Details
मसूद अझरला थप्पड!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
सतराव्या लोकसभेच्या स्थापनेसाठी लोकशाहीचा महाउत्सव सुरू असताना सतत एकाच पक्षाच्या बाजूने दान पडावे अशी स्थिती तयार होत आहे. “विरोधकांचे यावेळेचे नशीबच फुटके आहे”, असे अन्य कोणी नाही विरोधी पक्षाचे एक मोठे नेते म्हणत आहेत! राहुल गांधी यांचे तसेच गांधी परिवाराचे अत्यंत जवळचे असणारे ओमर अब्दुल्ला यांनी विरोधी नेत्यांच्या मनात दाटणारी निराशाच व्यक्त केली आहे. बुधवारी दुपारपासून राजकीय मंचावरचे वातावरण चांगलेच ढवळून गेले होते कारण न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात भारताच्या पगडीमध्ये विजयाचा आणखी एक तुरा खोवणारा मोठा निर्णय झाला. कुख्यात दहशतवादी मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात आले आणि विरोधकांचा उरलासुरला धीरच सुटावा अशी स्थिती तयार झाली. ओमर अब्दुल्लांनी ट्वीटरवरून जी प्रतिक्रया व्यक्त केली ती पुरेशी बोलकी आहे. ते म्हणतात की, “(आम्हा) साऱ्या विरोधी पक्षांना वाटत आहे की या निवडणूक हंगामामध्ये आम्हाला श्वास घेण्याची फुरसततरी मिळणार आहे की नाही? जेव्हाजेव्हा असे वाटू लागते की चला, आता भाजपाची मोहीम थंडावत आहे, आता विरोधकांना संधी दिसते आहे.. नेमक्या त्याचवेळेस अशी काही घटना घडते की भाजपाची दमलेली मोहीम टुणकन उभी राहते. संयुक्त राष्ट्रसंघाने नेमक्या अशा वेळेस मसूद अझरला दहशतवादी जाहीर केले आहे की त्याचा सारा लाभ नरेंद्र मोदींच्या पुन्हा निवडून येण्याच्या मोहिमेलाच होणार आहे!”
शरद पवारांनी नेमक्या याचवेळी, “बारामतीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पराभूत होतील की काय?” अशी भीती निराळ्या धाटणीत व्यक्त करणे यातूनही, विरोधकांचा उत्साह डळमळत असल्याचेच जाणवते आहे. पण मसूद अझर या कुख्यात दहशतवाद्याच्या मुसक्या आता जगाच्या दबावामुळे आवळणे पाकिस्तानाला भाग पडणार आहे, यात शंका नाही. भारतात स्मगलिंगपासून खून, खंडण्यांपासूनचे सारे गुन्हे करणारा दाऊद इब्राहीम कासकर याला मुंबईतील भीषण बाँबस्फोट मालिकेनंतर संयुक्त राषट्रसंघाने अशाच पद्धतीने आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केले. पण दाऊद कराचीमध्ये राहतो हे भारताने हजार वेळा ओरडून सांगितले तरी पाकिस्तानने त्यासंदर्भात कानावरच हात ठेवले. दाऊद नावाचा कोणीच कराचीत राहत नाही अशी भूमिका पाकिस्तान सरकारने व मुख्यतः पाक लष्कराने कायम घेतली. पण मसूद अझरच्या बाबतीत तसे नाही. तो पाकमध्ये आहे, नव्हे त्याला खास पाक लष्कराच्या निगराणीतच उत्तम व्यवस्थेमध्ये पूर्ण संरक्षणात ठेवलेला आहे. त्याला मौलवीचा, धर्मगुरूचा दर्जाही आहे. त्याची जैश ए मोहम्मद संघटना जरी आंतरराराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून जाहीर झाली त्याला दोन दशके होत आली. तरीही मसूदच्या कारवाया मात्र सुरूच होत्या. अन्य नावांनी त्याने दहशतवाद भारतात निर्यात कऱण्याचे धोरण सुरूच ठेवले. त्याला अटकाव होत नव्हता. कारण पाक सरकारचा त्याला उघडउघड पाठिंबा होता.
पाकिस्तानच्या भूमीवर पाक सरकार व लष्कर त्याचे रक्षण करीत होते तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकचा जानी दोस्त चीन मसूद अझरला पाठीशी घालत होता. काल जो निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाने घेतला त्याचा पहिला प्रस्ताव 2009 मध्ये, मुंबईतील कसाब करणीनंतर, दाखल झाला होता. अमेरिका, इंग्लंड व फ्रान्सने तेव्हाही त्या ठरावाला पाठिंबाच दिला होता. फक्त चीनने विरोध सुरू ठेवला. चीनला सुरक्षा परिषदेच्या कार्यकारी मंडळामध्ये नकाराधिकार आहे. त्याचा वापर करून मसूद अझर विरोधातील संयुक्त राष्ट्रसंघाची कृतीमोहीम चीनने रोखून धरली होती. 2016, 2017 व आता पुलवामानंतर 2019 मध्येही पुन्हापुन्हा भारताच्या दहशतवादविरोधी लढाईत चीनने खोडाच घातला. पण अखेरीस भारताच्या सततच्या प्रयत्नांपुढे, आंतरराष्ट्रीय वाढत्या दबावापुढे चीनने मान तुकवली आहे. जे नवे पुरावे आमच्यासमोर आले. त्यामुळे आम्ही निर्णय बदलला हे चीनने जाहीर केले.
भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी चीनला अलिकडेच जी भेट दिली त्याचा हा सुपरिणाम होता असे दिसते. भारताचे संयुक्त राष्ट्र संघामधील कायम प्रतिनिधी एन. सय्यद अकबरूद्दीन यांनी या ठरावासाठी प्रचंड मेहनत केली. भारतीय पराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यापासून सारेच खाते या कामात मेहनत करत होते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताच्या पंतप्रधानांच्या कणखर भूमिकेचे सातत्य जगाने अनुभवले व त्याला दिलेली ही दाद म्हणजे हा ठराव होय. मसूद अझर पन्नास वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी हा शिक्का त्याच्यावर आता बसला. त्याची बँक खाती गोठवली जातील, त्याला पाकबाहेर प्रवास करता येणार नाही, त्याला व त्याच्या संघटनेला पैसा व शस्त्रे मिळवणे कठीण जाईल. पाक सरकारला त्याला आता तुरूंगातच टाकावे लागेल. गेली तीस-बस्तीस वर्षे हा अतिरेकी पाकमध्ये बसून जगभरातील दहशतवादाच्या यंत्रणेचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कराचीच्या मदरशामध्ये स्वतः धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेणाऱ्या मसूदने तिथेच शिकवायलाही सुरूवात केली. देवबंद या कट्टर पंथाचा तो एक सहप्रवासी आहे. त्याने कराचीमधून अफगाणिस्तानातील धर्मलढ्यात भाग घेतला. 1980 च्या दशकात रशियाविरूद्ध अमेरिका यांचा संघर्ष अफगाणिस्तानात सुरू होता. रशियाच्या विरोधात लढण्यासाठी अमेरिका बंडखोरांना मदत करत होती. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या ओसामा बिन लादेन या भस्मासुराने जेव्हा अमेरिकेच्याच डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला तेव्हा अमेरिकेचे डोळे उघडले.
त्याच अफगाण युद्धामधील दहशतवादाच्या कारखान्यातून हा मसूद नावाचा राक्षस तयार झाला. अफगाण युद्ध संपल्यानंतर त्याने काश्मीरमध्ये जिहाद करण्याचा प्रयत्न केला. भारतापासून काश्मीर वेगळे तोडणे केवळ अशक्य आहे. तरीही हे अतिरेकी पाक लष्करासाठी इथे कुरापती काढतच राहतात. त्यातला हा मोठा म्होरक्या होता. अफगाण लढ्यात तो जखमी झाला होता. म्हणून मग तो प्रचारकार्यात गेला. तरूणांना जिहादसाठी प्रोत्साहित कऱणे, जगभरातील अल कायदाच्या विविध छुप्या पाठिराख्यांना भेटणे, पैसा गोळा करणे असे त्याचे उद्योग सुरू झाले. 1990 मध्ये तो पाकमधील हरकत उल मुजाहिदीन या दहशतवादी गटाचा सरचिटणीस बनला. हरकतच्या काश्मिरी गटांमध्ये असणारी भांडणे मिटवण्यासाठी तो बोगस पोर्तुगीज पासपोर्टवर भारतात घुसला. वली आदम इसा या नावाने तो 1994 मध्ये ढाकामार्गे चक्क विनानाने दिल्लीत आला. तिथल्या प्रख्यात अशोका आणि जनपथ हॉटेलात त्याने मुक्काम केला. काश्मीरी दहशतवादी साजीद अफगाणी याच्याबरोबर अनंतनागमध्ये भारतीय लष्कराच्या तावडीत तो आपसूक सापडला. अर्थात अझरविषयी आपल्या यंत्रणांना तेव्हा तितकी माहितीही नव्हती. अफगाणी हा त्यांच्या दृष्टीने मोठा दहशतवादी होता. अझरच्या सुटकेसाठीच हरकत उल मुजाहिदीने भारतीय विमानाचे अपहरण केले आणि त्यातील प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात अफगाणी, अझर व अन्य एका दहशतवाद्यांची सुटका करणे भारत सरकारला भाग पाडले. अझरने त्या सुटकेनंतर पाकमध्ये सुरक्षित बिळातच राहणे पसंत केले. पण त्याने जैश ए मोहम्मद या अधिक जहाल संघटनेची स्थापना केली. तो काश्मीरच्या स्वातंत्र्याचा नारा देत पाकमध्ये मोठ्या प्रमाणात व उघडपणाने या संघटनेसाठी अतिरेक्यांची भरती करत होता. त्यांना प्रशिक्षण देण्याची शिबिरे भरवत होता आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देऊन मानवी बाँब म्हणून अशा तरूणांना भराताही धाडत होता. त्याच्या या अशा कारवायांना भारतीय वायुदलाने बालाकोटची जोरदार थप्पड तर लगावलीच, पण आता त्याच्यावर जो काळा शिक्का बसला आहे त्यामुळे पाक लष्कराच्या नालायक कारवायांनाही आळा बसणार आहे.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी