Details
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी का नाही? – श्रीगौरी सावंत
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
तृतीयपंथीयांना उपकार म्हणून केवळ दया दाखवू नका तर माणूस म्हणून स्वाभिमानाने जगू द्या, सर्वोच्च न्यायालयाने 2014 साली आमच्या बाजूने निकाल दिला असतानाही अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल समाजसेविका श्रीगौरी सावंत यांनी बोरीवलीतील वसंत व्याख्यानमालेत केला. आम्हाला बरोबरीने वागवा, असे साकडेही त्यांनी समाजाला घातले.
बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत ‘आम्ही तृतीय पंथीय आणि समाज’ या विषयावर समाजसेविका श्रीगौरी सावंत यांनी पहिले पुष्प गुंफताना आपले मनोगत दिलखुलासपणे व्यक्त केले. सरकारदरबारी आतापर्यंत स्त्री किंवा पुरूष अशीच नोंद केली जात असे. परंतु आता तृतीयपंथीय अशी वेगळी नोंद होते. मतदानाचा हक्कही आम्हाला मिळाला आहे. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2014 साली दिला. परंतु महाराष्ट्र सरकारने आजतागायत याची अंमलबजावणी केलेली नाही. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ एकदाही तृतीयपंथीयाला मिळालेला नाही, अशी खंत व्यक्त करीत त्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या सदनिकेत तृतीयपंथीयांना आरक्षण मिळावे अशी मागणी केली.
तृतीयपंथीयांना केवळ भीक मागून आपली उपजीविका करावी लागते. त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार देण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. वारांगनांच्या मुलामुलींसाठी कर्जतजवळ ‘नानी का घर’ म्हणून एक आश्रम मी सुरू केला आहे, त्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केली.
अॅाड आर्टस् चे संचालक उदय पै हे अजातशत्रू
‘जय महाराष्ट्रनगरच्या जडणघडणीत सुभाष देसाईंचा मोलाचा वाटा’ अशा शब्दात ख्यातनाम माध्यमकर्मी उदय पै आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष देसाई यांचा यावेळी गौरव करण्यात आला. ‘अॅ ड आर्टस् संचालक उदय पै हे अजातशत्रू तर आहेतच आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांनाच आपले वाटतात,’ या शब्दात दैनिक मुंबई मित्र/वृत्त मित्रचे समुह संपादक, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी प्रसिद्ध कलावंत उदय पै यांचा गौरव केला. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्यावतीने उदय पै यांना ‘शारदा पुरस्कारा’ने तर जय महाराष्ट्रनगरमधील सामाजिक कार्यकर्ते सुभाष देसाई यांना ‘जय महाराष्ट्र नगर भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. पाच हजार रूपये रोख, सन्मान पत्र व स्मृतिचिन्ह असा हा पुरस्कार आहे. मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या हस्ते उदय पै यांना तर अभिजीत राणे यांच्या हस्ते सुभाष देसाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सुभाष देसाई यांचा जय महाराष्ट्रनगरच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असल्याचे सांगून त्यांना मिळालेला पुरस्कार योग्यच असल्याचे घोसाळकर यावेळी म्हणाले. वसंत व्याख्यानमालेदरम्यान विजय केळुस्कर यांच्या हस्ते विनोद घोसाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
सन्मानपत्राचे लेखन आणि वाचन साहित्यिक विजय मडव यांनी केले. उदय पै आणि सुभाष देसाई यांनी पुरस्काराची रक्कम वसंत व्याख्यानमालेस देणगी म्हणून परत दिली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण सूत्रसंचालन प्रा. नयना रेगे यांनी केले.”
“केएचएल न्यूज ब्युरो