HomeArchiveस्वातंत्र्यवीरांच्या जन्मस्थानाच्या देखभालीचे...

स्वातंत्र्यवीरांच्या जन्मस्थानाच्या देखभालीचे दायित्व स्वा. सावरकर स्मारकाकडे..

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
नाशिकच्या भगूर येथील स्वातंत्र्यवीरांचे जन्मस्थान असलेल्या निवासस्थानाच्या देखभालीचे दायित्व महाराष्ट्र शासनाने मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडे दिले आहे. राज्य संरक्षित योजनेअंतर्गत संगोपनार्थ ते स्मारकाच्या स्वाधीन केले असून तसा शासकीय अध्यादेशदेखील पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने प्रसिद्ध केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वास्तव्य केलेली वास्तू स्मारकाकडे येत असून ही अत्यंत आनंदाची बाब असल्याची भावनात्मक प्रतिक्रिया स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राचीन स्मारकांचे संवर्धन करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्र-वैभव – राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेनुसार स्वातंत्र्यवीरांचे भगूर येथील निवासस्थान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सुपूर्द करण्याची मागणी शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार नियमानुसार सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची क्षमता स्मारकाचीच असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे 12 जून 2019 या दिवशी शासकीय अध्यादेश प्रकाशित करण्यात आला. यानुसार लवकरच करारनाम्यावर स्वाक्षरी होऊन अधिकृतपणे स्मारकाच्या वतीने तिथे कार्य करण्यात येईल.

स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर हे स्वतः स्वातंत्र्यवीरांचे नातू आहेत. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रप्रेमींचे श्रद्धास्थान असलेली ही वास्तू परत त्यांच्या वारसाकडे येत आहे, हा खरोखरच दुग्धशर्करा योग आहे. स्मारकाच्या कार्याला यामुळे अधिक बळकटी येणार आहे. या ठिकाणी राष्ट्रप्रेमी नागरिकांना अपेक्षित असलेले कार्य तसेच उपक्रम निश्चितपणे राबविले जातील तसेच या निवासस्थानाचा लौकिकदेखील सर्वदूर पोहोचविला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...
Skip to content