HomeArchiveसुदंर मोडी हस्ताक्षर...

सुदंर मोडी हस्ताक्षर स्पर्धा!

Details
सुदंर मोडी हस्ताक्षर स्पर्धा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या पाच शहरांमध्ये, मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि कोल्हापूर येथे एकाच दिवशी आणि एकाचवेळी ‘सुदंर मोडी हस्ताक्षर स्पर्धा’ आणि ‘शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा’ भरविण्यात येणार आहे.

अशाप्रकारची मोडी लिपी प्रचारार्थ भव्य स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा १ मे २०१९, या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी घेतली जाईल. यात भाग घेण्यासाठी २९ एप्रिलपर्यंत आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. सर्वच केंद्रांवरील दोन्ही स्पर्धा गटातील पहिल्या तीन विज्येत्यांना पारितोषिके दिली जातील. सर्व स्पर्धाकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेची ठिकाणे सावरकर स्मारक (०२२-२४४६५८७७), शिवाजी पार्क, मुंबई; (९८८११-०४३७९), कर्वे रोड, पुणे; ऐतिहासिक संग्रहालय (९३७२१-५५४५५), अहमदनगर; चिंतामणीज मोडी (९८५०७-४६१७२), नाशिक आणि नाईट कॉलेज, कोल्हापूर (९३७१४-६०६६१) अशी आहेत. पुस्तक विक्रेत्यांनाही मोडीविषयक पुस्तकांचे स्टॉल याठिकाणी लावण्यास पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता दिलेल्या संबंधित क्रमांकावर संपर्क करावा.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

आहात तिथेच थांबा! इराणमधल्या भारतीयांना सरकारचे निर्देश!!

मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात वाढता तणाव पाहता, केंद्र सरकारने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' (मार्गदर्शक सूचना) जारी केली आहे. "पुढील ४८ तास तुम्ही जिथे आहात, तिथेच सुरक्षित राहा आणि अनावश्यक प्रवास टाळा," असे स्पष्ट आदेश...

उद्या पहाटेपासून मीरा-भाईंदर ते चेंबूरपर्यंतच्या प्रवाशांसाठी मेट्रो!

मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान करण्याच्या दिशेने मंगळवारी एक मोठे पाऊल पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्गिका ९ (टप्पा १) आणि मेट्रो मार्गिका...

ऊर्जा प्रकल्पांच्या संरक्षणासाठी इराणमध्ये ‘मानवी साखळी’!

पश्चिम आशियातील युद्ध आता एका निर्णायक आणि भयानक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर, इराणने आपल्या देशातील वीजनिर्मिती केंद्र आणि पायाभूत सुविधा वाचवण्यासाठी अनोखी शस्त्रास्त्रे वापरण्याऐवजी 'मानवी ढाल' (ह्यूमन शिल्ड) तयार करण्याचा...
Skip to content