Details
हाऊज द जोश?
01-Jul-2019
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
शत्रूवर तुटून पडणे नि त्यासाठी अंगात काय जोश भरवावा लागतो, हे ‘जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे’ असे आहे. केवळ चित्रपट बघून काही नाही कळणार. त्यासाठी लष्करी प्रशिक्षण सक्तीचं असणं अत्यावश्यक आहे. नपेक्षा एनसीसीमध्ये तरी घासावी काही वर्षे.. जरातरी `फील′ येतो. किंवा ज्याची ऐपत, हुशारी असेल त्या मुलांनी सैनिकी शाळेत जावे. पालकांनी याकडे लक्ष द्यावे. सैनिकी कारवाईवरील चित्रपट ‘उरी’ अलीकडेच प्रदर्शित झाला. तसे युद्धकथा मांडणारे अनेक सिनेमे येऊन गेले. ७०च्या दशकात आलेला हिमालय की गोद में, सनीचा बॉर्डर, या काहींचा बोलबाला झाला. युद्धस्य कथा रम्य, यानुसार आबालवृद्धांना या विषयाचं आकर्षण असतं. सर्जिकल स्ट्राईकवरील सिनेमातील हॉउज द जोश, हे वाक्य अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील चित्रपट संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी उच्चारले नि त्याचा गाजावाजा झाला. कार्यक्रम चित्रपटाशी संबधित असल्याने त्यांनी तसे केले असेल. पण मनामनात लष्करी आरोळ्या काय असतील याची जिज्ञासा नक्की चाळवली असेल.
देशाच्या लष्करात वेगवेगळ्या बटालियन, रेजिमेंट्स आहेत. त्या प्रत्येकाची निरनिराळी घोषवाक्येही आहेत. त्याद्वारे लढवय्या कामगीरीसाठी स्फुरण चढते. एकमेकांना उत्साह-शक्ती दिली जाते. जसे की छत्रपती शिवाजींच्या मावळ्यांना ‘हर हर महादेव’ म्हणताच जोश चढायचा. एकप्रकारची नशाच म्हणा ना.. मग शत्रू किती संख्येत हे कोणीच पाहिले नाही नि:पात करायचा हेच ठरलेले. ‘वेडात दौडले वीर मराठे सात..’ हे गाणंदेखील तीच रग-जोश दाखविणारे आहे. लष्कराची भाषा हिंदी असल्याने ‘नाम, नमक और निशान’ यासाठी युद्ध लढताना या घोषणा दिल्या जातात. नाम म्हणजे रेजिमेंट, नमक म्हणजे देश, आणि निशान म्हणजे देश आणि पलटणचा झेंडा हेच यावेळी डोळ्यासमोर असतं.
गोरखा रायफल्स- जय माँ काली, आयो गोरखाली.. देशाच्या स्वातंत्र्यानंतर विविध सैन्य तुकड्या ज्या ब्रिटिशांनी निर्माण केल्या त्यांचं विभाजन अपरिहार्यपणे करावं लागलं. यासाठीदेखील भारत, नेपाळ, ब्रिटन यांच्यात त्रिपक्षीय करार करावा लागला. त्यानुसार ब्रिटिश इंडियन आर्मीतील दहा गोरखा रेजिमेंट्सपैकी सहा आपल्या लष्कराचा हिस्सा बनली. त्यांचं घोषवाक्य याप्रमाणे आहे.
गढवाल रायफल्स- याची स्थापना बंगाल आर्मी अंतर्गत १८८७ साली झाली. ही बंगाल आर्मीची ३९ वी रेजिमेंट होती. पुढे ती ब्रिटिश आर्मीची भाग झाली. अर्थात स्वातंत्र्यानंतर इंडियन आर्मीत सहभागी होणे क्रमप्राप्त होतंच.
ब्रिगेड ऑफ गार्डस- गरुड किंवा गरून का हुं प्यारे, या घोष वाक्याने समोरच्याला ललकरले जाते. पहला हमेशा पहला, हे या रेजिमेंटचं घोषवाक्य आहे. आर्मीचे पहिले फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी या रेजिमेंटची स्थापना केली. ब्रिगेड ऑफ गार्डसची निर्मिती करून ‘द गार्डस, द एलिट’ याचा उच्चार केला.
पंजाब रेजिमेंट्स- जो बोले सो निहाल, सत श्री अकाल, बोल ज्वाला मां की जय, यासह आक्रमण फळी उभारणारी सर्वात जुन्या रेजिमेंटपैकी ही एक मोठी लढवय्या तुकडी आहे. ब्रिटीश इंडियन आर्मीत हिची उभारणी झाली. त्यावेळेपासून अनेक लढायांत सहभाग नोंदविला नि नेहमी अजेय राहिली असा लौकिक प्राप्त केला.
मद्रास रेजिमेंट- वीरा मद्रासी, आदी कोल्लू आदी कोल्लू.. या युद्धज्वर वाक्याने हिची ओळख आहे. १७५० साली स्थापना या इंफंट्री रेजिमिंटची ख्याती इंग्रजांच्या काळात अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेत आज स्वातंत्र्यानंतर लष्कराचा अभिन्न भाग बनली आहे.
ग्रेनेडियर्स रेजिमेंट्स- सर्वदा शक्तिशाली, या घोषवाक्यासह तयार असलेल्या या गटाची ओळख १६८४ पर्यंत शोधता येते. या रेजिमेंटने दुसरे अँग्लो-अफगाण, तिसरे बर्मा युद्ध, पहिले दुसरे महायुद्ध, याशिवाय १९६५, १९७१चे पाकिस्तान युद्ध आणि पुढे १९९९ चा कारगिल संघर्ष यात भाग घेतला.
मराठा लाईट इंफंट्री- ‘बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..’ या आवेशपूर्ण युद्धघोषाने शत्रूच्या छातीत धडकी भरवत आक्रमण करणारी ही तुकडी. १६व्या शतकापासूनच हिचा बोलबाला आहे. मुघल, ब्रिटिशांबरोबरही या तुकडीने लढा दिला आहे. अभूतपूर्व साहसाबाबत हिची ख्याती आहे.
जाट रेजिमेंट- जाट बलवान, जय भगवान. या घोषणेसह ही लढाऊ तुकडी ओळखली जाते. इंग्रजांच्या काळात या रेजिमेंटने १८३९-१९४७ या काळात जवळपास १९ युद्धसन्मान जिंकले तर स्वातंत्र्यानंतर पाच युद्धसन्मानानं त्यांना गौरवण्यात आलं. या तुकडीने आठ महावीरचक्र, आठ कीर्तीचक्र, ३२ शौर्यचक्र, ३९ वीरचक्र आणि १७० सेना मेडल्स मिळवली आहेत.
शीख रेजिमेंट्स- जो बोले सो निहाल, सत श्री अकाल या उदेघोषावरून पंजाब रेजिमेंट्सशी जवळीक वाटते. फक्त थोडा फरक आहे. या तुकडीने अलीकडच्या कारगिल लढाईत टायगर हिल, इंडिया गेट आणि हेल्मेट या पश्चिम भागातून तसेच सात-आठ जुलैच्या रात्री शत्रूला पिटाळण्याची कामगिरी केली. या रेजिमेंट्सच्या नावे १६५२ इतके गलेंट्री अवॉर्डस आहेत.
डोग्रा रेजिमेंट्स- या तुकडीला १९२२मध्ये स्थापन करण्यात आलं. ज्वाला माता की जय, या घोषवाक्यानेही प्रसिद्ध आहे. कर्तव्य-मानवता हे बोधवाक्य आहे.
कुमांऊ रेजिमेंट्स- कालिका माता की जय, बजरंग बली की जय, दादा किशन की जय अशी या तुकडीची घोषणा आहे.
जशी देशातील सांस्कृतिक भिन्नता, भाषाभिन्नता, नैसर्गिक वैविध्यता तसेच सैन्यदलातील या नाना तुकड्यांचे आहे. पूर्ण देशात, समाजात धर्म-जातीयवाद करणाऱ्यांनी सैन्याला यापासून दूर ठेवावे नाहीतर देशाचे तुकडे होऊन चीन-पाकिस्तानच्या हाती जाण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी सर्वांची एकच घोषणा असली पाहिजे भारत माता की जय किंवा वंदे मातरम किंवा जय हिंद!!”
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार