Homeन्यूज अँड व्ह्यूजराज्यपालांच्या माजी प्रधान...

राज्यपालांच्या माजी प्रधान सचिवांना 20 लाखांचा दंड!

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे माजी प्रधान सचिव संतोष कुमार यांनी त्यांची बदली झाल्यानंतरही तीन महिने मुंबईतल्या राजभवन परिसरातील राजभवनातील जलदर्शन बंगल्यात राहत होते. त्यामुळे राजभवनाने त्यांना 20 लाखांचा दंड भरण्यासाठी नोटीस काढल्याचे नुकतेच दिसून आले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती देण्यात आली आहे. आपल्यावर झालेल्या दंडात्मक कारवाईपोटी देय असलेली रक्कम माफ करावी, अशी विनंती संतोष कुमार यांनी केली असून त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे राज्यपालांच्या परिवार प्रबंधक कार्यालयाच्या कार्यालयीन अधिक्षिका प्रांजली आंब्रे यांनी गलगली यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

प्रधान सचिव

राज्यपालाचे प्रधान सचिव असलेले संतोष कुमार यांना 12 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यपालांच्या परिवार प्रबंधकांनी बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, तुम्ही राज्यपालांचे प्रधान सचिव असताना तुम्हाला राजभवनमधील जलदर्शन येथे सरकारी निवासस्थान देण्यात आले होते. परंतु हा बंगला पदभार सोडल्यानंतर 3 महिन्यांच्या अनुज्ञेय कालावधीनंतरही रिकामा करण्यात आलेला नाही. राजभवन (निवासाचे वाटप नियम), 2010 च्या नियम 11(फ) नुसार 3 महिन्यांच्या अनुज्ञेय कालावधीनंतर निवासस्थान रिकामे करणे बंधनकारक आहे. सध्या संतोष कुमार प्रधान सचिव आणि ओएसडी (अपील), महसूल आणि वन विभाग या पदावर कार्यरत आहेत. अनुज्ञेय कालावधीनंतरही निवासस्थान रिक्त न केल्याने शासन निर्णयानुसार रु 150 प्रति चौरस फूट या दराने 20, 52, 325 रुपये त्यांना लागू होत आहेत.

अनेकदा शासकीय निवासस्थान मुदतीत न सोडणारे अधिकारी दंडात्मक असलेले अनुज्ञप्ति शुल्क अदा करत नाही. नंतर त्यांच्या विनंतीचा विचार करत मुख्यमंत्री त्यांचा दंड आपल्या अधिकारात माफ करतात. संतोष कुमार यांच्याबाबतीतही हेच होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content