Homeपब्लिक फिगररिहानाला एका ट्विटसाठी...

रिहानाला एका ट्विटसाठी १८ कोटीची बिदागी?

शेतकरी आंदोलनावरुन भारताच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आगपाखड करण्यात येत आहे. पण ही आगपाखड म्हणजे केवळ भारताला व मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीचे रचलेले षडयंत्र होते. पॉप गायिका रिहानाला एक ट्विट करण्यासाठी स्कायरॉकेट पीआर फर्मकडून १८ कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती उघड झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

प्रिंट, या न्यूज वेब पोर्टलवर या षडयंत्राची महिती प्रसिद्ध झाल्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्याचे काही मंडळींचे षडयंत्र उघड झाले आहे. प्रिंटमधील वृत्तानुसार, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गद्वारे आधी केलेले ट्विट नंतर डिलीट करण्यात आलेल्या टूलकिटमुळे भारताच्या विरोधात सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा खुलासा झाला आहे. या टूलकिटमध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटीला कधी आणि काय ट्विट करायचं आहे, कोणत्या दिवशी शेतकरी आंदोलनात काय घटना घडतील, या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील घटनादेखील याच षडयंत्राचा भाग होती, असेही या वृत्तामध्ये नमूद करण्यात आल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर असून याची चौकशी करुन या आंतरराष्ट्रीय षडयंत्रात कोण सहभागी आहेत याचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी करतानाच पाटील म्हणाले की, केवळ राजकीय स्वार्थ साधणारे हे लोक भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी धोकादायक ठरत आहेत. काही न्यूज रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कॅनडामधील पीएफजे नावाच्या संघटनेचा या आंतरराष्ट्रीय षडयंत्रात सहभाग असल्याचे समोर आले आहे. भारताच्या गुप्तचर संघटनांच्या रडारमध्ये पीएफजेच्या संस्थापकासह स्कायरॉकेट नावाच्या पब्लिक रिलेशन्स फर्मचा डायरेक्टर आणि काही इतर लोकांचाही समावेश होता.

या आंतरराष्ट्रीय लोकांना भारत, कृषी कायदे आणि कृषीविषयक कोणत्याही गोष्टींबद्दल कसलेही ज्ञान नाही. शेतकरी आंदोलनासंदर्भातील ट्विटस भारतावर लांछन लावण्यासाठी व भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक केले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content