Details
तेलाच्या भडक्याचे राजकारण!
18-Sep-2019
”
अनिकेत जोशी..
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा खनिज तेलाचा पुरवठा करणारा देश इराण असून त्यावर सध्या अमेरिका चिडलेलीच आहे. पहिला क्रमांक आहे इराकचा. तिथून आपण चार कोटी ६६ लाख मे. टन इतके तेल आणतो. सौदी अरेबियाकडून दुसऱ्या क्रमांकाने म्हणजे चार कोटी टन खनिज तेल आपल्याला मिळते. इराणकडून आपण दोन कोटी ३९ लाख मे. टन तेल घेत होतो. अमेरिकेने आता जाचक व्यापारनिर्बध लावले असल्याने भारतासह सर्व देशांनी इराणबरोबर व्यापारी संबंध ठेवू नयेत, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. पण इराणकडून जर जगाला तेल मिळणार नसेल तर तेलाचा अधिकचा पुरवठा करण्याची जबाबदारी ज्या सौदी अरेबियावर अमेरिकेने टाकली होती तिथेच इराणी बंडखोरांच्या एका गटाने हल्ला चढवला असून त्याचा सरळ फटका भारताला बसणे क्रमप्राप्तच आहे. शनिवारी झालेल्या त्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या किंमती कडाडत आहेत. सोमवारी एका दिवसात खनिज तेलाच्या किंमती ६०.२५ डॉलर प्रती बॅरलवरून थेट १९ टक्क्यांनी वाढल्या आणि दिवसभराच्या व्यवहारात त्या प्रती बॅरल ७१.५७ डॉलर अशा चढल्या. बाजार बंद होताना त्यात थोडा उतार आला तरी ६६.३१ डॉलर प्रती बॅरल दर राहिला. एकाच दिवसात झालेली इतकी मोठी वाढ जगाने १९९१मधील आखाती युद्धानंतर प्रथमच अनुभवली आहे.
जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती दहा डॉलरनी वाढतात तेव्हा त्यानंतरच्या पंधरवड्यात भारतीय बाजारात पेट्रोल, डिझेलचे दर लीटरमागे ५ ते ६ रूपयांनी वाढवावे लागतात. गॅस पुरवठ्यावरही परिणाम होणार, असे अरामकोने जाहीरच केले आहे. त्यामुळे तिथेही किंमतवाढ अटळ आहे. भारताचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने स्थितीचा आढावा घेतला. भारताचे सौदी अरेबियातील राजदूत अरामकोच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. भारताला होणारा खनिज तेलाचा पुरवठा कमी होणार नाही असे आश्वासन त्यांना मिळाल्याचे प्रधान यांनी जाहीर केले आहे. डिझेल, पेट्रोलच्या किंमतीचा हा भडका महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदलवण्यास वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकेल का, महिन्याभरात आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तेलाच्या किंमतींचा थेट संबंध ग्राहक वस्तू निर्देशांकाशी असतो. तेल वाढले की सर्वच वस्तुंचे भाव वाढतात. महागाई वाढणे हा राजकीय परिणाम करणारा एक घटक असतोच असतो. इराणच्या हुथी बंडखोरांनी सौदी सरकारच्या मालकीच्या अरामको तेल कंपनीच्या दोन तेल शुद्धीकरण केंद्रांवर ड्रोनच्या सहाय्याने बाँबहल्ले केले. ड्रोनच्या सहाय्याने जगाला धसकवणारा हा पहिलाच हल्ला ठरावा. तेल क्षेत्रांवरील या हवाई हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने ५० टक्के तेल उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. या निर्णयामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने तेलटंचाईच्या धोक्याबरोबरच तेलाच्या किंमती वाढण्यास सुरूवात झाली आहे. इराणच्या हुथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यानंतर अबाकिक आणि खुराइस याठिकाणी मोठ्या आगी लागल्या. सौदी अरेबिया, येमेनमधील बंडाळी मोडून काढण्यासाठी अरब देशांच्या संयुक्त लष्करी मोहिमेचे नेतृत्त्व करत आहे. त्यालाही इराणचा विरोध आहे. सौदी जवानांनी शेजारच्या येमेनमध्ये घुसून मध्यंतरी हुथी बंडखोरांच्या मुख्य ठाण्यावर हल्ला केला होता. अरामकोवरील ड्रोनहल्ला हा त्याचा बदला असावा, असे मानण्यास जागा आहे. सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन तातडीने घटवल्यानंतर जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी दिवसाला ५.७ मिलियन बॅरल (एक बॅरल म्हणजे १५९ लिटर) म्हणजेच ५ टक्के उत्पादन कमी होणार आहे, असे सौदीच्या अरामकोने म्हटले आहे.
