Monday, February 3, 2025
Homeमाय व्हॉईसनौदलासाठी 'फ्लीट सपोर्ट'...

नौदलासाठी ‘फ्लीट सपोर्ट’ जहाजांसाठी 19000 कोटींचा करार!

भारतीय नौदलासाठी सुमारे 19,000 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाच्या युद्धनौकांच्या ताफ्यासाठी सहाय्यक जहाज म्हणजेच पाच ‘फ्लीट सपोर्ट’ जहाजे (एफएसएस) अधिग्रहीत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 25 ऑगस्ट 2023 रोजी हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (एचएसएल), विशाखापट्टणमसोबत करारावर स्वाक्षरी केली. स्वदेशी डिझाइन आणि एचएसएल, विशाखापट्टणमद्वारे या जहाजांची बांधणी केले जात असल्यामुळे संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठी चालना मिळणार आहे सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने 16 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या बैठकीत या जहाजांच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली होती.

युद्धनौकांमध्ये इंधन, पाणी, दारूगोळा आणि वस्तूंचे भांडार पुन्हा भरण्यासाठी या फ्लीट सपोर्ट जहाजांचा वापर केला जाईल यामुळे भारतीय नौदलाच्या ताफ्याला यासाठी बंदरावर वारंवार परत न येता दीर्घकाळ कार्य करता येईल. ही जहाजे नौदलाची सामरिक पोहोच आणि गतिशीलता वाढवतील. या जहाजांच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची जहाजे मुख्य बंदरापासून खोल समुद्रात दीर्घकाळ परिचालन करू शकतील. ही जहाजे लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी  आणि मानवी सहाय्य तसेच  आपत्ती निवारण (एचएडीआर ) कार्यांसाठी देखील तैनात केली जाऊ शकतात.

44,000 टनांची फ्लीट सपोर्ट जहाजे ही भारतीय जहाजबांधणी कंपनीद्वारे भारतात बांधली जाणारी पहिलीच जहाजे असतील. या प्रकल्पामुळे आठ वर्षांच्या कालावधीत जवळपास 168.8 लाख श्रम दिन इतका रोजगार निर्माण होईल.या जहाजांच्या बांधणीमुळे भारतीय जहाजबांधणी उद्योगाला एक नवा आकार मिळेल आणि एमएसएमईसह संबंधित उद्योगांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन मिळेल.  यासाठीची बहुसंख्य उपकरणे आणि यंत्रणा स्वदेशी उत्पादकांकडून उत्पादित केल्या जात असल्याने, सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांच्या अनुषंगाने ही जहाजे ‘आत्मनिर्भर भारत’चे अभिमानास्पद ध्वजवाहक असतील.

Continue reading

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...

जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त दोन दिवसांचा ‘साहित्यरंग’!

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने साहित्यातील प्रेमरंग, या विषयावर साहित्यरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या शनिवारी, ८ फेब्रुवारी आणि रविवारी, ९ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या गोखले सभागृहात होईल. ८ फेब्रुवारीला थोर साहित्यिक जयवंत दळवी यांच्या...
Skip to content