Details
हाऊ इज द जोश.. आता व्हा सावधान!
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
तुफान जोश संचारलाय बालकोट परिसरात भारतीय हवाई दलाने केलेल्या बॉम्बहल्ल्याची बातमी ऐकल्यापासून. भारतीय हवाई दलाच्या बहाद्दरांचे अभिनंदन करताना देशभक्त सर्वसामान्य नागरिकांचा आनंद ओसंडून वाहतोय. त्यांना मानाचा मुजरा करायलाच हवा. आणि त्याचवेळी या हल्ल्याशी संबंध जोडून नमोस्तुतीचीही पारायणे सुरू झाली आहेत. बरोब्बर, तेराव्या दिवशी तेरावे घातले.., हा तर म्हणत होता पाकिस्तानच उडवा म्हणून…, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करारी बाण्यामुळेच हे घडून आलं, ५६ इंच छाती काय असते ते कळलं ना आता, मोदींपेक्षा मनमोहन सिंह खूपच चांगले होते.. असे कितीतरी मेसेजची फुलपाखरे मंगळवारी दिवसभर उडत होती. हे जे काही डोंगरे बालामृत सोशल मीडियावर दिवसभर सुरू होते ते पाहिल्यावर या वटवट्यांचे नेमके काय करावे तेच कळेनासे होते. विषय काय, आपण बोलतो काय, आपली पात्रता किती, कुवत किती.. कशाचाच पाचपोच आपण ठेवत नाही. याबद्दल नुकताच एक विनोद आला होता – पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला कसे खडसवून नामोहरम करावे याबद्दल मोदींना उद्देशून एक खरमरीत पोस्ट टाकणार होतो, तेवढ्यात बायकोने आवाज दिला, जरा दळण घेऊन या.. मग भानावर आलो की आपण आहोत कोण आणि करतोय काय? खरंच, असा विचार करायची वेळ या बालसेनेच्या बालिश बडबडीने आणली आहे.
बालिश बहु बडबडले.. असे म्हणून हा विषय संपत नाही, संपवूही नये. या हल्ल्याचे सर्व श्रेय भारतीय हवाई दलाच्या बहाद्दरांना द्यायच्याऐवजी, हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ आणि त्यांच्या टीमच्या नियोजनाला देण्याऐवजी मोदी, भारतीय जेम्स बाँड अजित डोवल यांची वाहवा हळूच सुरू झाली आणि त्याला दुपारनंतर निवडणुकांच्या प्रचाराचीही फोडणी देण्यात आली. मुळात हा विषय राजकीय वा श्रेयवादाचा नाही हे समजण्याइतकीही अक्कल सोशल मीडियावर गळे काढणाऱ्या पढतमुर्खांना नाही. यातील अर्ध्याअधिक मेसेजमागे बुद्धीमान अशी आयटी टीम आहे. कुठल्याही परिस्थितीत ५६ इंची छाती आणि भाजपाची भलामण करणे हे त्यांच्यावर सोपवलेले कामच आहे आणि ही टीम हे काम चोखपणे पार पाडते. त्यांच्यावर सोपवलेल्या कामाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते चूक नाही. पण याच टीमने सोडलेल्या उन्मादी मेसेजना पुढे पाठवून सोशल मीडियावर जो उतमात सुरू होतो तो एकूणच सर्वांच्या वैचारिक, किमान विचारक्षमतांचा ऱ्हास दर्शवणारा आहे. समाज म्हणून आपण किती नायकशरण किंवा नेतृत्त्वहतबल होतो त्याचे हे उदाहरण आहे. आपल्या देशाच्या सामर्थ्यावर, सैन्याच्या ताकदीवर, प्रतिकार क्षमतांवर आपला विश्वास नाही आणि नेते सांगतील तेच जणू घडते, तसाच हल्ला केला गेला, असेच हे बालबुद्धीचे भक्त या संदेशांमधून पसरवत आहेत. जणू काही मोदीच जाकिटांच्या खिशात बॉम्ब भरून गेले आणि टाकून आले, किंवा या बाळांना बालकोटपर्यंत मोदींनीच मार्ग दाखवला आणि मग त्यांनी एक-एक बॉम्ब विमानांतून खाली सोडले, इतकी प्रगाढ भक्ती या संदेशांमधून प्रतीत होत होती. खुद्द मोदी, डोवाल यांसारख्या जाणत्या नेत्यांनाही हे मान्य नसावे.
कारण विषय फार गंभीर होता. त्याला प्रत्युत्तरही तसेच कडवे द्यायला हवे होते. सतत कुरापती काढणाऱ्या, भारताला खिंडीत गाठू पाहणाऱ्या पाकिस्तानबाबत एकदाच काय तो अविचार करा, असे याच स्तंभात पुलवामा हल्ल्यानंतर लिहिले होते. बालकोट येथील हल्ला हा एक प्रकारचा अविचारच म्हणावा लागेल. कारण सर्जिकल स्ट्राईकसारखीच याची संभावना करावी लागेल. अशा प्रत्युत्तरांमुळे पाकिस्तान नेस्तनाबूद होणार नाही. उलट पाकिस्तानसारखा विखारी देश अधिकच फणा काढून भारताला डंख करण्याचे प्रयत्न सुरू ठेवणार आहे. हल्ला करायचाच होता तर तो फास्ट फूड खाल्ल्यासारखे न करता पाकिस्तानचा संपूर्ण घासच घ्यायला हवा होता. अविचार झाला तो असा हल्ला करून. अविचार करायचा तर तो पूर्ण करायला हवा होता, अशी जनभावना आहे. पाकिस्तान याचे उत्तर सरळपणे हल्ला करून देणार नाही हेही उघड आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले तसे जागा आणि वेळ ते निवडणार आहेत. ही जागा आणि वेळ पाकिस्तानच्या सोयीची आणि पाकिस्तानला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभी कऱणारी नसेल हे आपण समजायला हवे. पाकिस्तान येथेही एखाद्या भ्याडासारखा भारतावर प्रहार करण्यासाठी दहशतवाद्यांचाच उपयोग करणार हे नक्की. हे दहशतवादी काश्मीरमध्ये घातपात करतील किंवा मुंबई, दिल्ली वा अन्य कुठल्या ठिकाणी पोहोचून उद्रेक घडवतील हे सांगता येणे अशक्य आहे. आता गरज आहे ती या शक्यता लक्षात घेण्याची. अशा हल्ल्यासाठी तयारीत राहण्याची. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकत्र येण्याची. सोशल मीडियावर व अन्यत्र नमोचालिसा जपणाऱ्या उथळबुद्धीच्या लोकांच्या डोक्यात या गोष्टीही शिरायला हव्यात. एकाच नेत्याची पूजा करून वा वाहवा करून देशाचे संरक्षण होत नाही. तिथे प्रत्येकाच्या, आपल्या सर्वांच्याच देशाप्रती असलेल्या समर्पण भावनेचा, राष्ट्रभक्तीचा कस जात-धर्माच्या पलिकडे जाऊन लागणार आहे. आता आपल्याला तयार राहयचेय ते यासाठी!”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान