HomeArchiveस्वातंत्र्यवीरांच्या जयघोषात रंगले...

स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषात रंगले राज्यस्तरीय कवीसंमेलन!

Details
स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषात रंगले राज्यस्तरीय कवीसंमेलन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येवर आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय कवी संमेलन रंगले ते स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषांनी. काव्यप्रेमी शिक्षक मंचाचा यासाठी विशेष सहभाग होता. स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, पराक्रम, साहित्यसंपदा, समाजसुधारणा अशा वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वांना उपस्थितांनी कवितेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सादर केले आणि उपस्थितांना एक वेगळाच अनुभव मिळाला. कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार संजय मंडलिक यांचीदेखील विशेष उपस्थिती होती.

स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, या कार्यक्रमाचे संयोजक गुरूदत्त वाकदेकर, खुमासदार निवेदन करणारे सूत्रसंचालक पत्रकार पंकज दळवी, काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे जया नेरे, प्रमोद बाविस्कर, राजेश साबळे, मुकेश विशे, मंजु सराटे, वंदना म्हात्रे, कल्पना देशमुख, कल्पना म्हापुसकर, किशोरी पाटील, शारदा कंधारे, विजय फडणीस, सचिन बागुल, धनाजी गुठे, आरोशी दाते यांची यावेळी उपस्थिती होती. स्वातंत्र्यवीरांची वेगवेगळी रूपं विविध माध्यमातून व्यक्त होणे आणि ती अनुभवणे हे विशेष आहे. त्याचबरोबर याठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते, असे विचार खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.

यावेळी झालेल्या काव्यस्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी- प्रथम- सलोनी बोरकर, द्वितीय- इशांत संगमनेरकर, तृतीय- चिंतामणी पावसे, उत्तेजनार्थ- काशीनाथ महाजन व सरला साळुंखे. या कार्यक्रमाचा प्रतिसाद विचारात घेता यापुढे विविध राज्यांमध्ये तसेच बहुभाषिक स्वरूपाचे कवीसंमेलन घेण्याचा मनोदय स्मारकाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content