Friday, November 22, 2024
Homeडेली पल्सपॅरिस ऑलिम्पिकमधल्या खेळाडूंत...

पॅरिस ऑलिम्पिकमधल्या खेळाडूंत सशस्त्र दलातले 24 जवान!

येत्या 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 117 भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलातील 24 जवानांचा समावेश आहे. या 24 खेळाडूंमध्ये 22 पुरुष आहेत. भालाफेकपटू सुभेदार नीरज चोप्रा याचाही यात समावेश आहे. याशिवाय या चमूत पहिल्यांदाच दोन लष्करी महिला कर्मचारी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत.

2020 टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता सुभेदार नीरज चोप्रा पुन्हा सर्वोच्च सन्मानासाठी मैदानात उतरणार आहे. 2023मधील आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, 2024मधील डायमंड लीग आणि पावो नुर्मी क्रीडा स्पर्धेत चोप्राने सुवर्णपदक मिळवून असामान्य कामगिरी केली आहे. यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील त्याचा सहभाग आणखी आश्वासक बनला आहे.

2022मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला कांस्यपदक विजेता हवालदार जैस्मिन लॅम्बोरिया आणि 2023 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेती सीपीओ रितीका हुडा या दोघीही ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यांच्या रुपाने सशस्त्र सेना दलातील महिला कर्मचारी प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत यश संपादन करून इतिहास रचणे, हेच या दोघींचे ध्येय आणि स्वप्न आहे. या दोघी अनुक्रमे मुष्टीयुद्ध आणि कुस्ती या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत.

सुभेदार अमित पंघल (मुष्टीयुद्ध); सीपीओ तजिंदरपाल सिंग तूर (शॉट-पुट); सुभेदार अविनाश मुकुंद साबळे (3000 मी स्टीपलचेस);  सीपीओ मोहम्मद अनस याहिया, पीओ (जीडब्ल्यू) मोहम्मद अजमल, सुभेदार संतोष कुमार तमिलरासन आणि जेडब्ल्युओ मिजो चाको कुरियन (4X400M पुरुष रिले); जेडब्ल्युओ अब्दुल्ला अबुबकर (तिहेरी उडी); सुभेदार तरुणदीप राय आणि सुभेदार धीरज बोम्मादेवरा (तिरंदाजी) आणि नायब सुभेदार संदीप सिंग (शूटिंग) सशस्त्र सेनेतील या जवानांचा भारतीय चमूत समावेश आहे.

ऑलम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सशस्त्र सेनेतील खेळाडू याप्रमाणे-

क्रीडा प्रकाररँक आणि नावश्रेणी
तिरंदाजीसुभेदार धीरज बोम्मादेवरा रिकर्व्ह इंडियल आणि चमू 
सुभेदार तरुणदीप राय
सुभेदार प्रवीण रमेश जाधव
ऍथलेटिक्सएसएसआर अक्षदीप सिंग20 किमी आरडब्ल्यू
पीओ विकास सिंग.20 किमी आरडब्ल्यू
एसएसआर परमजीत बिष्ट.20 किमी आरडब्ल्यू
पीओ सूरज पंवारचालण्याची शर्यत मिश्र मॅरेथॉन
सुभेदार अविनाश साबळे.3000 मीटर एससी
सुभेदार मेजर नीरज चोप्रा.भाला फेक
सीपीओ तजिंदरपाल सिंग तूर.पुरुषांचा गोळा फेक
जेडब्ल्युओ अब्दुल्ला अबूबकर.   पुरुषांची तिहेरी उडी
हवालदार सर्वेश कुशारेपुरुषांची उंच उडी
सीपीओ मोहम्मद अनस याहिया.4X400M पुरुष रिले
पीओ(जीडब्ल्यु) मोहम्मद अजमल.4X400M पुरुष रिले
सुभेदार संतोष कुमार तमिलरासन4X400M पुरुष रिले
जेडब्ल्युओ मिजो चाको कुरियन     4X400M पुरुष रिले
मुष्टियुद्धसुभेदार अमित पंघाल. पुरुषांची फ्लायवेट
हवालदार जैस्मिन लांबोरियामहिलांची  फेदरवेट
हॉकीसीपीओ जुगराज सिंगपुरुष हॉकी राखीव
रोइंगएसपीआर बलराज पंवार.एम1एक्स (पुरुष एकेरी स्कल)
नौकानयनसुभेदार विष्णु सरवणनपुरुषांची एक व्यक्ती डिंगी
शूटिंगनायब सुभेदार संदीप सिंग10 मीटर एअर रायफल
टेनिसनायब सुभेदार  श्रीराम बालाजी पुरुष दुहेरी
कुस्तीसीपीओ रितिका हुडा.महिला 76 किलो वजनी गट (फ्रीस्टाईल)

या 24 खेळाडूंव्यतिरिक्त पाच अधिकारीदेखील ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी पॅरिसला जात आहेत. 

क्रीडा प्रकारनाव        भूमिका
मुष्टीयुद्धलेफ्टनंट कर्नल कबिलन साई अशोकपंच
मुष्टीयुद्धसुभेदार सीए कटप्पाप्रशिक्षक
तिरंदाजीसुभेदार सोनम शेरिंग भुतिया.प्रशिक्षक
नौकानयनहवालदार सी एस देलाईतंत्रज्ञान अधिकारी
नौकानयननायक पीव्ही शरदफिजिओ

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content