भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने शिफारस केलेल्या 850 खेळाडूंमधून निकष प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आगामी आशियाई खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी नुकतीच मान्यता दिली. ज्या खेळाडूंनी निवड निकष पूर्ण केले आहेत अशा 38 क्रीडा प्रकारातील 634 खेळाडूंना भाग घेण्यास मंजुरी दिली आहे.

2018 मध्ये झालेल्या शेवटच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण 572 भारतीय खेळाडूंनी भाग घेतला होता. ज्या मध्ये भारताने 16 सुवर्ण पदकांसह 70 पदकं मिळवली होती.


