Details
सट्टा बाजारातही मोदींचा बोलबाला!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
माणसाच्या अनेक सहज प्रवृत्तीमध्ये जुगार हीही एक सहज वृत्तीच आहे असे अनेक मानसशास्त्राज्ञांनी म्हटले आहे. आपण सहज बोलताबोलता एखाद्या गोष्टीविषयी आत्मविश्वासपूर्वक सांगतो की “हे असेच होणार आहे, हे जे म्हणणे आहे त्याचा अर्थ अमूक असाच आहे..” दुसरा कुणी त्या विधानाला हरकत घेतो तेव्हा आपण सहज म्हणतो, “ चल तर मग! लागली पैज!” ही जी पैज आहे त्याचे रूपांतर पद्धतशीर व्यवसायात काही मंडळींनी केले. पण या जुगाराचा, सट्टा बाजाराचा आधार आहे ती माणसाची पैजा लावण्याची सहज प्रवृत्तीच. या पैजा कधी खऱ्या होतात, कधी खोट्याही ठरतात. आपली साधी, मैत्रीतील वा घरगुती पैज असते, ती असते एक कप चहाची अथवा आइस्क्रीमची. पण जे या पैजेचा धंदा करतात त्यांच्या लेखी यात गुंतलेल्या रकमा असतात हजारो, लाखो रूपयांच्या. पैज लावण्यावर कायद्याचे बंधन नाही. पण पैजेसाठी कुणाकडून हजारो रूपये गोळा करणे, पैज हरल्यावर ती रक्कम स्वतःकडे ठेवून घेणे किंवा जिंकल्यावर कित्येक पटींनी अधिक रक्कम परत करणे हा सारा व्यवहार कायद्याच्या कक्षेत शिक्षेस पात्र ठरतो. तरीही आयपीएलचे सामने असोत वा पडणारा पाऊस असो, धान्याचे वा सोन्या चांदीचे भाव असोत.. या सर्वांवर सट्टा लावला जातो. जिंकला वा हरलाही जातो.
जेव्हा तुमचा धंदाच हा माहितीवर व त्यातून उद्भवणाऱ्या स्थितीचा नेमका अंदाज बांधण्यावरच अवलंबून असतो आणि त्या गुंतलेल्या रकमाही कोटींच्या घरात असतात तेव्हा ते अंदाज नेमके अचूक कसे येतील याची पराकाष्टा केली जाते. उदाहरणार्थ आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारे जुगारी त्या सामन्याचा अत्यंत बारीक नजरेने अभ्यास करत असतात. अचूक अंदाज बांधत असतात व मग सट्टा लावत असतात. नेमकी तीच बाब निवडणुकीची आहे. देशात पुढच्या पाच वर्षांत कोणाची सत्ता येणार, जनमताचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे.. अशा बाबींवर हा निवडणुकीचा सट्टा लावला जातो. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराच्या हार-जीतीच्या अंदाजावर पैसा लावला जातो आणि लोकसभेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचाही अचूक अंदाज सट्टा बाजारात बांधला जातो. या पंटर मंडळींचे कान अगदी जमिनीला चिकटलेले असतात. निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या साऱ्या घटनांचा, सर्व परिस्थितीचा बारीक अन्वयार्थ लावून ही मंडळी अंदाज बांधत असतात. त्यामुळे सट्टा बाजाराचे जय पराजयाचे अंदाज हे प्रत्यक्ष निकालासारखेच असू शकतात. गेल्या कित्येक निवडणुकींचा हा अनुभव असल्यामुळे पत्रकार मंडळीही अन्य क्षेत्रांपेक्षा सट्टा बाजारात निवडणुकीविषयी काय बोलले जाते आहे, कोणत्या नेत्यावर बाजाराची भिस्त आहे, याचा अंदाज घेत असतात.
