतील जनतेच्या संपर्कात, नेत्यांच्या संपर्कात प्रियांका सतत राहिल्या होत्या. पण त्या स्वतः कधीच निवडणुकीच्या रिंगणात आतापर्यंत उतरल्या नाहीत. ना त्यांनी आतापर्यंत, म्हणजे वयाच्या 47 व्या वर्षापर्यंत, पक्षात एखादे पद घेतले. 2009 पासून त्यांचा काँग्रेस पक्षातील वावर जरी वाढला असला तरीही त्यांनी पक्षात पद घेतलेच नाही. पण त्यांचे लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर लक्ष होतेच.

2014 मध्ये काँग्रेसची वाताहत झाली. उत्तर प्रदेशात फक्त दोन जागा मिळाल्या. त्यातही त्या दोन्ही जागा गांधी कुटंबाच्या अमेथी व रायबरेली याच होत्या. बाकी सर्वत्र पक्षाचा घोर पराभवच झाला होता. तेव्हापासून प्रियांका यांना आणा व काँग्रेसला वाचवा असा घोषा जोरात सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशातील राजकारणात प्रियांका यांच्या या प्रवेशामुळे खळबळ नक्कीच उडणार आहे. पण त्या स्टार प्रचाराक म्हणून देशात सभा घेणार का, दौरे करणार का हा एक प्रश्न आहे. बहुधा नाही. कारण त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशातील तीस लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व भागात 2017 मधील विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्षाच्या हाती फारसे काही लागलेच नव्हते. पूर्व उत्तर प्रदेशातील शे-सव्वाशे विधानसभा जागांपैकी फक्त सात ठिकाणी काँग्रेसचे आमदार आले. तेही समाजवादी पक्षासोबत त्यांची युती होती तेव्हा. त्या निवडणुकीत राहुल यांनी अखिलेश यांच्यासोबत आघाडी केली पाहिजे याविषयीच्या बैठका प्रियांकांनी घडवल्या होत्या. हात व सायकलची आघाडी साकारण्यात एक शिल्पकार म्हणून त्याही होत्या. त्यावेळेचे काँग्रेसचे प्रमुख रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या मते प्रियांका या 2019 च्या निवडणुकीकडे फार अपेक्षेने पाहणार नाहीत. तीन वर्षांनंतर येणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढावी असे प्रयत्न करतील.

कोणत्याही नेत्याच्या फक्त आगमनाने निवडणुकीत विजय मिळू शकत नसतो. तिथे पक्षाची ताकदही उभी असावी लागते. नरेंद्र मोदींच्या मागे त्यांच्या पक्षाची तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची मोठी ताकद उभी होती. आजही आहे. काँग्रेसकडे नेते पुष्कळ आहेत. पण कार्यकर्ते नाहीत. ते उभे करण्याचे, जमा करण्याचेही काम प्रियांका उत्तर प्रदेशामधून सुरू करीत आहेत. त्यांना आताच पुढे का आणले असावे? याचे कारण आता राहुल गांधींचे नेतृत्त्व स्थिरावले आहे. राहुल निवडणुका हरतात म्हणून प्रियांकांना पुढे आणले असे आता म्हणता येणार नाही! तीन राज्यांतल्या विजयानंतर जनमानसात ते अधिक रुजले आहे असे काँग्रेसला जाणवले म्हणून आता प्रियांका गांधी वाड्रा पुढे आल्या आहेत. राहुल यांना पर्याय म्हणून प्रियांकाकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाहू नये अशीच इच्छा पक्षश्रेष्ठींची असणार. पण प्रियांकाच्या रूपाने एक दुसरे सत्ताकेंद्र पक्षात तयार होणार नाही असेही म्हणता येणार नाही!”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content