Sunday, September 8, 2024
Homeएनसर्कलकॅडीसच्या महसुलात २५...

कॅडीसच्या महसुलात २५ टक्क्यांची वाढ

कॅडीस, या व्‍यक्‍ती व व्‍यवसायांसाठी एण्‍ड-टू-एण्‍ड नेटवर्किंग आणि कनेक्‍टिव्‍हीटी सोल्‍यूशन्‍स प्रदान करणाऱ्या आघाडीच्‍या जागतिक ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने आर्थिक वर्ष २३-२४मध्‍ये महसूलात वार्षिक २५ टक्‍क्‍यांच्‍या वाढीची नोंद केली. याचे श्रेय त्‍यांच्‍या यूएसबी-सी उत्‍पादन लाइनच्‍या वाढत्‍या लोकप्रियतेला जाते. कंपनीला संपूर्ण भारतात, विशेषत: प्रमुख महानगर क्षेत्रांमध्‍ये त्‍यांच्या यूएसबी-सी सोल्‍यूशन्‍ससाठी मागणीमध्‍ये मोठी वाढ दिसण्‍यात आली.

ब्रँडने आर्थिक वर्ष २३-२४ मध्‍ये आपल्‍या मार्की यूएसबी-सी उत्‍पादन श्रेणीत सरासरी मासिक २५ टक्‍के वाढीची नोंद केली. संपूर्ण भारतात १ दशलक्षहून अधिक कॅडीस उत्‍पादनांची विक्री करण्‍यात आली, ज्‍यापैकी ७० टक्‍के विक्री प्रथम श्रेणीच्‍या शहरांमधून झाली. यामध्‍ये मुंबई, दिल्‍ली, बेंगळुरू, चेन्‍नई, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. द्वितीय श्रेणीच्‍या शहरांनी २० टक्‍क्‍यांचे योगदान दिले, तर तृतीय श्रेणीच्‍या शहरांनी ५ टक्‍के विक्रीचे योगदान दिले. देशभरातील इतर भागांमधून उर्वरित ५ टक्‍के योगदान मिळाले.

कंपनीने आपल्‍या तिमाही उत्‍पादन शिपमेंट्समध्ये ३० ते ४० टक्‍के वाढीची नोंद केली आहे. ग्राहकांची मागणी अधिक प्रमाणात कंपनीच्‍या नाविन्‍यपूर्ण व मूल्‍य-संचालित यूएसबी-सी उत्‍पादन श्रेणीला होती, जे या अपवादात्‍मक विक्री कामगिरीचे प्रमुख स्रोत ठरले. या सर्वसमावेशक लाइनअपमध्‍ये अत्‍याधुनिक, पण

किफायतशीर यूएसबी-सी केबल्‍स, हब्‍स, डॉक्‍स, अॅडप्‍टर्स यांचा समावेश आहे, ज्‍यामधून एण्‍ड-टू-एण्‍ड कनेक्‍टीव्‍हीटी सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍यात येतात. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे कॅडीसची जवळपास ३० ते ४० टक्‍के विक्री रिपीट ग्राहकांकडून होती, ज्‍यामधून ब्रँडच्‍या उत्‍पादनांमधून प्रेरित त्‍यांची प्रबळ लॉयल्‍टी दिसून येते.  

कॅडीसच्‍या सह-संस्‍थापक स्‍वाती शाह म्‍हणाल्‍या की, आम्‍हाला आमच्‍या अत्‍याधुनिक यूएसबी-सी उत्‍पादन लाइनअपप्रती ग्राहकांकडून मिळालेल्‍या सकारात्‍मक प्रतिसादाचा आनंद होत आहे. अधिकाधिक डिवाईसेस यूएसबी-सीकडे संक्रमित होत असताना आम्‍ही आमच्‍या नाविन्‍यपूर्ण, पण किफायतशीर एण्‍ड-टू-एण्‍ड नेटवर्किंग आणि कनेक्‍टिव्‍हीटी सोल्‍यूशन्‍ससह या वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी धोरणात्‍मकरित्‍या स्थित आहोत. तसेच, आम्‍ही आमच्‍या सर्व प्रमुख कनेक्‍टिव्‍हीटी सोल्‍यूशन्‍स श्रेणींमधील आमचा उत्‍पादन पोर्टफोलिओ विस्‍तारित करण्‍यास सज्‍ज आहोत.

कॅडीसने जागतिक स्‍तरावर आपली उपस्थिती वाढवण्‍यासोबत लक्षवेधक भारतीय बाजारपेठेतील आपले स्‍थान अधिक दृढ करण्‍यावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केले आहे. कंपनी भारतातील फिजिकल रिटेल आऊटलेट्समध्‍ये आपले वितरण नेटवर्क झपाट्याने वाढवत आहे आणि आपले ई-कॉमर्स चॅनेल्‍स जसे वेबसाइट, कॅडीस डॉटकॉम आणि इतर प्रमुख ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सना प्रबळ करत आहे, असेही त्यांनी सांगितले.   

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content