HomeArchiveध्यानमग्न, सन्यस्थ पंतप्रधान!

ध्यानमग्न, सन्यस्थ पंतप्रधान!

Details
“ध्यानमग्न, सन्यस्थ पंतप्रधान!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
लोकसभेच्या प्रदीर्घ लढाईची अखेर सातव्या फेरीच्या मतदानाने होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्रीनाथ यात्रेची दृष्ये देशातली प्रत्येक वृत्तवाहिनीच्या पडद्यामार्फत लाखो-करोडो नागरिकांपर्यंत पोहोचतच होती. हा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे अशी ओरड लगेचच सुरू झाली. याच्या आदल्याच दिवशी दिवसभर व रात्रीही पंतप्रधानांच्या केदारनाथ यात्रेची दृष्ये अशीच झळकत होती. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता ते केदारनाथला दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यांचा मुक्काम केदारनाथमध्येच होता. शंकराच्या या पुरातन मंदिरात जाऊन त्यांनी अर्धा तास पूजाअर्चना केली. त्यासाठी त्यांनी खास गढवाली पोषाख परिधान केला होता. तिथे सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. तापमान उणेच्या जवळ झुकणारे आहे. तशा थंडीत त्यांनी दोन किलोमीटरची पदयात्रा करत मंदिर प्रदक्षिणा तर केलीच पण नंतर केदारनाथ विकास प्रकल्पाचा आढावाही घेतला.

तिथले मंदाकिनीवरचे घाट, शंकराचार्यांच्या समाधीचे स्थान आदींची पार धुळधाण 2015 मधील प्रचंड पावसाने, पुराने केली होती. त्याची दुरूस्ती आता होत आली आहे. नंतर मंदिरापासून सुमारे एक-दीड किलोमीटर अंतरावर, डोंगरात असणाऱ्या गुहेत मोदी गेले. तिथे ते ध्यानस्थ बसले होते. त्या सर्व यात्रेची, बैठकीची तसेच ध्यानसाधनेचीही दृष्ये शनिवारी दिवसभर आपल्या टीव्हीच्या पडद्यावर झळकतच होती. नरेंद्र मोदींनी हे मतांसाठी केले असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरले. कारण, त्यांनी ध्यानधारणा हा त्यांच्या रोजच्या दिनचर्येच भाग आहे. ते केदारनाथला गेल्या दोन वर्षांत चारवेळा गेले आहेत. हिमालयातही ते वारंवार गेलेच आहेत. चाळीसएक वर्षांपूर्वी ते साधू बनायला तिथे गेले होते. एक हजार किलोमीटरची पदायात्रा करत त्यांनी कैलास मानसरोवरची यात्राही त्या काळात पार पाडली होती. गुजरातचे मुख्यमंत्री होईपर्यंत दरवर्षी दिवाळीच्या चार दिवसांत मोदी जंगलात एकांतात जाऊन ध्यानधारणा करत असत. या गोष्टी त्यांनी अलिकडेच विविध मुलाखतींमधून सांगितल्या आहेत.

आता सतराव्या लोकसभेच्या स्थापनेची प्रचंड तणावाची निवडणूक पार पडल्यानंतर देवाच्या पायाशी शांत ध्यानस्थ काही काळ बसणे हा त्यांचा मनावारचा ताण हलका करण्याचा उपाय असू शकतो. प्रत्येक राजकीय नेता आपापल्या पद्धतीनुसार प्रचारमोहिमेची सांगता झाल्यानंतर रिलॅक्स होतो. ताण-तणाव, धावपळ विसरून शरीराला व मनाला विश्रांती मिळणे ही गरज असतेच. प्रत्येकाची पद्धती निरनिराळी असू शकते. मोदी केदारनाथ जाऊन ध्यानस्थ बसले असतील तर राहुल गांधी खान मार्केटमधील रेस्टॉरंटमध्ये दोस्तांच्या घोळक्यात रिलॅक्स झाले असतील. अन्य कुणी नेता प्रचाराची दगदग संपवून विदेशात फिरून आला असेल. प्रत्येकाची सुट्टीची संकल्पना व ताण-तणाव कमी करण्याचे उपाय भिन्न-भिन्न असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोघांनीही 51 दिवसांच्या प्रचारमोहिमेत जीवतोड मेहनत केली हे विसरून चालणार नाही. मोदींनी दीड लाख हवाई किलोमीटरचा प्रवास करत 166 सभा घेतल्या तर राहुल गांधींच्याही सभा जवळपास तितक्याच झाल्या. त्यांचाही हवाईप्रवास सव्वा लाख किलोमीटरचा झालाच. त्यामुळे दोघांनाही विश्रांतीचा पूर्ण हक्क आहे हे आपण मान्यच करायला हवे. पण जसे राहुल गांधी रिलॅक्स होत, एखद्या हॉटेलमध्ये बसल्याचे फोटो व्हायरल झाल्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही तसेच मोदी देवदर्शनाला गेले, त्यामुळे आचारसंहितेला बाधा पोहोचू शकत नाही. पण नरेंद्र मोदी हे व्यक्ती म्हणून केवळ नाहीत तर ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत प्रश्न इतकाच असू शकतो की जर तुम्ही व्यक्तीगत साधनेसाठी जात आहात, हिमालयाच्या कुशीतील एका गुहेत तुम्ही मुक्काम कऱणार आहात, तर ते जगाला ओरडून सांगण्याची आवश्यकताच काय होती? तुम्ही टीव्हीचे कॅमेरे सोबत घेऊन गुहेत कसे काय जाऊ शकता? ती साधना असू शकते का? की ते केवळ एक नाटकीपणाचे कृत्य ठरते? नेमके हेच प्रश्न काँग्रेस व कम्युनिस्टांनी उपस्थित केले आहेत.

