Details
माऊंट एव्हरेस्टलाही कचरा प्रदूषणाचा विळखा!
01-Jul-2019
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
नेमेची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे तोही येतोय नि विविध दिवशी येतात नि जातात. जनजागृती कार्यक्रम, चर्चा-परिसंवाद, स्पर्धा यांचं आयोजन होतं असतं, प्रसिद्धी मिळते, एक इव्हेंट साजरा होतो. इतकं बाजारी स्वरूप येत चाललंय सगळीकडे. मी सांगतोय ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कचरा प्रदूषण आपल्याला कसा विळखा घालतोय पाहा. शहर, गाव, सोडा पर्वत-शिखरं जिथे सहज जाता येत नाही अशा बर्फाच्छादित डोंगररांगाही नाही सुटल्या यातून! याला जबाबदार अर्थातच तुम्ही-आम्ही! मुंबई महापालिकेला दरवर्षी नालेसफाईसाठी हजारो कोटी रूपये खर्च करावे लागतात, तरी तुंबापुरी करून दाखवतातच. मग ते राजकारणी असोत की कंत्राटदार. हेच लोण आता ग्रामीण भागातील शहरातही पसरतेय. ‘वापरा नि फेका’ या संकल्पनेमुळे सर्वच प्रकारचा कचरा नि प्रदूषण वाढतेय. प्लास्टिक तर उत्तर-दक्षिण धृवावरील जलचराच्या पोटातही सापडले म्हणे, आता बोला!
गेल्या काही वर्षात तर काही वेगळं म्हणून बर्फाच्छादित पर्वतावर चढाईची ‘टूम’ निघाली. यंदा नेपाळने लाखो डॉलर कमावले ते एव्हरेस्टवर चढाईसाठी जाणाऱ्यांना परवाना देऊन, नि आता बातम्या येताहेत तिथेही कोंडी होऊन काहींना जीव गमवावा लागल्याच्या. कारण, ऑक्सिजनची मोठया प्रमाणात कमतरता, त्याचबरोबर पुरेसे गिर्यारोहणाचे प्रशिक्षण नसणे अगदी शिकाऊ, थातूर-मातूर शिकलेलेही चढताहेत ती वाट! असो, विषय प्रदूषण कचरा याचा. शिखरापर्यंत जाण्याच्या विविध वाटांखाली बर्फात मोठया प्रमाणात कचरा साचलाय. अगदी मानवी विष्ठा नि मूत्रदेखील!
हे शिखर ‘फत्ते’ करणं ही घटना निश्चितच कौतुकास्पद आहे. जीव जोखमीत घालून निसर्गाच्या भयंकर बदलाला सामोरे जात, अनिश्चिततेच्या संकटांना तोंड देत पुढे जाऊन सुखरूप परत येणे हे एरागबळ्याचे काम निश्चितच नाही. मामुली चूकही जीवघेणी ठरू शकते. काही अडचणी अकस्मात उद्भवतात. निडर अशा स्थानिक शेरपांचीदेखील फ्या-फ्या होते. काही ठिकाणी ३००-४०० फूट खोल दऱ्या आहेत. त्या, एकमेकांना आडव्या शिड्या जोडून पार कराव्या लागतात. त्यावेळी भक्कम मानसिकता नि हवामान कसोटी पाहणारे असते. हवेची एक लाट तोल न सांभाळता आल्यास मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. अशा ३० हजार फूट उंचीच्या शिखराच्या मार्गात आजही अनेक प्रेतं अंतिम संस्काराची वाट बघत पडली आहेत. दुर्गम वाटांवरील ही प्रेतं खाली आणण्याचा प्रयत्न करणंदेखील आत्महत्त्या ठरेल. दुर्गम अशा रस्त्यांवर असलेल्या या प्रेतांची अद्याप ओळखही पटलेली नाही. यातील बरीचशी कलेवरं भौगोलिक वातावरणामुळे ओळखण्याच्या स्थितीत आहेत. १९५३ साली माऊंट एव्हरेस्टला जगातील सर्वात उंच शिखर घोषित केल्यापासून अधिकृत आकडेवारीनुसार तीनशेहून अधिक चढाईदरम्यान ‘आभाळातील बापा’कडे पोहोचले आहेत. अनेकांचे शव दबलेले असून त्यात भारतीयदेखील आहेत. याची नाना कारणं समोर आली आहेत. यातील जास्त मोठे कारण म्हणजे चढाई करतेवेळी तोल जाणे. यासह हिम दरी किंवा भेगेत पडणे, हिमस्खलन किंवा पुरेशा प्राणवायूअभावी गुदमरून मृत्यू याचाही समावेश आहे.
