Wednesday, February 5, 2025
Homeडेली पल्सबोगस विमा अधिकाऱ्यांचे...

बोगस विमा अधिकाऱ्यांचे 372 मोबाईल ब्लॉक!

बनावट एलआयसी अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून तसेच एसबीआयची बक्षिसे मिळवण्याबाबतच्या बनावट एसएमएसद्वारे लोकांना फसवले जात होते. 14 मोबाईल क्रमांकांवरून अशी फसवणूक झाल्याचे नागरिकांनी 19 मे रोजी दूरसंचार विभागाच्या निदर्शनास आणले. दूरसंचार विभागाने 24 तासांच्या आत या प्रकरणांचे विश्लेषण केले आणि संबंधित मोबाईल क्रमांकाचे सर्व दुवे शोधून काढले. त्यानंतर त्याअनुषंगाने 21 मे रोजी संपूर्ण भारतात या मोबाईल क्रमांकाशी जोडलेले 372 मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यात आले. 906 मोबाईल जोडण्या निलंबित करण्यात आल्या आणि त्यांना पुन्हा पडताळणीसाठी चिन्हांकित करण्यात आले.

नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच ‘चक्षु – रिपोर्ट संशयित फसवणूक संवाद’ या संचार साथी पोर्टलच्या (www.sancharsaathi.gov.in/sfc) सुविधेवर अशा फसवणुकीची तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे. अशा प्रकारचे सक्रीय अहवाल, दूरसंचार संसाधनांचा सायबर-गुन्हेगारी, आर्थिक

फसवणूक इत्यादींसाठी होणारा गैरवापर रोखण्यामध्ये दूरसंचार विभागाला सहाय्य करतात. दूरसंचार विभाग / भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची तोतयागिरी करणाऱ्या बनावट सूचना, संशयित फसवणूक करणारे संवाद आणि प्रेस, एसएमएस आणि सोशल मीडियाद्वारे फसवणूक अथवा दिशाभूल करणारे कॉल, याबाबत जनजागृती करण्यासाठी नियमितपणे सूचना जारी करते.

नागरिकांची सावध नजर आणि जलद कृती, केवळ त्यांचे नव्हे, तर इतर असंख्य लोकांचे घोटाळे, फिशिंग, अर्थात संवेदनशील माहिती चोरण्याचा प्रयत्न आणि फसव्या उपक्रमांना बळी पडण्यापासून संरक्षण करतात. संशयास्पद संदेश, कॉल आणि तोतयागिरीचे प्रयत्न, याबाबत तक्रार करून, हे नागरिक सायबर गुन्हेगारांपासून आपले संरक्षण करणारी पहिली फळी म्हणून काम करते. नागरिकांचा हा तत्पर दृष्टीकोन दूरसंचार विभागाला (DoT) सायबर गुन्ह्यांचा सामना आणि त्याचा प्रतिबंध करण्यासाठी उपयोगी ठरतो.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content