Homeब्लॅक अँड व्हाईटजातवैधता प्रमाणपत्र सादर...

जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्याची मुदत

अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन 2024 -25मध्ये शैक्षणिक संस्थांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.

जातवैधता

राज्यात 20 फेब्रुवारी 2024 रोजी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम (एसईबीसी) 2024 एकमताने संमत करण्यात आला. या अधिनियमानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये आणि शासकीय-निमशासकीय नोकऱ्यांमध्ये सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात आले. याचा लाभ प्रामुख्याने मराठा समाजाला झाला आहे.

जातवैधता

एसईबीसी अधिनियमाचा लाभ घेऊन शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत होत्या. यामुळे एसईबीसी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीचा सकारात्मक विचार करुन प्रमाणपत्र सादर करण्यास अर्ज केल्याच्या सहा महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.

Continue reading

व्हाईट लोटस हॉस्पिटलतर्फे रविवारी मोफत तपासण्या शिबीर

सणासुदीच्या मोसमाच्या निमित्ताने नवी मुंबईत आरोग्यविषयक सर्वात मोठी तसेच व्यापक मोहीम सुरू करताना कळंबोली येथील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विविध स्वरूपाच्या मोफत तपासणी शिबिराचे...

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...
Skip to content