अमेरिकेच्या ऊर्जा माहिती केंद्राच्या म्हणण्यानुसार, ऑगस्टमध्ये सौदी अरेबियाचे तेल उत्पादनाचे प्रमाण दिवसाला ९.८५ मिलियन बॅरल होते. दरम्यान, अरामकोच्या दोन क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्याचा परिणाम गॅस उत्पादनावरही झाल्याचे सौदीने म्हटले आहे. “हल्ल्यामुळे गॅस उत्पादनाही थांबले आहे. याचा परिणाम म्हणून इथेन आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ५० टक्क्यांनी कमी होणार आहे”, अशी माहिती सौदीचे ऊर्जा मंत्री अब्दुल अजीज बिन सलमान यांनी दिली आहे. ड्रोनच्या या हवाई हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. आपत्कालीन पथकाने तातडीने हालचाली केल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. अरामकोने जाहीर केले आहे की उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यांच्या अंदाजानुसार बंद केलेल्यापैकी काही उत्पादन लगेचच सुरू केले जाईल. मात्र सारी स्थिती पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागेल. किती काळ सौदी पुरवठा कमी राहणार, हे मात्र अद्यापी स्पष्ट झालेले नाही.
तेलाच्या या चिंतेच्या वातावरणाचा परिणाम जागतिक शेअर बाजारावरही दिसून आला. भारतीय बाजारही कोसळले. डॉलरच्या तुलनेत रूपयाही घसरला. प्रत्यक्षात येमेनमध्ये सौदी करत असलेल्या संयुक्त लष्करी कारवायांच्या विरोधात तेथील बंडखोरांनी हल्ले केले असे भासवले जात असले तरीही ते ड्रोन येमेनमधून उडालेच नव्हते तर इराणमधूनच चालवले जात होते असा आरोप सौदीने केला आहे. इराणच्या विरोधातील अमेरिकेची पावले अधिक गंभीर होतील असे अमेरिकने सूचित केले आहे. त्यांनी इराणवर आक्रमण करायचे ठरवले तर मात्र तेलाची स्थिती अधिकच अवघड बनणार आहे. तेलाच्या किंमतीमधील चढउताराचा भारतावर मोठा परिणाम होतो, कारण आपण गरजेच्या ८३ टक्के खनिज तेल आयातच करतो. इराण हा आपल्या मित्र देशांपैकी सर्वात स्वस्त तेल तर देतच होता. शिवाय तो व्यापार आपल्या चलनात होत होता. हा भारत सरकारचा मोठा फायदा होता. अमेरिकेच्या धोरणांमुळे तिथे आपली अडचण होत आहे.
सध्या अमेरिका हा जगातील सर्वाधिक खनिज तेल उत्पादन करणारा देश बनला आहे. पण आपण अमेरिकेकडून आपल्या गरजेच्या फक्त ५ टक्के तेल खरेदी करतो. तरीही गतवर्षाचा आपला अमेरिकेबरोबरचा तेल व्यापार चार बिलियन डॉलर्स इतका होता. तो वाढवण्यासाठी सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप प्रयत्न करत आहेत. इराणवरील तेलबंदी व सौदीमधील अडचणीमुळे ट्रंप यांना ती संधी मिळणार आहे. त्यामुळेच की काय अमेरिकेत ह्यूस्टन येथे पुढच्या सप्ताहात होणाऱ्या अनिवासी भारतीयांच्या परिषदेमध्ये ट्रंप महाशय हजेरी लावणार आहेत. हा निर्णय सौदी तेल संकटानंतर लगेचच जाहीर झाला आहे. अर्थातच त्याचा व सौदीमधील घटनांचा संबंध नसावा, असे आपण गृहीत धरले पाहिजे! ह्यूस्टन परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असणार आहेत. भारतीय पंतप्रधानांसह अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची हजेरी हे या परिषदेचे मोठेच आकर्षण ठरले आहे. जागतिक तेल संकटासंदर्भात या परिषदेचे आगळे महत्त्व असे आहे की, ह्यूस्टन शहर हे जगाच्या ऊर्जा व्यवसायाची राजधानी मानले जाते. जगभरात तेल उत्पादक व तेल संशोधन, उत्खनन करणाऱ्या मोठमोठ्या पाचशे कंपन्या याच शहरात वसल्या आहेत. शिवाय खनिज तेल उद्योगाला विविध सेवा पुरवणाऱ्या आणखी चार हजार मोठ्या कंपन्याही इथेच वसल्या आहेत. खनिज तेलाच्या जागतिक राजधानीत ट्रंप आणि मोदी एकत्र जात आहेत हे विशेष!”
