Homeएनसर्कलगडचिरोलीत मतदानाकरीता 267...

गडचिरोलीत मतदानाकरीता 267 कर्मचारी एअरलिफ्ट!

एअरलिफ्ट

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या शुक्रवारी, 19 एप्रिलला होणाऱ्या मतदानाकरिता 12-गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास काल सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा 65 मतदानकेंद्रावरील 72 निवडणूक पथकाच्या 267 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह काल सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या 3-एम.आय.- 17 आणि 4-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहोचविण्यात आले.

एअरलिफ्ट

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षितपणे पोहोचविण्यात येत आहे.

एअरलिफ्ट

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content