असे काही अंदाज मतदानाचे पाच टप्पे पार पडल्यानंतर पुढे येत आहेत. आणि त्यातून देशात या निवडणुकीनंतर येणारे सरकार भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्त्वाखाली स्थापन होईल असा ठळक निष्कर्ष सहजच निघतो आहे. ह्या सरकारचे नेतृत्त्व नरेंद्र मोदी हेच करतील यातही बाजाराला शंका उरलेली नाही आणि राहुल गांधी पंतप्रधान होण्याची सूतराम शक्यता बाजाराला वाटत नाही. सट्ट्यावर एक रूपया लागतो तेव्हा तुमची पैज वा तुमची बेट या बाबतीत जर तुम्ही म्हणता तसा निकाल लागला तर तुम्हाला किती पैसे परत येतील याला बाजाराचा फुटलेला भाव असे म्हटले जाते. आजची स्थिती अशी आहे की मोदी हे पंतप्रधान होणार या पैजेसाठी एक रूपया लावणाऱ्याला अवघे पंचावन्न पैसे भाव मिळतो आहे. पण याचवेळी राहुल गांधी विजयी होतील या पैजेसाठी साडेआठ रूपये असा तगडा भाव मिळत आहे. म्हणजेच राहुल गांधींच्या नावे शंभर रूपयांची बेटिंग करणाऱ्याला तब्बल साडेआठशे रूपये मिळतील. अर्थात जर राहुल पंतप्रधानपदावर बसले तरच बरं का! या बाजाराची हीच तर गंमत असते ज्याला अधिक भाव मिळतो तो नेता हमखास हरणारा असतो तर ज्याला सर्वात कमी भाव जाहीर होतो तो नेता निवडणुकीत हमखास विजयी ठरणार असतो.
सतराव्या लोकसभेसाठी सध्या सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर देशातील विविध सट्टा बाजारात रेकॉर्डब्रेक उलाढाल झाली आहे. सर्वाधिक सट्टा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर लागलेला आहे. तर त्यापाठोपाठ अमेठी, बडोदा इथे कोण जिंकेल तसेच मुंबईच्या निवडणूक रणधुमाळीत काय होईल यावर देशभरातून सर्वाधिक सट्टा खेळला गेला आहे. सट्टा बाजारात सर्वाधिक लोकप्रिय पक्ष आहे भाजपा. सट्टा बाजाराने भाजपाच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकले असून या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर सुमारे सात हजार कोटीच्या आसपास सट्टा लावण्यात आला आहे. भाजप 250 ते 295 इतक्या जागांवर विजय मिळवणार या अंदाजावर जोरदार सट्टा लागला आहे. तर काँग्रेसला 60 ते 80 जागांपर्यंत पसंती देण्यात येत आहे. सुरूवातीला काँग्रेसच्या 100 ते 110 जागांवर लागणारे पैसे आता 50 जागांवर आले असून राहुल यांच्या पंतप्रधानपदासाठी एक रूपयाला 5 रूपये असणारा भाव आता 8.5 रूपयांवर गेला आहे. पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचादेखील मोठा फायदा नरेंद्र मोदी यांना होणार असल्याचे संकेत बड्या बुकींनी दिले आहेत.
या लोकसभा निवडणुकांवर लावण्यात येणार्या सट्टा बाजाराची उलाढाल मुंबईसह आग्रा, दिल्ली, राजकोट, कोलकाता आणि राजस्थानातील फलौदी या बड्या बाजारांत मिळून 55 हजार कोटींच्या घरात जाणार असल्याची ही माहिती या क्षेत्रातल्या बुकींनी दिली आहे. सट्टा बाजारात नरेंद्र मोदीची प्रचंड लहर पसरली असून लोकसभा निवडणुकांसाठी सट्टा बाजारात भाव खुले झाल्यापासून भाजपावर आणि खास करून नरेंद्र मोदीवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक सट्टा 2019 च्या निवडणुकांवर लागल्याची माहिती या क्षेत्रातील सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीवरील खेळल्या गेलेल्या सट्ट्यावरून बुकी मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होईल असे भाकित केले आहे. अर्थातच हा साराच व्यवहार कायद्याच्या कक्षेबाहेर असल्यामुळे त्यातील नेमक्या किती रकमेचे व्यवहार होतात याची निश्चित आकडेवारी जरी कळू शकत नसली तरी सट्टा बाजाराचे राजकीय अंदाज बहुधा बरोबर निघतात.
या अंदाजानुसार मुंबईतील सट्टा बाजाराच्या सूत्रांनी जाहीर केले आहे की देशभरातील 543 लोकसभा जागांपैकी भारतीय जनता पक्षाला स्वबळावर 299 जागी विजय मिळेल तर मित्रपक्षांसह रालोआची लोकसभेतील संख्या 347 इतकी राहील. 2014 पेक्षा हा विजय मोठा असेल. मागील लोकसभेत भाजपाचे 282 तर रालोआचे 337 खासदार विजयी झाले होते. आग्रा सट्टा बाजाराच्या मते रालोआला सत्ता जरी मिळणार असली तरी त्यांचा आकडा 300 पर्यंत खाली राहील तर भाजपाला स्वबळावर 250 पर्यंतच्या जागा जिंकता येतील. पंतप्रधानपदावर मात्र मोदीच दिसतील अशी देशातली सर्वच पंटर मंडळींची खात्री झालेली दिसते आहे. एका काँग्रेस नेत्याने मात्र असे सांगितले की भाजपाचे लोक मोठ्या प्रमाणात सट्टा बाजारात काम करतात त्यामुळेच ते तिथे त्यांच्या पक्षाचे चित्र चांगले दाखवतात, पण हे चित्र खरे नाही!
महाराष्ट्राच्या बाबतीत सट्टा बाजाराचे म्हणणे असे आहे की भाजपाला 25 तर शिवसेनेला 16 जागांवर विजय मिळेल दोन्ही पक्षांनी मागील लोकसभेत 42 जागा जिंकल्या होत्या. गुजरात मध्य प्रदेश व राजस्थानात भाजपाने 2014 मध्ये जवळपास सर्वच जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र त्यांना गुजरातमध्ये दोन, मध्य प्रदेशात चार, तर राजस्थानात तीन जागा गमवाव्या लागतील असे बाजाराचे म्हणणे आहे. या तीन राज्यातील एकूण 79 लोकसभा जागांपैकी भाजपाला 71 जागांवर जय मिळेल असे सट्टाबाजांना वाटते आहे. दिल्लीतील सर्व सातही जागा पुन्हा भाजपाकडेच राहतील तर उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी 63 जागा भाजपाकडे जातील. सट्टा बाजाराचा उत्तर प्रदेशाचा अंदाज अनेकांना सर्वाधिक आश्चर्यकारक वाटू शकेल. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने इथे विक्रमी जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या 71 जागांवरील विजयामुळे मोदींचे दिल्लीतील आसन पक्के झाले होते. मात्र तिथे सपा बसपा युती झाल्यामुळे तसेच उत्तर प्रदेशातील सर्व लोकसभा पोट निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाल्यामुळे तसेच राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीगडमध्ये भाजपाची राज्य सरकारे गेल्यामुळे सर्वच राजकीय पंडितांचा अंदाज होता की भाजपाची संख्या उत्तर प्रदेशातच निम्यापर्यंत खाली येईल. त्यांना चाळीस खासदारही उत्तर प्रदेशातून लोकसभेत पाठवता येणार नाहीत. पण त्यात फार तथ्य नाही हे दिसू लागले आहे. जसजसे निवडणुकीचे टप्पे पार पडत आहेत तसतसे हे अधिक जाणवू लागले आहे. एप्रिल अखेरपर्यंत उत्तर प्रदेशातील सर्व मतदारसंघांचे लढतींचे चित्र स्पष्ट झाले. सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की अनेक मतदारसंघांमध्ये सपा बसपाच्या एकत्रित ताकदीला काँग्रेसने काटशह दिला आहे. विरोधकांचीच मते खाण्याचे काम काँग्रेसने सुरू केल्यामुळे भाजपाचा विजय वाढतो आहे. मोदींच्या विशाल व उत्स्फूर्त रोड शोनंतर तर वातावरण मोठ्या प्रमाणात बदलले आहे याची खात्रीच पटते. सट्टा बाजारानेही मोदींच्याच मागे उत्तर प्रदेशाचा कौल राहील यावर शिक्कामोर्तब केले आहे.