हा मृत्यू खेळ भयानक असला तरी याच रस्त्यांवर आता आजूबाजूला कचरा साम्राज्यही दिसत असल्याचे ‘वर’ जाऊन आलेले सांगतात. ८ हजार ८४८ मीटर लांबीच्या या रस्त्यांवर हा कचरा आहे. पर्वतरोहणाचे व्यवसायिकरण जसजसं वाढतंय तसा इथे कचरा साचतोय. दरवर्षी वाढणारे गिर्यारोहकच याला जबाबदार आहेत. साधनांमध्ये आधुनिकता जरी आली असली तरी जीवन जगण्याच्या गोष्टी न्याव्याच लागवतात ना! तिथे जाण्याची वाढती क्रेझ’ यात भरच घालतेय. प्राणवायू नळकांड्या, खाण्या-पिण्याचे सामान, तंबू यासह अनेक गोष्टी नेल्या जातात. यातील आपल्या पाठीवरील सामानाचा भार कमी करण्यासाठी अनेकजण चांगल्या वस्तूही टाकतात नि रिकामा केलेला कचराही. उंचावर उभारलेल्या शिबिरस्थळांवर मोठ्या प्रमाणात मानवी मलही साचला आहे. हे सर्व लक्षात घेऊन हे सर्व मर्यादेपलीकडे चालल्याचे तज्ज्ञांना वाटतं. नुकत्याच एका अहवालानुसार या सुमारे नऊ कि. मी. मार्गावर पडलेला कचरा टनावारी असून गेल्या काही वर्षांत कचरा खाली आणावा त्यासाठी प्रयत्न होत आहेत. शेरपाना एक किलो कचरा आणण्यास दोन डॉलर दिले जातात. काही वर्षात १६ टन कचरा आणला असून अद्यापही हजारो टन तिथेच पडून आहे. यात प्रेतंही आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे बर्फात दबलेली प्रेतं दगडासारखी कडक झाल्यानं अडचणी येतात. नेपाळी पर्वतारोहींचा एक चमू यासाठी कार्यरत आहे.
गिर्यारोहकांच्या तंबूत शौचालयाची व्यवस्था असते. त्यातील मल खाली आणला जाते. पण, पुढे चढाई करताना बर्फात खड्डा करून तो पुरला जातो. एका अहवालानुसार प्रत्येक हंगामात सुमारे साडे २६ हजार पौंड मानवी मल या पर्वतरांगेत जमा होत आहे. एव्हरेस्टवर चढाई करणारी पहिली महिला, जपानची जुंको तापेई या गेली काही वर्षं येथील दबाव, जमा होणारा कचरा, त्याचे परिणाम नि नुकसान याचा अभ्यास करीत आहेत. त्यांच्या मते एक मिलियन लिटर इतकं मूत्र जमा असून पॉलिथिन, प्लास्टिक, रिकाम्या बाटल्या, प्रेतं, हेलिकॉप्टर कचरा हेही मोठ्या प्रमाणात आहे. हे पाहता या क्षेत्राला अति उंचावरील कचरा डम्पिंग ग्राउंड म्हंटलं जातं. तिथे नैसर्गिक परिस्थिती अशी आहे की कचरा काढणं हे आव्हानच आहे. पण, आपलं काय आपण का अनावश्यक कचरा वाढवतोय याचा कोण विचार करणार? येणारा काळ अधिकच बिकट असेल हे सांगण्यास कोण्या नोस्त्रदेम्सची गरजच नाही, आपणच ते ठरवलंय नाही का?”
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार