Homeबॅक पेजकुटूंब नियोजनासाठी केली...

कुटूंब नियोजनासाठी केली 5.88 कोटी कंडोमची खरेदी!

नवी दिल्लीतली केन्द्रीय वैद्यकीय सेवा संस्था (सीएमएसएस), एक स्वायत्त संस्था असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली केंद्रीय खरेदी एजन्सी आहे. राष्ट्रीय कुटूंब नियोजन कार्यक्रम आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी ती कंडोम खरेदी करते. सीएमएसएसने मे 2023मध्ये कुटूंब नियोजन कार्यक्रमासाठी 5.88 कोटी कंडोम खरेदी केले. कुटूंब नियोजन कार्यक्रमाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कंडोमचा सध्याचा साठा पुरेसा आहे.

देशाची केंद्रीय खरेदी संस्था, केन्द्रीय वैद्यकीय सेवा संस्था (सीएमएसएस) गर्भनिरोधक वस्तूंच्या खरेदीत अयशस्वी झाली आहे. त्यामुळे भारताच्या कुटूंब नियोजन कार्यक्रमावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आरोप करणारे काही माध्यम अहवाल आले आहेत. असे अहवाल चुकीचे असून दिशाभूल करणारी माहिती देणारे आहेत, असे संस्थेन

सध्या, एनएसीओ ला मेसर्स एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कडून 75% मोफत कंडोमचा पुरवठा होत आहे. सीएमएसएस सोबत झालेल्या अलीकडील मंजुरींच्या आधारावर 2023-24साठी उर्वरित 25% मात्रा ठेवण्याची तयारी ते करत आहे. मेसर्स एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कडून ऑर्डर केलेल्या 66 दशलक्ष कंडोमद्वारे एनएसीओची आवश्यकता पूर्ण केली जात आहे. ऑर्डर सध्या पुरवठाच्या अधीन आहे आणि एका वर्षाच्या आवश्यकतेसाठी मागणीपत्र सक्षम अधिकाऱ्याच्या मान्यतेने मेसर्स एचएलएल लाईफ केअर लिमिटेड आणि सीएमएसएस यांच्याकडे ठेवले जातील. सीएमएसएसद्वारे खरेदीला विलंब झाल्यामुळे तुटवड्याचे कोणतेही उदाहरण नाही.

सीएमएसएसने चालू आर्थिक वर्षात विविध प्रकारच्या कंडोमच्या खरेदीसाठी आधीच निविदा प्रकाशित केल्या आहेत आणि या निविदा अंतिम टप्प्यात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमांसाठी सीएमएसएस द्वारे निविदा प्रक्रिया, विविध औषधे आणि वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठा स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालयात साप्ताहिक आढावा बैठक घेतली जात असल्याने काळजी करण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Continue reading

एका फ्लॅटचे दोन करताय? सावधान!

एका मोठ्या कुटुंबाला अधिक प्रायव्हसीची गरज आहे किंवा वाढत्या शहरात भाड्याने उत्पन्न मिळवण्याची संधी आहे, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील अनेकजण आपल्या मोठ्या अपार्टमेंट, फ्लॅटचे दोन भागांत विभाजन करण्याचा विचार करतात. हे एक सामान्य व्यावहारिक वास्तव आहे. पण, मुंबई उपनगरातील...

न्यायमूर्ती सूर्य कांत भारताचे पुढचे सरन्यायाधीश!

भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी न्यायमूर्ती सूर्य कांत यांची भारताचे पुढचे म्हणजेच 53वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. ते 23 नोव्हेंबरला आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश गवई यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत!

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज एक दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले. मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार...
Skip to content