तामिळनाडूच्या 39 जागांपैकी भाजपाला चार तर त्यांचा मित्रपक्ष असणाऱ्या पनीरसेल्वम यांच्या एआयएडीएमकेला 17 जागी विजय मिळेल. यामुळे दक्षिणेत भाजपाचे मोठे पाऊल उमटलेले दिसेल. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोरात मुसंडी मारण्याचे प्रयत्न गेली काही वर्षे सुरू केले आहेत. त्यात त्यांना मोठे यश तिथे मिळेल असे सट्टाबाजारात पैसा गुंतवणाऱ्या पंटर मंडळींना वाटते आहे. तिथे पंचायत निवडणुकीत भाजपाने शिरकाव केला होताच. पश्चिम बंगालमधील ममतांच्या कारभारावर व कार्यपद्धतीवर मोदी दररोज हल्ला चढवत आहेत. तिथे सर्व सात टप्प्यात मतदान होत आहे. आतापर्यंत पार पडलेल्या पाचही टप्प्यात भाजपाने बंगालमध्ये मोठा शिरकाव केल्याचा बाजाराचा कयास असून एकूण 42 जागा असणारे पश्चिम बंगाल हे पुढच्या सत्ताकारणातील महत्त्वाचे राज्य ठरणार आहे. तिथे भाजपाला 22 जागांवर विजय मिळेल असा अंदाज बाजाराने व्यक्त केला आहे. गोव्यातील दोन्ही जागा तर कर्नाटकातील सोळा जागी भजापाला विजय मिळेल. कर्नाटकात देवेगौडांच्या जनता दलाबरोबर काँग्रेसचा समझोता आहे. राज्य सरकारमध्येही काँग्रेसने आमदारकीच्या कमी जागा असणाऱ्या गौडांच्या मुलाला, कुमारस्वामींना, मुख्यमंत्रीपदी बसवून भाजपावर मोठी मात केली होती. मात्र काँग्रेस व जदची रोज भांडणे होत आहेत. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांच्या नेतृत्वा ाखाली लढणारा भाजपा हाच कर्नाटकातील सर्वाधिक संख्येने खासदार दिल्लीत पाठवणारा पक्ष ठरतो आहे असे दिसते.
आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये मात्र भाजपाची निराशा होणार असा बाजाराचा अंदाज आहे. ओरिसातील बीजू पटनाईक यांचे वर्चस्व मोडून काढून 21 पेकी तेरा जागी भाजपा जिंकले तर केरळमध्येही पाच जागांवर भाजपाला विजय मिळेल असे अंदाज व्यक्त झाले आहेत. या भाजपाच्या चढत्या भाजणीला काँग्रेसकडून मोठ्या प्रामाणात अटकाव होईल का हा प्रश्न बाजाराने निकाली काढला आहे. फिलौती आणि आग्रा सट्टा बाजारांच्या अंदाजानुसार काँग्रेसची संख्या सध्याच्या 44 च्या मानाने बरीच वाढणार जरी असली तरी त्यांची गाडी 80 जागांचा टप्पाही पार करू शकणार नाही. अर्थातच 78-79 जागा जरी मिळाल्या तरी संसदेतील विरोधी पक्षनेते पदावर त्यांना नक्कीच हक्क सांगता येईल. हे विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधी स्वतःकडे ठेवतात का, ते त्यांना शक्य होते का हे पाहणे हा या निकालांचा सर्वात मोठा धक्कादायक, रोमांचक असा भाग असणार आहे. जर अमेथी व वायनाड या दोन्ही ठिकाणी राहुल हरले तर काय होईल आणि दोन्ही जागा ते जिंकले तर काय होईल, यावरही सट्टाबाजार बेट स्वीकारतोच आहे.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी