Details
पार्ले महोत्सवातील सहभागी होणार क्रीडा व सांस्कृतिक मित्र! क्रीडामंत्री विनोद तावडे यांची ग्वाही
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
खेळून काही मार्क वाढणार नाही किंवा पोट भरणार नाही, ही मानसिकता बदलून टाकण्यासाठी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढविण्याचा आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या क्रीडा विभागाने घेतला आहे, म्हणून भरपूर खेळा आणि खूप आनंद लुटा, असा सल्ला देत महाराष्ट्राचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पार्ले महोत्सवात सहभागी झालेल्यांना क्रीडा मित्र व सांस्कृतिक मित्र म्हणून नेमण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
या महोत्सवाची 19 वर्षांपूर्वी संकल्पना मनात आल्यानंतर पराग अळवणी यांच्याशी चर्चा करताना त्याला आपणच पार्ले महोत्सव हे नाव सुचविले, हे मी माझे भाग्य समजतो. कारण पार्ले महोत्सव सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातला वैशिष्ट्यपूर्ण नि आगळावेगळा असा महाराष्ट्रातला एकमेव महोत्सव असावा. यंदा त्याला सीएम चषकाचीदेखील जोड आहे. त्यामुळे सहभागी होणाऱ्यांसाठी अभिमानास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.”
“केएचएल न्यूज ब्युरो