“अनिकेत जोशी..
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com”
“भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा खनिज तेलाचा पुरवठा करणारा देश इराण असून त्यावर सध्या अमेरिका चिडलेलीच आहे. पहिला क्रमांक आहे इराकचा. तिथून आपण चार कोटी ६६ लाख मे. टन इतके तेल आणतो. सौदी अरेबियाकडून दुसऱ्या क्रमांकाने म्हणजे चार कोटी टन खनिज तेल आपल्याला मिळते. इराणकडून आपण दोन कोटी ३९ लाख मे. टन तेल घेत होतो. अमेरिकेने आता जाचक व्यापारनिर्बध लावले असल्याने भारतासह सर्व देशांनी इराणबरोबर व्यापारी संबंध ठेवू नयेत, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. पण इराणकडून जर जगाला तेल मिळणार नसेल तर तेलाचा अधिकचा पुरवठा करण्याची जबाबदारी ज्या सौदी अरेबियावर अमेरिकेने टाकली होती तिथेच इराणी बंडखोरांच्या एका गटाने हल्ला चढवला असून त्याचा सरळ फटका भारताला बसणे क्रमप्राप्तच आहे. शनिवारी झालेल्या त्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या किंमती कडाडत आहेत. सोमवारी एका दिवसात खनिज तेलाच्या किंमती ६०.२५ डॉलर प्रती बॅरलवरून थेट १९ टक्क्यांनी वाढल्या आणि दिवसभराच्या व्यवहारात त्या प्रती बॅरल ७१.५७ डॉलर अशा चढल्या. बाजार बंद होताना त्यात थोडा उतार आला तरी ६६.३१ डॉलर प्रती बॅरल दर राहिला. एकाच दिवसात झालेली इतकी मोठी वाढ जगाने १९९१मधील आखाती युद्धानंतर प्रथमच अनुभवली आहे.”
“जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती दहा डॉलरनी वाढतात तेव्हा त्यानंतरच्या पंधरवड्यात भारतीय बाजारात पेट्रोल, डिझेलचे दर लीटरमागे ५ ते ६ रूपयांनी वाढवावे लागतात. गॅस पुरवठ्यावरही परिणाम होणार, असे अरामकोने जाहीरच केले आहे. त्यामुळे तिथेही किंमतवाढ अटळ आहे. भारताचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने स्थितीचा आढावा घेतला. भारताचे सौदी अरेबियातील राजदूत अरामकोच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. भारताला होणारा खनिज तेलाचा पुरवठा कमी होणार नाही असे आश्वासन त्यांना मिळाल्याचे प्रधान यांनी जाहीर केले आहे. डिझेल, पेट्रोलच्या किंमतीचा हा भडका महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदलवण्यास वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकेल का, महिन्याभरात आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तेलाच्या किंमतींचा थेट संबंध ग्राहक वस्तू निर्देशांकाशी असतो. तेल वाढले की सर्वच वस्तुंचे भाव वाढतात. महागाई वाढणे हा राजकीय परिणाम करणारा एक घटक असतोच असतो. इराणच्या हुथी बंडखोरांनी सौदी सरकारच्या मालकीच्या अरामको तेल कंपनीच्या दोन तेल शुद्धीकरण केंद्रांवर ड्रोनच्या सहाय्याने बाँबहल्ले केले. ड्रोनच्या सहाय्याने जगाला धसकवणारा हा पहिलाच हल्ला ठरावा. तेल क्षेत्रांवरील या हवाई हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने ५० टक्के तेल उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.”
“सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. या निर्णयामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने तेलटंचाईच्या धोक्याबरोबरच तेलाच्या किंमती वाढण्यास सुरूवात झाली आहे. इराणच्या हुथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यानंतर अबाकिक आणि खुराइस याठिकाणी मोठ्या आगी लागल्या. सौदी अरेबिया, येमेनमधील बंडाळी मोडून काढण्यासाठी अरब देशांच्या संयुक्त लष्करी मोहिमेचे नेतृत्त्व करत आहे. त्यालाही इराणचा विरोध आहे. सौदी जवानांनी शेजारच्या येमेनमध्ये घुसून मध्यंतरी हुथी बंडखोरांच्या मुख्य ठाण्यावर हल्ला केला होता. अरामकोवरील ड्रोनहल्ला हा त्याचा बदला असावा, असे मानण्यास जागा आहे. सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन तातडीने घटवल्यानंतर जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी दिवसाला ५.७ मिलियन बॅरल (एक बॅरल म्हणजे १५९ लिटर) म्हणजेच ५ टक्के उत्पादन कमी होणार आहे, असे सौदीच्या अरामकोने म्हटले आहे.”