अर्थातच पंतप्रधान काय करतात कुठे असतात याचे नेमके उत्तर जनलेला मिळणे हाही नागरिकांचा एक हक्क असतोच. उदाहरणार्थ ज्या घटनेमधून बालाकोटचा हवाईहल्ला आपण केला व दहशतवाद्यांचे त्याचबरोबर पाकच्या आक्रमक मानसिकतेचेही कंबरडे मोडले, त्या पुलवामाच्या सैनिकी ताफ्यावरच्या अतिरेकी आत्मघातकी बाँबहल्ल्याच्या घटनेवेळी मोदी कुठे गायब झाले होते, हे सवाल विचारले गेलेच. कारण पुलवामा हल्ला घडत होता नेमक्या त्याचवेळेस मोदी जंगलामध्ये शूटिंग करत होते! त्यावरही तेव्हा मोठी टीका झाली होती की तुम्ही इतके सजग पंतप्रधान आहात तर तुम्हाला हल्ले सुरू झाल्याची बातमी तीन-चार तास उशिरा का मिळाली? तुम्ही इतके त्या शूटिंगमध्ये व्यग्र का होतात? तशीच टीका या केदारनाथ यात्रेवेळी दुर्दैवाने काही प्रकार घडला असता तर नक्कीच होऊ शकली असती. सुदैवाने त्या चोवीस तासात देशाच्या सीमा शांत होत्या. पण मोदी नेमके कुठे आहेत व काय करत आहेत याचे, एक कुतूहल माध्यमांमध्ये असतेच. कोणीही पंतप्रधान उद्या बसले तरी ते कुतूहल राहणारच आहे. हिमाचल प्रदेशासारख्या राज्यातील जागृत टीव्ही चॅनेलचे पत्रकार मोदींच्या केदारनाथ यात्रेची सुरूवात होताच तिथे धावले असल्यास नवल नाही. तसे टीव्हीचे कॅमेरे राहुल गांधींपासून ममता बॅनर्जींपर्यंत आणि शरद पवारांपासून चंद्राबाबू नायडूंपर्यंत सर्वांच्याच मागे धावत असतात.

टीव्हीवाले जर मागे लागेल असतील व त्यांच्या विनंतीवरून गुहेतीलही काही दृष्ये टिपू देण्यात आली असतील, तर तोही दोष मोदींचा होता असे म्हणता येणार नाही. पण प्रचाराची सांगता होत असताना मोदींच्या उपस्थितीत अमित शाहंनी पत्रकारांना जे सांगितले होते तेही महत्त्वाचे आहे. “आमची प्रत्येक गोष्ट आधी पूर्ण आखून, विचारपूर्वक नियोजन करूनच केलेली असते. फक्त ते घडते तेव्हा तुम्हाला कळते. उत्स्फूर्त भासते!” असे शाहंनी सांगितले होते. त्याच न्यायाने मोदींनी केदारनाथ, बद्रीनाथची ही यात्रा बरीच आधी नियोजित केलेली होती हेही स्पष्ट आहे. कारण ज्या गुहेत जाऊन मोदी रात्रभर ध्यानस्थ थांबणार होते त्याची तयारी बरीच आधी सुरू होती. नैसर्गिक गुहा, आतल्या बाजूचे खडक फोडून मोठी करण्यात आली होती. आतमध्ये दोन खोल्या होत्या. बाथरूम सज्ज होते! विजेची व पाण्याची सुविधा निर्माण केली होती. तिथे दहा फूट उंच छत होते आणि एक छान खिडकीही होती! त्या खिडकीतून केदारनाथ मंदिराचे दर्शन होत होते. ही तयारी केली जात असताना तिथे कोणी व्हीव्हीआयपी येऊन राहणार आहेत याची गंधवार्ता स्थानिक लोकांना प्रशासनाने लागू दिलेली नव्हती हीच खरी गंमत आहे. आत सीसीटीव्हीची यंत्रणा बसवली होती व बाहेर पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षारक्षकांना पंतप्रधानांवर त्यातून लक्ष ठेवता येत होते. देशाचा पंतप्रधान हिमालयाच्या गुहेत रात्री थांबतो ही साधीसोपी गोष्ट नक्कीची नाही. तशी ती नव्हतीही. पण यातून मोदींना कोणता संदेश मतदारांपर्यंत पोहोचवायचा होता हा सवाल विरोधकांनी उपस्थित केला व तो घेऊन ते निवडणूक आयोगापुढे गेले आहेत.

