Homeमुंबई स्पेशलमुंबईत यापुढे होणार...

मुंबईत यापुढे होणार ६ मीटर रुंदीच्या रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण!

डांबरी रस्त्यांवर पावसाळी पाण्यामुळे खड्डे तयार होण्याची समस्या निर्माण होते. ही बाब लक्षात घेता यापुढे मोठ्या रस्त्यांसह ६ मीटर रुंदीच्या लहान रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण मुंबई महापालिका प्रशासनाने अवलंबले असून त्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

मुंबई महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असतात. रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरीत बुजविण्याचे कार्य पालिकेतर्फे हाती घेण्यात येते. त्यासाठी पालिकेच्या वरळी स्थित धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) येथे निर्मित कोल्ड मिक्स पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांना त्यांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे नियमितपणे पुरवण्यात येतो.

रस्त्यांवर खड्डे होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा आमंत्रित करून पालिकेने कंत्राटदार नियुक्त केलेले आहेत. हे कंत्राट द्विवार्षिक स्वरुपाचे आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयाला दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित ५० लाख रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी दिले आहेत.

याशिवाय, प्रकल्प रस्ते व दोष दायित्व कालावधीत असलेले रस्ते संबंधित नियुक्त कंत्राटदाराकडून निविदेतील अटी व शर्तींनुसार मर्यादित वेळेत तसेच विनामूल्य भरण्यात येतात. हे खड्डे भरण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कोणताही मोबदला/अधिदान दिले जात नाही.

या अनुषंगाने यंदाचा विचार करता, महापालिकेतर्फे ९ एप्रिल २०२१ ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये खड्डे बुजविण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे. त्यात महानगरपालिकेच्या धूम्रजतू  संयंत्र  (अस्फाल्ट प्लांट) मार्फत २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांना मिळून एकूण २ हजार ६९६ मेट्रिक टन (१ लाख ०७ हजार ८४३ बॅग) वितरित करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत विभाग कार्यालयातील उपलब्ध पालिकेच्या नियमित कामगारांमार्फत २२ हजार ८९७ खड्डे बुजविण्यात आलेले  आहेत. या बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ ४९ हजार ९१९ चौरस मीटर आहे. तसेच, खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत ८ हजार ५०१ खड्डे बुजविण्यात आले आहेत. या बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ १ लाख ०६ हजार ९८५ चौरस मीटर आहे. म्हणजेच मुंबई महापालिकेने ९ एप्रिल २०२१ ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील एकूण ३१ हजार ३९८ खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख ५६ हजार ९१० चौरस मीटर इतके होते.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content