Details
एक ते दहा अमिताभ!
01-Jul-2019
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
`जंजीर’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर अमिताभ बच्चन रातोरात सुपरस्टार झाले. त्यांच्याआधी राजेश खन्ना सुपरस्टार होते. पण त्यांचे सुपरस्टारपद औटघटकेचे ठरले. अमिताभ यांची लोकप्रियता इतकी झपाट्याने वाढली की, सिनेसृष्टीत एक ते दहा क्रमांकात केवळ अमिताभ असल्याचे कौतुकाने बोलले जाऊ लागले.
आज हे आठवण्याचे कारण असे की, `जंजीर’ हा चित्रपट 1973 साली प्रदर्शित झाला. तेव्हापासून अमिताभ यांनी जी यशस्वी घोडदौड सुरू केली ती आज 46 वर्षांनंतरदेखील कायम आहे. अमिताभ आज 76 वर्षांचे आहेत. पण आजही त्यांच्या प्रमुख भूमिका असलेले चित्रपट चाहत्यांची तुफान गर्दी खेचत आहेत. गेल्या शुक्रवारी अमिताभ यांचा `बदला’ हा नवा चित्रपट प्रदर्शित झाला. यात नव्या दमाची अभिनेत्री तापसी पन्नू हिच्यासोबत प्रमुख भूमिकेत अमिताभ बच्चन आहेत. किंबहुना, या दोघांच्याच व्यक्तिरेखा प्रमुख आहेत. सुरुवातीपासून अखेरपर्यंत हा चित्रपट आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतो. त्यात अमिताभ बच्चन यांचा लाजवाब अभिनय नेत्रदीपक ठरतो. अमिताभ यांचे हे यश स्तुत्य असेच आहे.
`जंजीर’च्या यशानंतर अमिताभ यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता. फक्त दूरदर्शन आणि आकाशवाणी ही दोन सरकारी माध्यमे महत्त्वाची होती. त्यावेळी जया बच्चन यांची आकाशवाणीवर मुलाखत झाली असता त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. अमिताभ बच्चन यांच्या यशामागील गुपित त्यांना विचारले गेले. त्यावेळी जया बच्चन यांनी फार सुंदर उत्तर दिले. त्या म्हणाल्या, `शिखरावर चढणे एकवेळ सोपे असते. पण त्या शिखरावर टिकून राहण्यासाठी केवळ गुणवत्ता आणि परिश्रम हे दोनच गुण कामी येतात.’
अमिताभ यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीने आपल्या पत्नीचे बोल खरे करून दाखविले आहेत. चित्रपटसृष्टी म्हणजे मायानगरी आहे. पडद्यावर जे दिसते ते वास्तव नसते. किंबहुना, चित्रपटसृष्टीतील झगमगाटामागे अनेक शोकांतिका घडत असतात. त्यात दीर्घकाळ जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहणे तर अत्यंत कठीण काम. हे दिव्य अमिताभ यांनी परिश्रम, चिकाटी, सचोटी आणि शिस्तप्रियता यांच्याच बळावर यशस्वी केले आहे. आज अमिताभ अमृतमहोत्सवी वाटचाल पूर्ण करून 80 कडे झुकले आहेत. त्यांना अनेक आजार आहेत. त्यासाठी त्यांना वेळच्यावेळी औषधे घ्यावी लागतात आणि खाण्या-पिण्याची पथ्येदेखील पाळावी लागतात. ती सारी पथ्ये पाळून अमिताभ बारा ते सोळा तास काम करतात, हे विशेष!
अमिताभ ऐन भरात असताना `कुली’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी ते मृत्यूशय्येवर असताना संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करीत होता. सुदैवाने अमिताभ बचावले. त्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक बनली. पण या प्रकृतीवर मात करून ते इच्छाशक्ती आणि शिस्त यांच्या बळावर आजही कार्यमग्न आहेत. सिनेसृष्टीत अनेक अभिनेते येतात आणि जातात. प्रत्येकाचे आपापले दिवस असतात. सिनेसृष्टीतील यश म्हणजे `चार दिन की चांदनी’ मानले जाते. पण कोणत्याही क्षेत्रात माणसाने शिस्त राखली आणि परिश्रम केले तर तो पाय रोवून ठामपणे उभा राहू शकतो, हे अमिताभ यांच्या उदाहरणावरून दिसून येते.
अमिताभ यांच्या जीवनात असंख्य चढउतार आले. ते काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेले. पण राजकारण त्यांना मानवले नाही. बोफोर्स प्रकरणात टीका होताच ते राजकारण सोडून पुन्हा सिनेसृष्टीत आले. त्यांनी स्वत:ची `केबीसीएल′ नामक कंपनी सुरू केली. पण ही कंपनी दिवाळखोरीत गेली. अमिताभ कर्जबाजारी झाले. मात्र आपल्याकडे असलेल्या कलेच्या बळावर ते फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून उठून उभे राहिले. आज वयाच्या 77 व्या वर्षीदेखील अमिताभ एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने काम करत आहेत. अमिताभ यांचा आदर्श नव्या पिढीने घेण्यासारखा आहे.”
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर