Details
गुप्तचरांचे अपयश
01-Jul-2019
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
रविवारी इस्टर होता. जगभरातील ख्रिस्तांसह बंधू-भगिनी इस्टर साजरा करीत होते. नेमका हाच मोका साधून भारताच्या शेजारील श्रीलंकेच्या राजधानीत सकाळी एका पाठोपाठ एक असे सहा बॉम्बस्फोट घडविण्यात आले. त्यानंतर पाच तासांनी आणखी दोन बॉम्बस्फोट घडविले गेले. यातील तीन बॉम्बस्फोट चर्चमध्ये तर तीन बॉम्बस्फोट हॉटेलमध्ये झाले. पाच तासांनंतर झालेले दोन बॉम्बस्फोट कोलंबोच्या रस्त्यावर झाले. या क्रूर हत्याकांडात 200 लोक ठार तर 500 हून अधिक जखमी झाले. मे 2009 मध्ये लिट्टेचा दहशतवाद संपविण्यात श्रीलंकन सरकारला यश आले होते. तत्पूर्वी 2005 मधील नाताळच्या दिवशी अतिरेक्यांनी जोसेफ परराजसिंघम यांची मध्यरात्रीच्या प्रार्थनेच्या वेळी चर्चमध्ये शिरून हत्त्या केली. परराजसिंघम हे ज्येष्ठ संसदपटू आणि तामीळ नॅशनल अलायन्सचे नेते होते.
रविवारचे साखळी बॉम्बस्फोट हे अनपेक्षित नव्हते. श्रीलंकेचे सर्वोच्च पोलीस अधिकारी असलेले आय. जी. पुनीत जयसुंदरा यांनी काही दिवसांपूर्वीच इस्टरच्या दिवशी हल्ला होऊ शकतो, असा इशारा राष्ट्रीय पातळीवरून दिला होता. त्यांना आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटनांकडून मिळालेली ती माहिती होती. श्रीलंकेत कार्यरत असलेली माथेफिरू मुसलमानांची संघटना नॅशनल टोव्हित जमात ही हा हल्ला घडवू शकते, असा इशारा परदेशी गुप्तचर यंत्रणांनी श्रीलंकेला दिला होता. या पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारने सावधगिरी बाळगणे गरजेचे होते. विशेषत: या देशाच्या गुप्तचर यंत्रणांची जबाबदारी वाढली होती. इस्टरच्या दिवशी हल्ले होणार अशी माहिती हाती असताना पोलिसांनी काय कारवाई केली? त्या माथेफिरू मुसलमानांच्या हालचालींवर लक्ष ठेवले का? त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले का? या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत.
पोलिसांनी त्या संघटनेची चौकशी केली असती तर रविवारचा घातपात निश्चितच टाळता आला असता. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मथ्रीपाला सिरीसेना आणि पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांच्यात विस्तव जात नाही. रविवारच्या धक्क्यातून सावरल्यानंतर आता एकमेकांवर दोषारोप करण्याचे सत्र या दोघांकडून सुरू होईल. पण त्यामुळे अतिरेकी कारवायांचा मूळ प्रश्न मात्र बाजूलाच राहील. रविवारचा हल्ला हा भारताच्या दृष्टीनेदेखील गंभीर आहे. कारण या हल्ल्यामागे आय.एस.आय.चा हात असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. काही वर्षांपूर्वी तामिळनाडूतील गुप्तचर अधिकाऱ्यांनी तिरूची येथील एका व्यापाऱ्याला कोलंबोकडे रवाना होण्यापूर्वी विमानतळावर पकडले होते. या व्यापाऱ्याचे लागेबांधे श्रीलंकेतील पाकिस्तानी दूतावासात कार्यरत असलेल्या एका आय.एस.आय. एजंटशी असल्याचे स्पष्ट झाले होते.
श्रीलंकेतील लिट्टेचा दहशतवाद संपून एक दशक उलटले आहे. पण त्या देशात आता इस्लामी दहशतवाद डोके वर काढत आहे. दक्षिण भारत आणि श्रीलंकेत आय.एस.आय.चे एजंट कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे पुढील लक्ष्य भारत असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. श्रीलंकेतील राष्ट्रपती निवडणूक डिसेंबर 2019 मध्ये आहे. या निवडणुकीच्या वर्षातच घातपाताचा हा भयंकर प्रकार व्हावा, हा योगायोग नव्हे! भारतदेखील दहशतवादामुळे वर्षानुवर्षे होरपळून निघाला आहे. भारताचे दोन माजी पंतप्रधान या दहशतवादात हुतात्मा झाले. तरीही दहशतवाद संपलेला नाही. एकीकडे भिकेला लागलेला पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबविण्याचे नाव घेत नाही, दुसरीकडे चीन अप्रत्यक्षपणे या दहशतवादाला पाठिंबा देत आहे. अशावेळी श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या शेजारी राष्ट्रांच्या मदतीने भारतानेच दहशतवादाविरूद्ध युद्ध पुकारण्याची गरज आहे. त्यासाठी आपली गुप्तचर यंत्रणा अत्याधिक मजबूत आणि जागरूक असायला हवी. श्रीलंकेकडून जी चूक झाली ती आपल्याकडून होता कामा नये.”
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर