Homeडेली पल्स5000 पट्ट्यांचे होणार...

5000 पट्ट्यांचे होणार लवकरच वाटप..

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशातील सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एक आदिवासी परिवारातील सुपुत्री विराजमान झाली. यामुळे आदिवासी समाजाचा बहुमान वाढला. मोदींच्या कार्यकाळात आदिवासी समाजातील बंधू-भगिनींना आपल्या हक्काचे जमिनींचे पट्टे मिळाले. येत्या काळात उर्वरित 5000 पट्ट्यांचे वाटप होईल, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

नंदुरबार लोकसभेच्या भाजपा उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ शिरपूर, धुळे येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आ. अमरिश पटेल यांच्या प्रयत्नांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शिरपूरमध्ये पाण्याचे नियोजन झाले व शिरपूर पॅटर्न तयार झाला. संपूर्ण महाराष्ट्राने हा पॅटर्न स्वीकारला आणि यामुळे शेतीमध्ये पाणी पोहोचून अनेक भाग दुष्काळमुक्त झाले. शिरपूर शिक्षणाचे हब झाल्यामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळाले. आदिवासी समाजातील युवक-युवतींना उच्चशिक्षण मिळावे यासाठी अमरिशभाई यांनी मोलाचे कार्य केले, असेही ते म्हणाले.

या भागात अनेर धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून मिळणे, अरुणावती नदीवर 5 बंधारे बांधणे आणि शिरपूरमध्ये एमआयडीसी सुरु करणे अशा सर्व विकासकामांबद्दल राज्य सरकारद्वारे प्रयत्न केले जातील. मजबूत भारताच्या निर्मितीसाठी नंदुरबारची जनता मोदींच्याच मागे उभी राहील. डॉ. हिना गावित यांचे लोकसभा सदस्य म्हणून केलेले काम लक्षात घेण्यासारखे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

यावेळी आ. अमरिश पटेल, आ. राजेश पाडवी, आ. काशिराम पावरा, आ. आमश्या पाडवी, आ. मंजुळा गावित, विजया रहाटकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content