HomeArchiveमुंबई महापौरांच्या कंपनीच्या...

मुंबई महापौरांच्या कंपनीच्या पत्त्यावर ८ बोगस कंपन्या?

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कंपनीच्या मुंबईतल्या पत्त्यावर आठ वेगवेगळ्या बोगस कंपन्यांची नोंदणी झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी केला असून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.”
 
“डॉ. सोमैया यांनी याबाबत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) भूषण गगराणी यांना पत्र पाठवले आहे. यात त्यांनी हा दावा केला आहे. मुंबईच्या महापौरांची कंपनी ज्या पत्त्यावर रजिस्टर्ड आहे. त्याच पत्त्यावर ८ बोगस कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत. त्या सगळ्याच कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भातील मालकी हक्क, आर्थिक हितसंबंध, व्यवहारातील पारदर्शकता आणि त्यातील खुलासाबाबत (disclosure) स्पष्टता हवी असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.”
  

 
” महापौरांच्या कंपनीला महापालिकेचे कंत्राट मिळाल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. मुंबईच्या महापौर आणि त्यांचे सुपुत्र यांची किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वरळीच्या गोमती जनता सोसायटी, जी के कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ या पत्त्यावर रजिस्टर्ड आहे. याच पत्त्यावर आणखी ८ ड्युबिअस कंपन्याही रजिस्टर आहेत. तेव्हा या सर्व प्रकरणाबाबत योग्य तो खुलासा व्हावा मागणी डॉ. सोमैया यांनी केली आहे.”
  

 
या कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणेः
 
1. वेअसेल वेंचर्स प्रा. लि. (Weasel Ventures Pvt Ltd)
 
2. फिक्स 24*7 फिजिओ प्रा. लि. (Fix 24*7 Physio Pvt Ltd) 
 
3. एम्को ग्लोबल प्रा. लि. (Emco Global Pvt Ltd)
 
4. हॅमस्टर वेंचर्स प्रा. लि. (Hamster Ventures Pvt Ltd)
 
5. लिली वेंचर्स प्रा. लि. (Lily Ventures Pvt Ltd)
 
6. एम्को वेंचर्स प्रा. लि. (Emco Ventures Pvt Ltd)
 
7. डी अॅण्ड बी आय अॅक्सेस एलएलपी (D & B I ACcess LLP)
 
8. टीझल व्हेंचर्स प्रा. लि. (Teasel ventures Pvt Ltd)
 
“या कंपन्या बोगस असून त्यांच्या व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. सोमैया यांनी केली आहे.”

Continue reading

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...
Skip to content