Homeटॉप स्टोरीलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या...

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 1206 उमेदवार

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 1206 उमेदवार आणि बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघाचे 4 उमेदवार, निवडणूक लढवणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यासाठी 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतल्या 88 लोकसभा मतदारसंघांत 2633 उमेदवारीअर्ज दाखल झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाकरिता उमेदवारीअर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2024 होती. दाखल झालेल्या 2633 नामांकनअर्जांच्या छाननीनंतर 1428 अर्ज वैध असल्याचे समोर आले. उमेदवारीअर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 8 एप्रिलपर्यंत होती. त्यानंतर 1206 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात राहिले.

दुसऱ्या टप्प्यात केरळमध्ये 20 लोकसभा मतदारसंघांत निवडणूक होत असून तेथून सर्वाधिक म्हणजे 500 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटकचा क्रमांक लागतो. तेथे 14 लोकसभा मतदारसंघांत 491 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्रिपुरातील एका मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 14 अर्ज दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 92 अर्ज भरले गेले आहेत.

दुसऱ्या टप्प्याचा राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशीलः

State/UTNumber of PCsNomination forms receivedValid candidates after scrutinyAfter withdrawal, final ContestingCandidates 
Assam51186261
Bihar51465550
Chhattisgarh3954641
Jammu and Kashmir1372322
Karnataka14491300247
Kerala20500204194
Madhya Pradesh71579388
Maharashtra8477299204
Rajasthan13304191152
Tripura114149
Uttar Pradesh82269491
West Bengal3684747
Total88263314281206

बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातील 15 विधानसभा मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 या दिवशी मतदान होत आहे. येथील 13 विधानसभा मतदारसंघांत दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिलला मतदान होणार आहे. 5 एप्रिल 2024च्या भारतीय राजपत्राद्वारे अधिसूचित केल्यानुसार, बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातून 4 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

पहिल्या टप्प्यासाठी, 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतून 1625 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांत 1491 पुरुष उमेदवारांचा व 134 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content