तिथे सारे काही आलबेल नाही. दिल्लीत निवडणूक आयोगामध्ये धुसफूस सुरू आहे. एक आयुक्त अशोक लवासा मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. मोदी-शाह आदिंच्या विरोधातील निवडणूक आदर्श आचारसंहिताभंगाची जी प्रकरणे आयोगाकडे दाखल झाली होती, त्या सर्वांमधून मोदी व शाहंना क्लीनचिट का दिली गेली हा सवाल घेऊन लवासा उभे आहेत. त्यांनी त्या प्रकरणांमध्ये आपला निराळा निर्णय दिला होता. आयोगाच्या सदस्यांनी दोन विरूद्ध एक या बहुमताने क्लीनचिट दिल्या तरी त्या जाहीर करताना लवासा यांनी जे विरोधी मत व्यक्त केले होते ते नोंदले गेले नाही, त्याची दखल घेतली गेली नाही, हाच लवासा यांच्या चिंतेचा व नाराजीचाही विषय आहे. लवासांनी एक पत्र मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिले असून, यापुढच्या आयोगाच्या बैठकीत सहभागी होता येणार नाही असे सांगून टाकले आहे. नेमक्या कोणत्या विशिष्ट आचारसंहिताभंगाच्या प्रकरणात मोदी-शाहंवर ठपका यायला हवा होता याविषयी मात्र त्या पत्रात लवासांनी स्पष्ट केलेले नाही.

खरेतर एका आयुक्तांचे निर्णयाच्या विरोधात असणारे विरोधी मत निर्णयात नोंदताच येत नाही असा अभिप्राय विधिज्ञांनी दिला आहे. अर्धन्यायिक प्रकरणे आणि प्रशासकीय निर्णय यात हा मूलभूत भेद आहे असे विधिज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा निवडणूक आयोग एखाद्या प्रकरणात अर्धन्यायिक अधिकार बजावून निर्णय देत असतो तेव्हा त्या प्रकरणात जर एखाद्या आयुक्तांचे विरोधी मत असले, तर त्याची नोंद निर्णयात घेण्याची आवशक्यता आहे. पण प्रशासकीय अर्थात एक्झिक्युटिव्ह पद्धतीच्या आचारसंहिताभंगाच्या निर्णयांमध्ये तसे विरोधी मत नोंदण्याची तरतूद नियमात नाही असे विधिज्ञ सांगतात. मात्र लवासा यांचे मत यासंदर्भात भिन्न आहे. माझे विरोधी मत नोंदवत नसाल तर मी निवडणूक आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे ताजे वृत्त आहे. तिकडे दिल्ली निवडणूक आयोगातच ही हाणामारी सुरू असतानाच मोदींनी हा नवा, कथित आचारसंहिताभंगाचा गुन्हा केल्याचा आरोप, तृणमूल काँग्रेस व कम्युनिस्टांनी केला आहे. काँग्रेसनेही मोदींच्या ध्यानधारणेच्या बातम्या टीव्हीच्या पडद्यावर झळकावण्याच्या प्रकाराबद्दल तीव्र हरकत घेतली आहे.

आपण कट्टर हिंदुत्त्ववादी आहोत असाच संदेश मोदींना त्यांच्या या कृतींमधून पूर्वांचलातील मतदारांना द्यायचा आहे का, असा सवाल इथे विचारला जात आहे. पूर्व उत्तर प्रदेशासह बिहार, पंजाब व नवी दिल्तीतील एकूण 59 जागांवर मतदानाची अखेरची व सातवी फेरी पार पडत असताना निवडणूक आयोगाने आतातरी मोदींविरोधात पावले उचलावीत अशी अपेक्षा विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे. आयोगातील अरोराविरूद्ध लवासा हा वाद संपल्यानंतर मोदींच्या ध्यानधारणेची चिरफाड आचारसंहितेच्यासंदर्भात करण्यासाठी कदाचित निवडणूक आयोगाला सध्या वेळही मिळणार नाही. कारण येत्या गुरूवारी सतराव्या लोकसभेचा निकाल लावण्याचे मोठे आव्हान आयोगापुढे सध्या आहे. त्यात देशाचे पुढचे राजकीय चित्र स्पष्ट होईल तेव्हा या साऱ्या चर्चांना अर्थही उरणार नाही. जर आयोगाने निकालानंतर मोदींना आचारसंहिताभंगाच्या प्रकरणात दोषी ठरवले तर काय होईल हा एक नवा मुद्दा राहील. मोदी जर बहुमतासह सत्तेत बसले तर सध्याच्याच विरोधकांनाच मोदींच्या ध्यानधारणेचा मुद्दा चर्चांसाठी उपयोगी ठरू शकेल आणि जर मोदी सत्तेच्या बाहेर फेकले गेले तर, “आता जाऊन बसा, त्याच केदारनाथच्या गुहेत” असे मोदींना सांगण्याची संधी भाजपेतर पक्षाच्या नेत्यांना घेता येईल!”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...
Skip to content