HomeArchiveभारतरत्न : अनाठायी...

भारतरत्न : अनाठायी वाद!

Details
भारतरत्न : अनाठायी वाद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी एक उत्सुकता असते ती कुणाला पद्म पुरस्कार देण्यात येणार याची. पोलीस पदके, सैन्यदलाच्या तीन्ही शाखांसाठीची शौर्य पदके आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात महतीन कामगिरी करणाऱ्यांसाठी पद्मश्री, प्रद्मभूषण आणि पद्मविभूषण असे नागरी सन्मान देण्यात येतात. यातील सर्वोच्च सन्मान असतो तो भारतरत्न. महाराष्ट्राला हा सन्मान तीन वेळा मिळाला असून त्यातील दोन रत्ने सध्या आपल्यात वावरतही आहेत. भीमसेन जोशींना 2009 मध्ये भारतरत्नने गौरवण्यात आले होते तर लतादीदींना 2001 मध्येच हा सन्मान मिळाला होता.

सर्वात लहान वयात हा मान मिळवणाऱ्या सचिन तेंडुलकरांच्या वेळीही काहींनी नसते वाद उभे केले होते. हॉकीपटू ध्यानचंद, धावपटू मिल्खा सिंह अशांना न मिळता भारतरत्न एका क्रिकेटपटूला का मिळावे असा काहींचा सवाल होता. पण तेंडुलकरांचे व्यक्तिमत्व नक्कीच या पुरस्काराला साजेसे रहिले आहे. एक गंभीर, मेहनती आणि खेळावर अपरिमित निष्ठा असणारे असे तेंडुलकर आहेत. क्रिकेटमधील प्रचंड पैसा व प्रसिद्धी त्यांच्या डोक्यात गेलेली नाही. ते वागण्या-बोलण्यात अतिशय साधे आहेत. ते नक्कीच त्या सन्मानाला पात्र आहेत.

भारतरत्न पुरस्काराबाबतीत वाद निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींकडे या पुरस्काराची शिफारस करायची असते. पण पं. नेहरूंनी पुरस्कार सुरू झाल्यांतर दुसऱ्याच वर्षी 1954 मध्ये स्वतःला पुरस्कार घेऊन टाकला. इंदिरा गांधीनीही 1971 मध्ये तेच केले. यंदा तीन-तीन पुरस्कार का दिले गेले यावरूनही वाद सुरू आहे. पण, हेही प्रथम घडलेले नाही. 1954 मध्ये प्रथम हे पुरस्कार दिले गेले त्यावेळेस सी. राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांना भारतरत्न देण्यात आले.

सुरूवातीच्या काळात दिवंगत नेत्यांना भारतरत्न देऊ नये असा संकेत होता. तो नंतर बदलला. 1992 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतरत्नवरूनही मोठा वाद उद्भवला होता. त्यांना भारतरत्न घोषित झाले खरे पण ते जिवंत आहेत की मृत याचा वाद रंगला. बोस कुटंबियांनी पुरस्कार घेण्याचे नाकारले. त्यामुळे नरसिंहराव सरकारला जाहीर झालेला पुरस्कार देता आला नाही. कालच्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला एकाचवेळी तीन महनीय व्यक्तींना हा सन्मान जाहीर झाला. संघाच्या मुशीत घडलेले ज्येष्ठ ऋषितुल्य नानाजी देशमुख आणि आसामी संगिताला भारतीय व जागतिक स्तरावर घेऊन गेलेले ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका या दोन दिवंगत महनीय व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला. तिसरे नावही तितकेच महान आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर झाला.

हे तीन्ही पुरस्कार म्हणजे नरेंद्र मोदींची व अमित शाहंची निवडणुकीची रणनीती आहे. आसाम, बंगालमधील मतदारांना सुखावणारे दोन तर संघाला सुखावणारे तिसरे नाव आहे अशी टीका सुरू झाली आहे. मुखर्जींच्या बाबतीत दुसरीही टीका होत असून ती अधिक बोचरी व त्याचवेळी अन्यायकारक आहे. प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय करकिर्दीविषयी जनतेत आदराचीच भावना आहे. काँग्रेसमधील तथाकथित हायकमांडच्या पूर्ण विश्वासातील ते नेते नव्हते आणि ते राष्ट्रपती पदावरून पायऊतार झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात गेले. यावरून काँग्रेस नेत्यांचा जळफळाट झाला. त्यामधूनच सध्याची टीका केली जाते आहे.

प्रणव मुखर्जींवर काँग्रेसने सतत अन्यायच केला. त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर पक्षाने करून घेतला नाही. कारण ते गांधी घराण्याला डोईजड ठरतील ही भीती होती. म्हणूनच काँग्रेसने त्यांना पंतप्रधानपदी येऊ दिलेच नाही. 2012 च्या मार्च-एप्रिलमध्ये देशाचे पुढचे राष्ट्रपती कोण असावेत याची चर्चा सुरू होती. काँग्रेसमध्ये डॉ. मनमोहन सिंह यांच्या नावाचाही विचार सुरू होता. जर सिंहसाहेबांची नेमणूक झाली असती तर पंतप्रधान व राष्ट्रपती ही दोन्ही घटनेतील सर्वोच्च पदे भुषवणारे भारताताली ते एकमेव नेते ठरले असते. स्वतः प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात त्याचा संदर्भ आला आहे. “सोनिया गांधींबरोबर त्या काळात जी वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली त्यामधून परतताना मला असे जाणवले होते की, त्या मनमोहन सिंह यांना राष्ट्रपती करण्याचा विचार करत आहेत”, असे प्रणवदांनी लिहून ठेवले आहे. तसे झाले असते तर पंतप्रधानपदी मुखर्जी येऊ शकले असते. पण त्यांच्या हाती देशाची कार्यकारी पदाची सूत्रे सोपवणे राहुल गांधींच्या राजकीय भवितव्यासाठी कदाचित ठीक ठरले नसते असे वाटून की काय, पण सोनिया यांनी त्यावेळी मनमोहन सिंह यांना पंतप्रधानपदी ठेवले व प्रणवदांची पाठवणी राष्ट्रपती भवनात करून टाकली.

