Details
“काय पण करा.. पण, मतदान करा!”
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
लोकशाहीसाठी आग्रही, जागरूक, सजग असलेल्या नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य बजवावे यासाठी निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक यंत्रणा विविध उपायांनी, उपक्रमांनी जनजागरण करत आहे. काही ठिकाणी तर निवडणूक यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी पथनाट्यात सहभागी झाले, सायकल फेऱ्या काढल्या गेल्या. इतकेच काय तर मतदान झालेच पाहिजे म्हणून आपल्या पंतप्रधानांनी, वीर जवानांचे, पुलवामातील शहिदांच्या नावाने मतदान करण्याचे आवाहन करत काळजाला हात घातला. तुमचे पहिले मत आपले शूर सैनिक, पुलवामातील शहिद यांच्यासाठी द्या, मतदान करा, या त्यांच्या आवाहनावर निवडणूक आयोगाने म्हणूनच काही आक्षेप घेतलेला नाही. कारण, हे आवाहन मतदानाचा टक्का वाढावा याच उदात्त हेतूने केले गेले होते याची निवडणूक आयोगाला खात्री आहे. मोदींची तळमळ आयोग चांगलाच जाणून आहे.
आज गुरूवारी विदर्भातील सात आणि देशातील ८४ मतदारसंघात म्हणजे एकूण ९१ लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. आज अनेक भागात मतदानासाठी रांगा लागतील. ग्रामीण भागात उन्हाला न जुमानता गोरगरीब मतदानासाठी उभे राहातील. पण निमशहरी, नागरी भागात काय चित्र असेल ते सांगता येत नाही. राज्यात आणि देशात मोदी, मोदी असा गजर सुरू असल्याचे भासवण्यात येत आहे. एखादा राजकीय पक्ष बाजूला सारून निवडणूक व्यक्तीकेंद्रीत झाल्याचे हे अजब उदाहरण सध्या दिसते आहे. पण मोदीप्रेमी तरी किती संख्येने मतदानाला बाहेर पडतील याची शंका आपल्या देशातील मतदानाच्या यापूर्वीच्या टक्केवारीवरून येत आहे. आपल्याकडील मतदानाची सरासरी टक्केवारी नेहमीच ५५ ते ५९ टक्क्यांवर घुटमळत असते. शहरी भागातील मतदानाचा घटता टक्का याला कारणीभूत असतो. ज्या कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्यूटी आहे त्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सक्तीने थांबावे लागणार आहे. पण इतर शहरी मतदार त्यांचा मतदानाचा घटनादत्त अधिकार बजावतील का ही शंका प्रत्येक निवडणुकीला भेडसावत असते.
सरकार, लोकशाही, देशापुढील समस्या, प्रश्न यांबाबत पोटतिडिकेने बोलणारा नोकरदार, मध्यमवर्गीयांमध्ये मतदानाबद्दल अनाकलनीयरित्या उदासीन असल्याचे जाणवते. मतदारांना बाहेर काढावे लागते. यंदा काही लाख तरूण प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे या तरूणाईचा उत्साह दांडगा असेल. पण इतरांचे काय? हा मतदार मतदानासाठी बाहेर पडले की पाच दिवसांची रजा घेऊन परगावी पर्यटनासाठी परागंदा झाला असेल? मतदानाचे वेळापत्रक पाहिले तर मुंबई-ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर येथे मतदान २९ एप्रिलला होणार आहे. सिंधुदूर्ग-रत्नागिरी, रायगड येथे त्याआधी २३ एप्रिलला मतदान आहे. राज्यातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांत ११, १८, २३ आणि २९ एप्रिल अशा चार टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यापैकी पहिला टप्प्यातील मतदान आज विदर्भातील सात मतदारसंघात होत आहे. राज्यात एकूण 8,73,30,484 मतदार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरीकरण वाढल्यामुळे यंदा शहरी भागांत ११ हजार नवीन मतदान केंद्रे असतील. 2014 मध्ये लोकसभेसाठी राज्यात 62.24 टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक यंत्रणा जोमाने प्रयत्न करत आहे. पण मतदानाच्या दिवसांना विशेषत: १८ आणि २९ एप्रिलला जोडून आगेमागे सुट्ट्या आल्यामुळे हा टक्का कमी होण्याची धास्ती सर्वांनाच आहे.
मुंबई-ठाणे आणि शेजारच्या पालघर, भिवंडी, कल्याणमध्ये २९ एप्रिलला मतदान आहे. नेमक्या याच तारखेला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मतदान हा विषय अनेक घरांमध्ये मागे पडला आहे. हजारो मुंबईकर या सुट्ट्यांमध्ये बॅगा भरून बाहेर जाण्याच्या तयारीत आहेत. २७-२८ एप्रिलला चौथा शनिवार व रविवारची अनेकांना सुट्टी आहे. २९ एप्रिलला मतदानाची सुट्टी आणि ३० एप्रिलला एक रजा टाकली की १ मे रोजी पुन्हा सार्वजनिक सुट्टी आहे. यामुळे एरव्ही लोकशाही, मोदी चांगले-मोदी वाईट, सरकार फेल, राहुलची तयारी नाही, भाजपाला कठीण आहे यंदा, अशा विषयांवर हिरिरीने येताजाता मतांच्या पिंका सोशल मीडियावर आणि लोकलमध्ये वा सोसायटीतील समूह चर्चांमध्ये टाकणारी मंडळी मतदानाच्या दिवशी मुंबईत असतीलच याची खात्री देता येणार नाही. कारण, अनेकांनी सहलींचे आगाऊ आरक्षणही केले आहे. त्यात २७ आणि २८ एप्रिलला विवाहाचे मुहूर्त आहेत. अशा लग्नसोहळ्यांसाठी बाहेरगावी गेलेले कुणीही लगेच २९ एप्रिलला परतणे अवघड आहे.
शाळांना सुट्ट्या पडल्या की एसटी, रेल्वेगाडय़ांची आरक्षणे फुल्ल होत असतात. यंदाही तेच चित्र आहे. शाळांचे निकाल लागल्यावर कुटुंबकबिला घेऊन अनेकजण गावी किंवा पर्यटनाला निघत असतात. तेच यंदाही होणार आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांची त्यामुळे मतदारांना मतदानासाठी आणताना कसोटी लागणार आहे. या मतदानाच्या वेळापत्रकात प्रत्येक निवडणुकीला मतदानाच्या दिवसाला लागून सुट्ट्या हमखास येत असतात. हा पूर्वानुभव असताना आयोग याचप्रकारचे सदोष नियोजन का करते हा एक संशोधनाचा विषय आहे. लोकशाही टिकवण्यापेक्षा राजकीय पक्षांना आपापले सवतेसुभे आणि जहागिऱ्या टिकवणे महत्त्वाचे वाटते का? मतदानाचा टक्का कमीच राहवा, लोकांनी मोठ्या संख्येने मतदानाला येऊच नये, आपली सीट कायम राखावी यासाठीच सुट्ट्या आहेत हे माहित असूनही हेतूत: आयोगावर दबाव टाकून मतदानाचे असे सदोष नियोजन केले जाते का, या प्रश्नांची उत्तरे आता मिळायलाच हवीत. तरच मतदानाचा टक्का वाढू शकतो.”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान