Homeबॅक पेजअमेरिकेतल्या अक्रोड, सफरचंदांवरचा...

अमेरिकेतल्या अक्रोड, सफरचंदांवरचा 20% अतिरिक्त कर रद्द!

जागतिक व्यापार संघटनेसंदर्भातील भारत आणि अमेरिका यांच्यात असलेल्या सहा प्रलंबित समस्यांची परस्पर सहमतीच्या उपायांच्या माध्यमातून सोडवणूक करण्याबाबत जून 2023 मध्ये झालेल्या निर्णयानुसार, भारताने अधिसूचना क्रमांक 53/2023 (सीमाशुल्क)च्या अन्वये सफरचंदे, अक्रोड आणि बदाम यांच्यासह अमेरिकेत निर्मित आठ उत्पादनांवर लावलेले अतिरिक्त कर रद्द केले आहेत.

अमेरिकेने संरक्षणात्मक उपाययोजना म्हणून काही पोलाद आणि अल्युमिनियम उत्पादनांवरील शुल्क वाढवल्याच्या निर्णयावर प्रत्युत्तर म्हणून भारतातर्फे सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र यासाठी (एमएफएन) असलेल्या कराशिवाय सफरचंदे तसेच अक्रोड यांच्यावर 20% आणि बदामांवर 20 रुपये प्रती किलो असा अतिरिक्त कर लावण्यात आला होता. काही उत्पादने करांतून वगळण्याच्या प्रक्रीयेअंतर्गत, अमेरिकेने काही पोलाद आणि अल्युमिनियम उत्पादनांना बाजारात प्रवेश देण्यास मान्यता दिल्यानंतर भारताने अमेरिकी उत्पादनांवर लावलेले अतिरिक्त कर रद्द केले आहेत.

सफरचंदे, अक्रोड आणि बदाम यांच्यावरील सर्वाधिक पसंतीच्या देशांसाठी असलेल्या करात कोणतीही कपात करण्यात आली नसून अमेरिकेत उत्पादित वस्तूंसह आयात करण्यात येणाऱ्या सर्व उत्पादनांसह त्यांच्यावर अनुक्रमे 50%, 100% आणि 100 रुपये प्रती किलो कर यापुढेही लागू असेल.

तसेच डीजीएफटीने 8 मे 2023 रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्र.05/2023 नुसार सफरचंदांच्या आयात धोरणात आयटीसी (एचएस)08081000 अंतर्गत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार भूतानखेरीज इतर सर्व देशांकडून आयात केल्या जाणाऱ्या सफरचंदांवर  किलोमागे 50 रुपयेइतकी एमआयपी (किमान आयात किंमत) लागू असेल. म्हणून हाच एमआयपी (भूतानखेरीज) अमेरिका आणि इतर सर्व देशांतून आयात केल्या जाणाऱ्या सफरचंदांवर लागू आहे. या सुधारणेमुळे कमी दर्जाची सफरचंदे आयात केली जाण्यापासून तसेच भारतीय बाजारांमध्ये महाग दराने त्यांची विक्री होण्यापासून संरक्षण मिळेल.

या निर्णयामुळे, देशातील सफरचंद, अक्रोड आणि बदाम उत्पादक शेतकऱ्यांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. खरेतर, यातून सफरचंदे, अक्रोड आणि बदाम या महत्त्वाच्या बाजार घटकातील स्पर्धेला चालना मिळेल आणि त्यातून आपल्या भारतीय ग्राहकांना अधिक किफायतशीर दरात उत्तम दर्जाची उत्पादने मिळण्याची सुनिश्चिती होईल. म्हणजेच, अमेरिकेत उत्पादित सफरचंद, अक्रोड आणि बदाम आता इतर देशांतील याच फळांसोबत एका पातळीवर येऊन स्पर्धा करतील.

अतिरिक्त कर रद्द झाल्यामुळे या उत्पादनांची भारताला निर्यात करणाऱ्या सर्वच देशांमध्ये न्याय्य स्वरुपाची स्पर्धा होताना पाहायला मिळेल.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content