Details
`शिवनेर’कारांची पत्रकारिता!
01-Jul-2019
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
आज 20 मार्च. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांची 102वी जयंती. दि. 8 मे, 1954 रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर `शिवनेर’कारांनी साप्ताहिक `शिवनेर’ची स्थापना केली. आर्थिक पाठबळ नसताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी `शिवनेर’ सुरू केले. 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा `शिवनेर’कार ऐन तिशीत होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भाग घेतला होता. आवड म्हणून ते पत्रकारिता करत होते. विविध वर्तमानपत्रांतून त्यांचे लेख छापून येत होते. प्रबोधनकार ठाकरे यांना ते गुरूस्थानी मानत. साहजिकच फुले, शाहू, आंबेडकरांप्रमाणेच प्रबोधनकार ठाकरे यांचादेखील तरूण विश्वनाथरावांवर प्रभाव होता.
`शिवनेर’ची स्थापना कशी झाली, तो किस्सा मजेदार आहे. बाबांनी एक लेख कोठेतरी प्रसिद्धीसाठी पाठविला होता. मराठीतील जातीयवादी म्हणींवर बंदी घालावी, अशा आशयाचा तो लेख होता. उदा. `रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी’, `मांडीखाली आरी, चांभार पोरं मारी’, इत्यादी जातीवाचक म्हणींमुळे जातीयवाद वाढतो. तेव्हा कायद्यानेच या म्हणींवर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी त्या लेखात केली होती. पण तो लेख त्यांना साभार परत करण्यात आला. त्याचदिवशी बाबांनी ठरविले की, समाजाला आपल्याला काही सांगायचे असेल तर आपले स्वत:चे वर्तमानपत्र हवे. अशाप्रकारे `शिवनेर’ची स्थापना झाली. `शिवनेर’कारांनी हाडाची काडं करून `शिवनेर’ चालविला. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी `शिवनेर’ सुरू ठेवला.
पाच तपांच्या आपल्या पत्रकारितेत त्यांनी पित्त पत्रकारितेला सदैव विरोध केला. समोर आलेले मोहाचे क्षण सतत टाळले. यासंदर्भात एक किस्सा नमूद करण्यासारखा आहे. एकदा मुंबईचे महापौर बाबासाहेब वरळीकर यांचा `शिवनेर’कारांना फोन आला. ते म्हणाले, `आमचे वरळी कोळीवाड्यातील काही कोळी बांधव आपणांस भेटण्यासाठी येतील. त्यांना मदत करा.’ `शिवनेर’कारांनी वरळीकरांना होकार दिला. त्यानंतर रविवारी सायं. 4.00-5.00 च्या सुमारास पाच-सहा कोळी नागरीक घोडपदेव येथील आमच्या घरी आले. त्यांचे बाबांकडे काम काय होते? त्याचे असे झाले होते, ते कोळी बांधव वरळी कोळीवाड्यात हातभट्टीची दारू काढत. `शिवनेर’मध्ये त्या हातभट्टीची बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे पोलिसांनी त्यांचे अड्डे जमिनदोस्त केले होते. ते कोळी `शिवनेर’कारांना सांगू लागले, `आम्ही गरीब आहोत. तुमच्या बातमीमुळे आमच्यावर आणि आमच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. तुम्ही परवानगी देत असाल तरच पोलीस आम्हाला धंदा करू देतील.
शिवाय आम्ही चांगली दारू विकतो. आम्ही धंदा बंद केला तर बाहेरून विषारी दारू वरळी कोळीवाड्यात येईल. कृपा करून आमच्या पोटावर पाय ठेवू नका.’ बाबांना त्या कोळ्यांची दया आली. ते त्यांना म्हणाले, `मी तुमच्याविरुद्ध काही छापणार नाही. तुम्ही खुशाल धंदा करा.’ त्यावर सोन्याच्या अंगठ्या, चैन, बे्रसलेट अशा दागिन्यांनी मढलेल्या त्या कोळ्यांनी पिशवीतून नोटांच्या थप्प्या काढल्या. त्या बाबांसमोर टेबलावर ठेवल्या. ते बाबांना हात जोडून म्हणाले, `कृपा करून याचा स्वीकार करा.’ त्यावर `शिवनेर’कारांच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. त्यांनी बाबासाहेब वरळीकरांना फोन करून घडलेली घटना सांगितली. मी तुम्हाला विकाऊ वाटलो का? असे देखील विचारले. त्यावर वरळीकरांनी त्यांची समजूत काढली. आपल्या कोळी बांधवांना दमात घेतले आणि पैसे मुकाट्याने परत नेण्यास सांगितले. थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर बाबांनी त्या कोळ्यांना चहा देऊन त्यांचा निरोप घेतला.
असे मोहाचे क्षण बाबांच्या जीवनात अनेकदा आले. पण त्यांनी आपल्या हातांना कधी मोहरा लागू दिल्या नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कितीही मोठी अडचण असली तरी रात्री जेवल्यानंतर अंथरुणावर अंग टाकले की त्यांना शांत झोप लागत असे. उद्याचे उद्या पाहू! हे त्यांचे धोरण होते. अनेकदा जाहिरातीच्या बाबतीत `शिवनेर’वर अन्याय होताना त्यांनी पाहिले. पण ते संबंधितांवर कधी रागावले नाहीत. ते हसून म्हणत, `जो दे उसका भला, जो ना दे उसका भी भला।’ पुरोगामी पत्रकारितेचा वारसा आम्हाला बाबांकडूनच मिळाला. बाबांनी `शिवनेर’चा पहिला विशेषांक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काढला. तो त्यांना स्वत: नेऊन दिला. बाबासाहेबांनी त्यावेळी `शिवनेर’कारांना तोंड भरून आशीर्वाद दिले. आज जिवघेण्या स्पर्धेच्या काळातदेखील `शिवनेर’ स्वाभिमानाने उभा आहे, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरूषांच्या आशीर्वादांच्या बळावरच होय. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे यांच्या पवित्र स्मृतीस आमचे विनम्र अभिवादन!”
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर