Details
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
“सर्वत्र टेक्नोलॉजीज, या भारतातील आघाडीच्या तंत्रज्ञान पुरवठादार कंपनीने आपल्या युपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेज) प्लॅटफॉर्मवर 50 सहकारी बँकांचा समावेश केल्याचे जाहीर केले असून त्यामुळे या बँका भारतातील सर्व मोठ्या बँकांसह इंटरऑपरेबल होणार आहेत. या महत्त्वाच्या कामगिरीमुळे कंपनीच्या युपीआय प्लॅटफॉर्मवरील सहकारी बँकांच्या संख्येत 170 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे.”
“युपीआय हे मोबाइल-फर्स्ट या तत्त्वावर आधारित जगातील पहिले खऱ्या अर्थाने इंटरऑपरेबल प्लॅटफॉर्म आहे. सहकारी बँकांचा आपल्या युपीआय प्लॅटफॉर्मवर समावेश करत सर्वत्र टेक्नोलॉजीजने त्यांना इतर मोठ्या खासगी व सार्वजनिक बँकांबरोबर आणले आहे. युपीआय किंवा तत्काळ रियल-टाइम पैसे भरण्याच्या यंत्रणेमुळे मोबाइल प्लॅटफॉर्मवरून आंतर-बँकिंग व्यवहार होतात. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, तंत्रज्ञानाद्वारे बँक खाते स्मार्टफोनला जोडून दोन पक्ष व त्यांच्या बँक खात्यामधे पैशांच्या हस्तांतराला परवानगी दिली जाते. याचाचअर्थ संबंधित सहकारी बँकेच्या ग्राहकाला गुगल पे, पेटीएम किंवा एनपीसीआयचे भीम एप वापरून पैसे सहजपणे पाठवता किंवा मिळवता येणार आहेत. कंपनीच्या युपीआय प्लॅटफॉर्मवरसहभागी झालेल्या बँका देशातील 11 राज्यांतल्या असून त्यात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक यांचा समावेश आहे. यानिमित्ताने सर्वत्र युपीआय प्लॅटफॉर्मवर बँका मोठ्या प्रमाणावर लाइव्ह झाल्या आहेत.”
“सर्वत्रच्या सर्वसमावेशक युपीआय प्लॅटफॉर्ममधे पीएसपी (पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर) युपीय स्विच, कॉमन क्रिप्टोग्राफिक लायब्ररी मोबाइल अप्स, इश्युअर (बँक्स) युपीआय स्विच, देखरेख, व्यवस्थापन आणि कामकाजासाठी वेब बेस्ड अप्लिकेशन, रिस्क इंजिन, रिकन्सिलिएशन सिस्टीम, युपीआय पीएसपी मोबाइल अप्लिकेशन आणि मोबाइल अप्लिकेशनसर्व्हर अशा विविध घटकांचा समावेश आहे. ही संपूर्ण यत्रणा सहकारी बँकांना पीएएस (प्लॅटफॉम अज अ सर्व्हिस) म्हणून दिली जाणार असून एरवी ती परवडली नसती. यामुळे अगदी लहान सहकारी बँकेलाही युपीआय पेमेंट यंत्रणेत सहभागी होणे शक्य झाले आहे.”
“2017- 18मध्ये सर्वत्र युपीआयवर पहिली बँक लाइव्ह झाली आहे. त्यानंतर काहीच वर्षांत या बँकांच्या इतर सर्व इलेक्ट्रॉनिक सेवा वितरण चॅनेल्सच्या तुलनेत युपीआय व्यवहारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले व आज त्यांच्या ग्राहकांद्वारे केल्या जाणाऱ्या एकूण डिजिटल व्यवहारांमध्ये युपीआयचा वाटा सर्वाधिक आहे. थोडक्यात सांगायचे, तर सर्वत्र युपीआयने सहकारी बँकांना अधिक चांगल्याप्रकारे, जलद आणि कमी शुल्कात निधी स्थलांतर, युटिलिटी बिल पेमेंट सेवा उपलब्ध करून देत ग्राहक समाधान वाढवण्यास मदत केली आहे.”
“सर्वत्र टेक्नॉलॉजीने साध्य केलेल्या या लक्षणीय टप्प्याविषयी एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आस्बे म्हणाले की, ‘सर्वत्र टेक्नॉलॉजीजबरोबर सहकार्य करताना आणि त्यातून युपीआय यंत्रणेमध्ये बँकांचा व्यापक प्रमाणावर समावेश करताना आम्हाला आनंद होत आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांसाठी नवी क्षितिजे खुली होतील आणि त्यांना सफाईदारपणे व तत्काळ युपीआय पेमेंट्स करण्याची क्षमता मिळेल. एनपीसीआयच्या मते हे सहकार्य देशाच्या दुर्गम भागातील ग्राहकांना रियल टाइम, इंटरऑपरेबल पेमेंट सुविधा सहजपणे उपलब्ध करून दिल्याबद्दल डिजिटल पेमेंट यंत्रणेच्या रुपांतरणातील सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे.’”
“सर्वत्र टेक्नोलॉजीजचे संस्थापक आणि उपाध्यक्ष मंदार आगाशे म्हणाले की, ‘सर्वत्रने आपल्या प्लॅटफॉर्मवर 50 शहरी सहकारी बँकांच्या ग्राहकांचा समावेश केल्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला असून यामुळे त्यांना इतर मोठ्या, सार्वजनिक आणि खासही बँकांच्या ग्राहकांप्रमाणे आपले बँक खाते गुगल पे, फोनपे, व्हॉट्सअप पे, भीम युपीआय अशा कोणत्याही पीएसपी एपशी जोडता येणार आहे. युपीआय सर्व पीएसपीवर वापरता येण्यासारखे आणि सर्वात सुरक्षित तंत्रज्ञानांपैकी एक असून त्याद्वारे दुर्गम भागातील आणि तळागाळातीललोकांपर्यंत आर्थिक सर्वसमावेशकता पोहोचवली जात आहे. याचमुळे देशातील इतर सहकारी बँका, डीसीसीबी आणि एससीबीजना लवकरात लवकर युपीआय प्लॅटफॉर्मवर समाविष्ट करणे आवश्यक झाले आहे.’”

