Homeचिट चॅट893 दशलक्ष मेट्रिक...

893 दशलक्ष मेट्रिक टन, भारताची कोळसा उत्पादनात विक्रमी वाढ!

2022-23 या वर्षात देशात कोळशाचे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन झाले. 2021-22 या वर्षात 778.21 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले होते. 2022-23 या वर्षात ते उत्पादन 14.77% वाढीसह 893.19 दशलक्ष टन (तात्पुरते) इतके नोंदले गेले.

आधीच्या वर्षीच्या तुलनेत 2022-23 या वर्षात महाराष्ट्रासह आसाम, छत्तिसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमध्ये कोळसा उत्पादनात वाढ झाली आहे.

तर 2022-23 या वर्षात जम्मू काश्मीरमध्ये याच कालावधीत कोळसा उत्पादन घसरले आहे. देशांतर्गत उत्पादन/ पुरवठा याद्वारे कोळशाला असलेली देशातील गरज, मागणी पूर्ण केली जाते. देशातील कोळसा उत्पादन वाढवणे आणि कोळशाची आयात कमी करणे यावर सरकारचा भर आहे. केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content