Homeएनसर्कलगोव्यात आजपासून नववीच्या...

गोव्यात आजपासून नववीच्या विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्र शिबीर!

रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री (आरएससी), इंडिया आणि गोव्यातील सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (एनआयओ) यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय विशेष रसायनशास्त्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 8 ते 10 ऑगस्ट या कालावधीत सीएसआयआर-एनआयओ येथे होणार आहे. विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन आणि समजून घेण्यास मदत करणे हे या शिबिराचे उद्दीष्ट आहे. विविध शाखेतील विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या उपक्रमांविषयी संशोधन आणि विद्यापीठ स्तरावरही रसायनशास्त्राचा अभ्यास करण्याची या निवासी शिबिरातून संधी मिळणार आहे.

रसायनशास्त्र शिबिर आरएससी युसूफ हमीद प्रेरणादायी विज्ञान कार्यक्रमाचा एक भाग आहे, जे सीएसआयआर-एनआयओद्वारे आयोजित करण्यात आले आहे. यात ‘जिज्ञासा कार्यक्रम’ उपक्रमात गोव्यातील सुमारे 35 शाळांमधील 70 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

या उपक्रमांतर्गत 2015 पासून देशात अशा प्रकारची 48 शिबिरे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली आहेत. ही शिबिरे विविध शाळांमधील 2500 हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असून त्यात वंचित घटकातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. हा कार्यक्रम शिक्षकांनाही उपयुक्त ठरत आहे, विविध कार्यशाळांच्या माध्यमातून 40,000 पेक्षा अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.

या शिबिरांमागील प्रेरणा म्हणजे मुंबईतील सिप्ला या फार्मास्युटिकल कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन युसूफ हमीद यांची आहे. त्यांच्या वडिलांनी 1935 मध्ये स्थापन केलेली ही कंपनी एड्स आणि कोविड-19 सारख्या आजारांवर परवडणारी जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी ओळखली जाते.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content