Homeन्यूज अँड व्ह्यूजगेल्या 9 वर्षांत...

गेल्या 9 वर्षांत 24.82 कोटी भारतीय बहुआयामी दारिद्र्यरेषेबाहेर!

गेल्या नऊ वर्षांत 24.82 कोटी लोकांची बहुआयामी दारिद्र्यातून मुक्तता झाली आहे. नीती आयोगाच्या ‘भारतातील बहुआयामी दारिद्र्य 2005-06पासून’ या चर्चा अभ्यासातील निष्कर्षांमध्ये, या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय हे 2013-14 ते 2022-23 ता कालावधीत दारिद्रयाच्या सर्व पैलूंवर मात करण्यासाठी सरकारने राबवलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांना देण्यात आले आहे.

नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद यांच्या हस्ते नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांच्या उपस्थितीत चर्चा अभ्यासाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. ऑक्सफर्ड पॉलिसी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (ओपीएचआय) आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी ) यांनी या अभ्यासाठी तांत्रिक सहकार्य प्रदान केले आहे.

बहुआयामी दारिद्रय निर्देशांक (एमपीआय) हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त सर्वसमावेशक मोजमाप आहे जे आर्थिक पैलूंच्या पलीकडे अनेक पैलूंमध्ये दारिद्रयाचे मूल्यांकन करते. एमपीआयची जागतिक कार्यपद्धती बळकट अल्किरे आणि फॉस्टर (एएफ) पद्धतीवर आधारित आहे जी तीव्र गरिबीचे मूल्यांकन करण्यासाठी रचना केलेल्या सार्वत्रिक मान्यताप्राप्त मापकाच्या आधारावर लोकांना गरीब म्हणून निश्चित करते, परंपरागत आर्थिक दारिद्र्य मोजमापाला पूरक दृष्टीकोन प्रदान करते.

चर्चा अभ्यासानुसार, भारतातील बहुआयामी दारिद्र्यात 2013-14मधील 29.17%वरून 2022-23 मध्ये 11.28%पर्यंत म्हणजे 17.89 टक्के घट नोंदवली गेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या नऊ वर्षात 5.94 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडले असून उत्तर प्रदेशमध्ये गरिबांच्या संख्येत सर्वात मोठी घट नोंदवली गेली आहे. त्यापाठोपाठ बिहारमध्ये 3.77 कोटी, मध्य प्रदेश 2.30 कोटी आणि राजस्थानमध्ये 1.87 कोटी लोकांची दारिद्र्यातून मुक्तता झाली आहे.

2005-06 ते 2015-16 (7.69% वार्षिक घट दर) या कालावधीच्या तुलनेत 2015-16 ते 2019-21 (10.66% वार्षिक घट दर) या कालावधीत घातांक पद्धतीचा वापर करून दारिद्रय गणना गुणोत्तरात घट होण्याचा वेग जास्त होता हेदेखील या अभ्यासात दिसून आले आहे. संपूर्ण अभ्यास कालावधीत एमपीआयच्या सर्व 12 निर्देशकांनी लक्षणीय सुधारणा नोंदवली आहे. सध्याच्या परिस्थितीशी (म्हणजे 2022-23 साठी) वर्ष 2013-14 मधील दारिद्र्य पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी, या विशिष्ट कालावधीसाठी डेटा मर्यादांमुळे अंदाजित अंदाज वापरले गेले आहेत.

गरिबीच्या सर्व आयामांचा समावेश करणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांमुळे गेल्या 9 वर्षांत 24.82 कोटी व्यक्ती बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडल्या आहेत. परिणामी, भारत 2030 पूर्वीच बहुआयामी दारिद्र्य निम्मे करण्याचे शाश्वत विकास उद्दिष्ट गाठण्याची शक्यता आहे. सर्वात असुरक्षित आणि वंचितांचे जीवन सुधारण्यासाठी सरकारचे सातत्यपूर्ण समर्पण आणि दृढ वचनबद्धता या संकल्पपूर्तीत महत्त्वपूर्ण ठरली आहे.

भारत सरकारने सर्वार्थाने गरिबी कमी करण्याच्या उद्देशाने लोकांचे जीवनमान सुधारण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. पोषण अभियान आणि पंडुरोग मुक्त भारत यांसारख्या उल्लेखनीय उपक्रमांनी आरोग्य सेवा सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे, ज्यामुळे वंचितांमध्ये सातत्यपूर्ण घट झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या अन्न सुरक्षा कार्यक्रमांपैकी एक कार्यरत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली 81.35 कोटी लाभार्थ्यांना समाविष्ट करून ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येला अन्नधान्य पुरवते. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत अन्नधान्य वितरणाचा कालावधी आणखी पाच वर्षांसाठी वाढवणे यासारखे अलीकडील निर्णय सरकारच्या वचनबद्धतेचे उदाहरण देतात. माता आरोग्य, उज्ज्वला योजनेद्वारे स्वच्छ स्वयंपाक इंधन वितरण, सौभाग्यद्वारे सुधारित वीज पुरवठा आणि स्वच्छ भारत अभियान आणि जल जीवन अभियान यासारख्या परिवर्तनकारी मोहिमांनी एकत्रितपणे लोकांचे जीवनमान उंचावले असून एकूणच लोकांचे आरोग्य सुधारले आहे. याशिवाय, प्रधानमंत्री जन धन योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या पथदर्शी कार्यक्रमांनी आर्थिक समावेशन आणि वंचितांसाठी सुरक्षित घरे उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

राज्यांचे कार्यप्रदर्शन बदलत असले तरी, काही राज्यांनी वर्षानुवर्षे दारिद्र्यात असणाऱ्या लोकांना दारिद्रयमुक्त करण्याच्या प्रयत्नात उल्लेखनीय प्रगती केली आहे, त्यामुळे बहुआयामी दारिद्र्यातील आंतर-राज्य असमानता कमी झाली आहे. यासह, मूलभूत सेवांच्या उपलब्धतेमधील मूलभूत समस्या जलद गतीने सोडवल्या जात आहेत जेणेकरून देश विकसित राष्ट्र म्हणजेच विकसित भारत@2047 बनू शकेल.

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content