HomeArchiveहिंदुस्थानी नौदलाचा भक्कम...

हिंदुस्थानी नौदलाचा भक्कम आधार!

Details
हिंदुस्थानी नौदलाचा भक्कम आधार!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
भारतीय नौदलाच्या भक्कम नि धाडशी अचाट कामगिरीमागे अनेक अदृश्य हात आहेत. त्यात नौकाबांधणी करणाऱ्या गोदींचादेखील मोठा सहभाग आहे. ही नौकाबांधणी आपल्या इथे नसती झाली तर गेल्या सत्तर वर्षांत अरबो रूपये बाहेरच्या देशांना मोजावे लागले असते. गेल्या दोन हजार वर्षांची जहाजबांधणी परंपरा, कुशल मनुष्यबळ नि त्यामागे राज्यकर्त्यांची भूमिका यातून स्थानिकांना रोजगार तर मिळालाच शिवाय जगभरात वेगळाच नावलौकिक, दबदबा झालाय. देशात मुंबईतील माझगाव डॉक्ससह गोवा शिपयार्ड, कोलकात्याची गार्डन रिच, कोची शिपयार्ड्स या गोदीतून नौदल जहाजबांधणी होते.

मुंबईच्या गोदीला जुनी परंपरा तर आहेच शिवाय ड्राय डॉक हा नैसर्गिक प्रकार मदतीला आहे. म्हणजे ओहोटी असल्यास समुद्राचं पाणी बाहेर तर पडतच पण भरतीवेळी ते आत येऊ न देण्याची रचना आहे. यामुळे बोटबांधणी करतांना अधिकची सुलभता येते. कायम भरतीचे पाणी आत राहिल्यास प्राथमिक बोट बांधणीसाठी वेगळा धक्का (प्लॅटफॉर्म) तयार करावा लागतो. या निसर्गनिर्मित आकाराचा फायदा या गोदीला मिळाला आहे. ही गोदी नुसती नौदलच नाही तर इतरही व्यावसायिक जहाज बांधणीची कामं करते. इथे १९६८ साली लिअंडर क्लास बनावटीची फ्रिगेट ‘आय. एन. एस. निलगिरी’ची उभारणी होऊन ती ऑक्टोबर १९६८ जलावतरीत झाली. १९७२ साली ती नौदलाच्या सेवेत सामील केली गेली. त्यानंतरच्या पुढील नऊ वर्षांत याठिकाणी नौदलासाठी पाच फ्रिगेट तयार झाल्या. यात हिमगिरी, उदयागिरी, तारागिरी, दुनागिरी, विंध्यगिरी यांचा समावेश आहे. नौदलाची मुख्य गरज भागवण्याचं काम यांनी केलं. लिअंडर मालिकेतील बोटींना पाहून भारतीय आरमाराने नव्या पिढीच्या फ्रिगेट बनविण्यासाठी त्याचे आरेखन (डिझाइन), उत्पादन यासाठी माझगाव गोदीला सहभागी करून घेतलं. मात्र, या बोटी संकल्पना, आरेखन नि त्याची अंमलबजावणी यात भारतीय होत्या.

या बोटींची रचना आधीच्या फ्रिगेटपेक्षा २५% वाढीव जागेबरोबर दोन मोठी हेलिकॉप्टर राहू शकतील अशी होती. या नवनिर्मित गटाच्या बोटींना ‘गोदावरी क्लास’ संबोधण्यात आलं. या गटातील पहिली बोट ‘आय. एन. एस. गोदावरी’ मे १९८० च्या सुमारास पाण्यात ढकलण्यात आली ती पुढे शस्त्रभारित, चाचण्या होऊन डिसेंबर १९८३ ला नौदलात दाखल झाली. पुढे आय. एन. एस. गंगा नि आय. एन. एस. गोमती या अनुक्रमे १९८५ नि १९८८ मध्ये सहभागी करून घेतल्या. या गोदीत साधारण दीड हजार टनी छोट्या दोन कोर्वेट्सही तयार करण्यात आल्या. ‘आय. एन. एस. खुकरी’ ऑगस्ट १९८९ तर ‘आय. एन. एस. कुठार’ जून १९९० ला कार्यान्वित झाली. या गोदीत आधुनिक बनावटीच्या नौकांचीही बांधणी झाली.यात क्षेपणास्त्र डागू शकणाऱ्या बोटी आहेत. आय. एन. एस. विभूती, आय. एन. एस. विपुल, आय. एन. एस. नाशक गतिमान नि शक्तिशाली इथे तयार करून १९९१ ते १९९४ या कालावधीत दाखल झाल्या तर चौथी आय. एन. एस. प्रबळ गोदीत सप्टेंबर २००० मध्ये बांधून २००२ च्या मार्च महिन्यात कार्यान्वित झाली. फ्रिगेट शिवालीक श्रेणीतील तीन बोटी आय. एन. एस. शिवालीक, आय. एन. एस. सह्याद्री, आय. एन. एस. सातपुरा या संरक्षण दलाकडे नौदल समावेशासाठी २०१० ते २०१२ काळात सोपविल्या गेल्या. स्टेलथ बनावटीच्या विविध भूमिका बजावू शकणाऱ्या अशा P 17 श्रेणीच्या फ्रिगेट्स भारतात तयार झाल्या. अलिकडेच P 15 गटातील विनाशिका आय. एन. एस. कोलकाता, आय. एन. एस. कोची, आय. एन. एस. चेन्नई याची बांधणी करून २०१४ ते २०१६ दरम्यान संरक्षणार्थ सहभागी केल्या.

याचबरोबर समुद्रातील विविध आव्हानांच्या वातावरणात काम करू शकतील नि नियंत्रण मिळवू शकतील अशा P 15 A गटातील विनाशिका बनविल्या. किनाऱ्यावरील लक्ष्यांना भेदतील संभाव्य पाणबुडी, इतर जहाजं, हवाई हल्ल्यापासून संरक्षक ठरतील अशा बोटी तयार केल्या त्या माझगाव गोदीतच! सध्या भारतीय संरक्षण विभागासाठी चार P 15 B गटाच्या विनाशिका नि चार P17 गटाच्या फ्रिगेट्स तयार होत आहेत. स्कॉर्पिअन बनावटीच्या सहा पाणबुड्यांपैकी चौथी ‘वेला’ नुकतीच जलावतरीत झाली. फ्रान्सच्या सहकार्याने बनविल्या जाणाऱ्या या पाणबुड्यांची गोपनीय कागदपत्रे ऑस्ट्रेलियन माध्यमांनी मिळवल्याने हाहाःकार माजला. नेमकं संरक्षणमंत्रीपदी मनोहर पर्रिकर असताना या मामल्याने जोर धरला, जसं काही यामागे तेच होते. ‘टायगर शार्क’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या गटाच्या ‘कलवरी’ पाणबुडीला २०१६ च्या डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाण्यात सोडलं गेलं. त्यानंतर ‘खंदेरी’ला जानेवारी २०१७ तर ‘करंज’ला गेल्यावर्षी चाचण्यांसाठी समुद्रात ढकललं गेलं. पुढील दोन ‘वकील’ नि ‘वक्तशीर’ तयार होताहेत.

केवळ नौदलासाठी ही गोदी काम करते असं नसून भारतीय तटरक्षक दलासाठीदेखील तितक्याच सक्षमपणे बोटी बांधल्या जातात. या दलासाठी तयार केलेल्या गस्ती नौका सक्षमपणे आपली सेवा बजावत आहेत. १९८३ ते १९९० या काळात त्या बांधल्या गेल्या. त्याचप्रमाणे बी. एस. एफ.साठी आऊट पोस्ट बनविण्याचे कामही केलं गेलं. या पोस्ट म्हणजे तरंगते पोलीस ठाणे असते. त्यासाठी गतिमान नौका बनविल्या. व्यावसायिक म्हणून काम करताना वैविध्यपूर्ण अशा सपोर्ट वेसल्स, टॅगस, ड्रेजर, वॉटर टँकर्स, पॅसेंजर कम कार्गो वेसल्स, फ्लोटिंग क्रेनस, पॉंटूनस, फ्युएल टँकर्स, आदी बनवून परदेशी ग्राहकांच्या मनात स्थान केलं. १८ व्या शतकात एक छोटे जहाज दुरूस्ती केंद्र असलेली ही गोदी आज देशाची प्रमुख होऊन राष्ट्र उभारणी नि संरक्षणात मोठा आधारस्तंभ ठरली आहे. इतकंच नव्हे तर आजची येथील कामाची नोंदणी पाहता जगातील सर्वात व्यस्त गोदी ठरत आहे. समुद्री संरक्षण नि इतर बाबीत अशीच प्रगतीशील वाटचाल होवो, या शुभेच्छा द्यायलाच हव्यात नाही का? जय हिंद!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content