राष्ट्रपती म्हणून प्रणवदांना दोन पंतप्रधानांसमेवत काम करता आले. पहिले अर्थातच डॉ. सिंह यांना ते वीस-पंचवीस वर्षे सहकारी म्हणून ओळखतच होते. दुसरे नरेंद्र मोदी. प्रणवदांना मोदींची ओळख दुरूनच होती. पण पंतप्रधानांच्या सल्ल्याने देशाचा कारभार हाकताना मुखर्जींना एका नव्या मोदींची ओळख झाली. त्यांनी राष्ट्रपतीपदावरून पायऊतार होताना जे भाषण संसदेत केले त्यात नमूद केले की, “मोदींबरोबर त्यांचे उत्तम संबंध होते. एक चांगली मैत्री प्रस्थापित झाली होती व राष्ट्रपती या नात्याने घटनेचे रक्षण करण्याच्या कामात मोदींचा सल्ला व सहकार्याचे योगदान मोठे होते!”

चंडितादास अमृतराव देशमुख अर्थात नानाजी देशमुख हे संघ व जनसंघाचे निष्ठावान नेते होते. ग्रामीण सुराज्य हा त्यांचा ध्यास होता. त्यांनी अनेक वर्षे जनसंघाचे कोषाध्यक्ष म्हणून तो पक्ष जगवण्याचे व वाढवण्याचे काम केले. त्यांची सहज मैत्री मुंबईतील जे.आर.डी टाटा, नसली वाडिया यांच्यासारख्या अनेक उद्योजकांबरोबर होती. त्यांच्याच प्रयत्नांमुळे जयप्रकाश नारायण इंदिरा गांधीविरोधी राष्ट्रीय मोहिमेत सहभागी झाले होते. या महान नेत्यांने जनता प्रयोगाच्या अखेरीस राजकारणातून संन्यास घेतला. वानप्रस्थाश्रम स्वीकारला. मध्य प्रदेशातील नर्मदेकाठच्या चित्रकूटमध्ये जाऊन ते राहिले. त्यांनी ग्रामीण भारत समृद्ध करण्याचे काम करणारे कायकर्ते घडवणारे ग्रामीण विद्यापीठ त्यांनी सुरू केले. त्यांचे ते काम फार मोठे व परिणामकारक ठरले. त्यांचा उचित गौरव भारतरत्न पुरस्काराने झाला आहे.

गरीब माणसाच्या वेदना संगितामधून जगापुढे मांडणारे गीतकार-संगीतकार-गायक म्हणून भूपेन हजारिका ख्यातकीर्त आहेत. त्यांना भारतरत्न मिळाल्यामुळे ईशान्य भारतातील अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. यंदा तीन महनीय व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पण याआधीही अनेकदा दोन वा तीन व्यक्तींना एकाचवर्षी भारतरत्न दिले आहेत. 1954 पासून ते आता 2019 पर्यंत ज्या 48 महनीय व्यक्तींना भारतरत्न देण्यात आले आहेत त्यात बहुतेक सर्व माजी पंतप्रधान व राष्ट्रपतींचा समावेश आहे. फक्त नरसिंह राव यांना काही काँग्रेसने भारतरत्न जाहीर केले नाही. तेही मुखर्जी यांच्याचप्रमाणे काँग्रेसच्या गांधी घराण्याच्या मर्जीतील नेते नव्हते. अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्न जाहीर करण्याचे काम मोदींनीच केले. काँग्रेस सरकारने दहा वर्षे ते टाळले होते. वाजपेयींसमवेत पंडित मदन मोहन मालवीय यांनाही भारतरत्न मरणोत्तर जाहीर करण्यात आले. त्याहीवेळी काँग्रेससह काही नेत्यांनी मालवीय यांच्या नावाला तीव्र हरकती घेतल्या होत्या.

काही अभारतीयांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. मदर तेरेसा यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले होते. त्यांना 1980 मध्ये भारतरत्न मिळाला. नेल्सन मंडेला आणि खान अब्दुल गफार खान हे दोघे परकीय नेते या पुरस्काराचे मानकरी ठरले. यातील सरहद्द गांधी गफार खान हे अखंड भारतातील म. गांधींचे सहकारी होते तर नेल्सन मंडेलांचा लढाही म. गांधींच्या प्ररणेतूनच सुरू झाला होता. भारताबरोबर या दोघाचेही नाते चांगलेच घट्ट होते. त्यांनाही हा पुरस्कार मिळाला. यंदाचे भारतरत्नही समर्थनीय आहेत.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content