“अमेरिकेच्या ऊर्जा माहिती केंद्राच्या म्हणण्यानुसार, ऑगस्टमध्ये सौदी अरेबियाचे तेल उत्पादनाचे प्रमाण दिवसाला ९.८५ मिलियन बॅरल होते. दरम्यान, अरामकोच्या दोन क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्याचा परिणाम गॅस उत्पादनावरही झाल्याचे सौदीने म्हटले आहे. “हल्ल्यामुळे गॅस उत्पादनाही थांबले आहे. याचा परिणाम म्हणून इथेन आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ५० टक्क्यांनी कमी होणार आहे”, अशी माहिती सौदीचे ऊर्जा मंत्री अब्दुल अजीज बिन सलमान यांनी दिली आहे. ड्रोनच्या या हवाई हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. आपत्कालीन पथकाने तातडीने हालचाली केल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. अरामकोने जाहीर केले आहे की उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यांच्या अंदाजानुसार बंद केलेल्यापैकी काही उत्पादन लगेचच सुरू केले जाईल. मात्र सारी स्थिती पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागेल. किती काळ सौदी पुरवठा कमी राहणार, हे मात्र अद्यापी स्पष्ट झालेले नाही.”
“तेलाच्या या चिंतेच्या वातावरणाचा परिणाम जागतिक शेअर बाजारावरही दिसून आला. भारतीय बाजारही कोसळले. डॉलरच्या तुलनेत रूपयाही घसरला. प्रत्यक्षात येमेनमध्ये सौदी करत असलेल्या संयुक्त लष्करी कारवायांच्या विरोधात तेथील बंडखोरांनी हल्ले केले असे भासवले जात असले तरीही ते ड्रोन येमेनमधून उडालेच नव्हते तर इराणमधूनच चालवले जात होते असा आरोप सौदीने केला आहे. इराणच्या विरोधातील अमेरिकेची पावले अधिक गंभीर होतील असे अमेरिकने सूचित केले आहे. त्यांनी इराणवर आक्रमण करायचे ठरवले तर मात्र तेलाची स्थिती अधिकच अवघड बनणार आहे. तेलाच्या किंमतीमधील चढउताराचा भारतावर मोठा परिणाम होतो, कारण आपण गरजेच्या ८३ टक्के खनिज तेल आयातच करतो. इराण हा आपल्या मित्र देशांपैकी सर्वात स्वस्त तेल तर देतच होता. शिवाय तो व्यापार आपल्या चलनात होत होता. हा भारत सरकारचा मोठा फायदा होता. अमेरिकेच्या धोरणांमुळे तिथे आपली अडचण होत आहे.”
“सध्या अमेरिका हा जगातील सर्वाधिक खनिज तेल उत्पादन करणारा देश बनला आहे. पण आपण अमेरिकेकडून आपल्या गरजेच्या फक्त ५ टक्के तेल खरेदी करतो. तरीही गतवर्षाचा आपला अमेरिकेबरोबरचा तेल व्यापार चार बिलियन डॉलर्स इतका होता. तो वाढवण्यासाठी सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप प्रयत्न करत आहेत. इराणवरील तेलबंदी व सौदीमधील अडचणीमुळे ट्रंप यांना ती संधी मिळणार आहे. त्यामुळेच की काय अमेरिकेत ह्यूस्टन येथे पुढच्या सप्ताहात होणाऱ्या अनिवासी भारतीयांच्या परिषदेमध्ये ट्रंप महाशय हजेरी लावणार आहेत. हा निर्णय सौदी तेल संकटानंतर लगेचच जाहीर झाला आहे. अर्थातच त्याचा व सौदीमधील घटनांचा संबंध नसावा, असे आपण गृहीत धरले पाहिजे! ह्यूस्टन परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असणार आहेत. भारतीय पंतप्रधानांसह अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची हजेरी हे या परिषदेचे मोठेच आकर्षण ठरले आहे. जागतिक तेल संकटासंदर्भात या परिषदेचे आगळे महत्त्व असे आहे की, ह्यूस्टन शहर हे जगाच्या ऊर्जा व्यवसायाची राजधानी मानले जाते. जगभरात तेल उत्पादक व तेल संशोधन, उत्खनन करणाऱ्या मोठमोठ्या पाचशे कंपन्या याच शहरात वसल्या आहेत. शिवाय खनिज तेल उद्योगाला विविध सेवा पुरवणाऱ्या आणखी चार हजार मोठ्या कंपन्याही इथेच वसल्या आहेत. खनिज तेलाच्या जागतिक राजधानीत ट्रंप आणि मोदी एकत्र जात आहेत हे विशेष!”

