Homeहेल्थ इज वेल्थईश्वरी भिसेंच्या बाळांवरील...

ईश्वरी भिसेंच्या बाळांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री निधीतून २४ लाख!

पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात प्रसूतीनंतर मरण पावलेल्या ईश्वरी भिसे यांची जुळी मुलेही आज सुरक्षित जीवनासाठी संघर्ष करत असून त्यांच्या या संघर्षमय प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सढळ हस्ते साथ दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतून या जुळ्या बालकांवरील उपचारांकरीता २४ लाख रुपयांची मदत केली आहे.

पुण्यात प्रसूतीदरम्यान ईश्वरी भिसे यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र दोन्ही नवजात बाळांचे वजन अत्यल्प असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून त्यांची विशेष निगा राखण्यात येत आहे. या बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत देण्यात आली आहे. ही मदत रुग्णालयाने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार देण्यात आली आहे. यापुढेदेखील पुढील उपचारांसाठी आणखी गरज भासल्यास संपूर्ण खर्चही कक्षातूनच केला जाणार असल्याचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

ईश्वरी भिसेंच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिसे कुटुंबियांची तत्काळ भेट घेऊन त्यांना भावनिक आधार दिला होता. यावेळी त्यांनी दिलेले मदतीचे आश्वासन प्रत्यक्षात उतरवत, काल संबंधित रुग्णालयात मदतीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उपचाराकरिता एका बाळासाठी १० लाख, तर दुसऱ्या बाळासाठी १४ लाख रुपये मदत म्हणून दिली गेली आहे. सध्या दोन्ही बाळांचे उपचार पुण्याच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content