Homeएनसर्कलपश्चिम घाट परिसरातल्या...

पश्चिम घाट परिसरातल्या बुरशीजन्य मातीत २ नव्या प्रजाती!

भारतीय शास्त्रज्ञांनी एस्परगिलस सेक्शन निग्रीमधील लपलेल्या विविधतेचा नुकताच उलगडा केला आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुण्यातल्या एमएसीएस-अघारकर, या स्वायत्त संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी  एस्परगिलस सेक्शन निग्री (सामान्यतः ब्लॅक एस्परगिलस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) दोन नवीन प्रजातींविषयी संशोधन केले आहे. एस्परगिलस-ढाकेफलकरी आणि एस्परगिलस-पॅट्रिसियाविल्टशारीया म्हणून त्या ओळखल्या गेल्या आहेत. घनदाट वृक्षराजी असलेल्या पश्चिम घाट पट्ट्यातून गोळा करण्यात आलेल्या मातीच्या नमुन्यांमधून दोन काळ्या एस्परगिलिस ए. अ‍ॅक्युलेटीनस आणि ए. ब्रुनिओव्हायोलेसियसची पहिली भौगोलिक नोंद केली गेली आहे. या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील जागेचा सतत शोध आणि संवर्धन करण्याची गंभीर गरज या निष्कर्षांवरून अधोरेखित झाली आहे.

पश्चिम घाटातील निग्री सेक्शनमधील एस्परगिलसमधील नवीन प्रजातींचे पूर्वीचे शोध परदेशातील संशोधकांनी लावले असले तरी, हा अभ्यास मूळतः डॉ. राजेश कुमार के. सी. यांनी राष्ट्रीय बुरशीजन्य संस्कृती संग्रह, पुणे येथील अघारकर संशोधन संस्‍थेत (एआरआय) केला. हे शोधकार्य येथे एएनआरएफ (पूर्वीचे एसईआरबी) प्रकल्पाचा भाग म्हणून सुरू केले होते आणि एमएसीएस-एआरआय मुख्य निधीच्या मदतीने पुढे चालू ठेवला होता. हे काम पश्चिम घाट भागात आढळणाऱ्या  मायक्रोलॉजिकल म्हणजेच बुरशीविषयीच्‍या अभ्‍यासामध्‍ये तसेच समजुतीमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते. त्याचबरोबर बुरशीजन्य विविधतेचा मोठ्या प्रमाणात वापर न केलेला जलाशय म्हणून या प्रदेशाची स्थिती अद्वितीय आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण म्हणून अधोरेखित करते. भारतातील सर्वात प्रगत एकात्मिक किंवा ‘पॉलीफेसिक’  म्हणजेच बहुचरणीय वर्गीकरण पद्धतींचा वापर करून भारतीय पथकाने केलेला एस्परगिलसचा हा पहिलाच अभ्यास आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content