HomeArchiveस्वयं पुनर्विकास, डीम्ड...

स्वयं पुनर्विकास, डीम्ड कन्व्हेन्सबाबत उद्या मुलुंडमध्ये शिबीर!

Details
“स्वयं पुनर्विकास, डीम्ड कन्व्हेन्सबाबत उद्या मुलुंडमध्ये शिबीर!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या पुनर्विकासापासून ते डीम्ड कन्व्हेन्सपर्यंत सर्व प्रश्नांसंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी, 10 फेब्रुवारीला मुंबईच्या मुलुंड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आणि खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते होत आहे. सकाळी 10 ते 1 या वेळेत राजे संभाजी सांस्कृतिक भवन, अरुणोदय नगर, वीर सावरकर मार्ग, मुलुंड पूर्व येथे हा कार्यक्रम होईल.

मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिबिरात, गृहनिर्माण संस्थांचे कामकाज, सहकारी कायदा व उपविधी, अभिहस्तांतरणबाबत मोफत मार्गदशन होईल. या शिबिरास आमदार सरदार तारासिंग, शिशिर शिंदे, चरणसिंह सप्रा, हौसिंग टाइम्सचे संपादक वसंत शिंदे, भाजपाचे मुंबई महापालिका गटनेते मनोज कोटक, राष्ट्रवादीचे गटनेते राखी जाधव, नगरसेवक सुरेश कोपरकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, बँकेचे संचालक व सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर, उपस्थित असतील. या शिबिराचे आयोजन हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, संचालक नगरसेवक प्रकाश गंगाधरे, सचिव डी. एस. वडेर, डॉ. डी. एन. महाजन, अजय बागल, आशिष गोयल, विशाल कडणे यांनी केले आहे.

यावेळी विविध विषयवार प्रसिद्ध आर्किटेक्ट चंद्रशेखर प्रभू, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे दीपेंद्रसिंह कुशवाह, विभागीय सहनिबंधक मो. अ. अरिफ, जिल्हा उपनिबंधक पी. एस. सोनवणे, राज्य हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, डी. एस. वडेर, प्रणय गोयल मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरात खालील विषयावर चर्चा होईल
* संस्थेचे सभासदत्व, नामांकन आणि व्यवस्थापन.
* सदनिका हस्तांतरण (ट्रान्स्फर),प्रीमियम आकारणी व बिनभोगवटा शुल्क.
* घटनादुरुस्तीनुसार गृहनिर्माण संस्थांची नवीन निवडणूक कार्यपद्धती.
* कलम १०१ अंतर्गत वसुलीची कार्यपद्धती व अंमलबजावणी.
* घटनादुरुस्तीनुसार मोफा कायदा आणि त्याअंतर्गत अभिहस्तांतरण व मानीव हस्तांतरण.
* अभिहस्तांतरण व स्वयं-पुनर्विकास.
* लेखापरीक्षण, तपासणी व चौकशी.
* प्रश्नोत्तरे.
या शिबिराला गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव, कार्यकारी सदस्य तसेच सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी केले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content