Details
`हौजी राईड २०१९’ च्या नावनोंदणीस प्रारंभ
03-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
वुई वन इव्हेन्ट यांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय तसेच पुरातत्व विभाग यांच्या सहकार्याने खेळातून सामाजिक संदेश देणारा हौजी राईड २०१९, हा उपक्रम आयोजित केला आहे. २४ नोव्हेंबर २०१९ यादिवशी मुंबईत होणाऱ्या या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष असून याबाबतची क्रीडा क्षेत्रातील उत्सुकता ध्यानात घेऊन यंदा लवकरच नावनोंदणी करण्यास सुरूवात केली गेली आहे.
मुंबईतील पुरातत्व विभागाने सांस्कृतिक वारसा जतन करणारी काही स्थळं निश्चित केली असून दुचाकीवरून स्पर्धकांना त्याचा ठावठिकाणा शोधावा लागणार आहे. त्याचबरोबर सुरक्षित वाहन चालविण्याचे निकषदेखील यंत्रणेच्या माध्यमातून तपासून स्पर्धकांना एकूण १० लाख रूपयांची वेगवेगळ्या वर्गवारीतील पारितोषिके दिली जाणार आहेत. ही एक अनोखी सहल आणि सफर असेल. मुंबईतील विविध ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्थळांचा शोध त्यातून घेता येईल. हौजी खेळाप्रमाणे बाईकस्वारांना एक तिकीट व क्ल्यू बुक दिले जाईल. त्यानुसार त्या त्या क्रमांकावरील स्थळे शोधायची आहेत. संबंधित ठिकाण बरोबर शोधले की नाही, हे स्पर्धकांना त्यांच्याजवळ दिलेल्या यंत्राद्वारे कळणार आहे. स्पर्धा जिंकण्याच्या भरात त्यांनी बाईक व्यवस्थित चालवली का, वेगमर्यादा ओलांडली का, अर्जंट ब्रेक किती वेळा वापरला याचेही परिक्षण होणार आहे.
यंदा स्पर्धकांकडून आलेली मागणी विचारात घेता इच्छुकांनी नावनोंदणी लवकरच करावी. स्पर्धेची अधिक माहिती www.houjiride.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ९०८२३७५३८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धेच्या आयोजकांनी केले आहे.”
केएचएल न्यूज ब्युरो
“वुई वन इव्हेन्ट यांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय तसेच पुरातत्व विभाग यांच्या सहकार्याने खेळातून सामाजिक संदेश देणारा हौजी राईड २०१९, हा उपक्रम आयोजित केला आहे. २४ नोव्हेंबर २०१९ यादिवशी मुंबईत होणाऱ्या या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष असून याबाबतची क्रीडा क्षेत्रातील उत्सुकता ध्यानात घेऊन यंदा लवकरच नावनोंदणी करण्यास सुरूवात केली गेली आहे.”
“मुंबईतील पुरातत्व विभागाने सांस्कृतिक वारसा जतन करणारी काही स्थळं निश्चित केली असून दुचाकीवरून स्पर्धकांना त्याचा ठावठिकाणा शोधावा लागणार आहे. त्याचबरोबर सुरक्षित वाहन चालविण्याचे निकषदेखील यंत्रणेच्या माध्यमातून तपासून स्पर्धकांना एकूण १० लाख रूपयांची वेगवेगळ्या वर्गवारीतील पारितोषिके दिली जाणार आहेत. ही एक अनोखी सहल आणि सफर असेल. मुंबईतील विविध ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्थळांचा शोध त्यातून घेता येईल. हौजी खेळाप्रमाणे बाईकस्वारांना एक तिकीट व क्ल्यू बुक दिले जाईल. त्यानुसार त्या त्या क्रमांकावरील स्थळे शोधायची आहेत. संबंधित ठिकाण बरोबर शोधले की नाही, हे स्पर्धकांना त्यांच्याजवळ दिलेल्या यंत्राद्वारे कळणार आहे. स्पर्धा जिंकण्याच्या भरात त्यांनी बाईक व्यवस्थित चालवली का, वेगमर्यादा ओलांडली का, अर्जंट ब्रेक किती वेळा वापरला याचेही परिक्षण होणार आहे.”
“यंदा स्पर्धकांकडून आलेली मागणी विचारात घेता इच्छुकांनी नावनोंदणी लवकरच करावी. स्पर्धेची अधिक माहिती www.houjiride.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ९०८२३७५३८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धेच्या आयोजकांनी केले आहे.”