HomeArchiveसरकारी तिजोरीला 61...

सरकारी तिजोरीला 61 कोटींचा गंडा!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
अस्तित्त्वात नसलेल्या किंवा संशयास्पद कंपन्याची बिले किंवा ज्या कंपन्यांनी मुळात खरेदीच केलेली नाही अशा कंपन्यांची बिले सादर करून काही फसव्या निर्यातदार कंपन्या इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC)चा फसवा लाभ मिळवित आहेत असे वस्तू आणि सेवा कर महानिदेशनालयाच्या (DGGI) अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. अशाप्रकारे मिळविलेल्या इनपूट टॅक्स क्रेडिटचा उपयोग निर्यात केलेल्या सामानावरील IGST भरण्यासाठी केला जात असून त्यानंतर त्यावर सूटही मागितली जाते. ज्या मालासाठी कर भरणा केलेला नाही अशा मालावर इनपूट टॅक्स क्रेडीटची सवलत घेणे आणि अशाप्रकारे न भरलेल्या कराचा खोटा दाखला देऊन बनावट इनपूट टॅक्स क्रेडिटवर भरलेला IGSTचा नकद परतावा मागणे या प्रकारामुळे सरकारी तिजोरीला दुप्पट नुकसान होत आहे. अशाप्रकारे परत केलेल्या IGSTची रक्कम साधारणतः 61 कोटींच्या घरात जाते. अशा फसवणूक करणाऱ्या लोकांचा पर्दाफाश लरकारने केला आहे.
 
वस्तू आणि सेवा कर महानिदेशनालयाच्या अधिकाऱ्यांनी अशा निर्यातदार कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्या मालकांची निवासस्थाने तसेच पुरवठादार कंपन्यांच्या परिसरात 06/03/2020 रोजी शोध घेतला. या पुरवठादार कंपन्यांनी न पुरवलेल्या मालाची फक्त बिले निर्यातदारांना दिल्याचे निदर्शनास आले. निर्यातदारांनी ह्या खोट्या बिलांवर इनपूट टॅक्स क्रेडिट घेतले व या मालाची निर्यात केल्याचे दाखवून त्याचा परतावा मागितला. या निर्यातदार कंपन्यांच्या संचालकांना महानिदेशनालयाने (DGGI) 6/3/2020 रोजी ताब्यात घेतले. लुधियाना येथील एका पुरवठादार कंपनीचा मालक मात्र फरार झाला व त्याचा ठावठिकाणा कळला नाही. अनेक वेळा समन्स धाडूनही तो सुनावणीस उपस्थित राहिला नाही. या पुरवठादार कंपनीच्या मालकाचा अशाप्रकारच्या अनेक आर्थिक घोटाळ्यात हात असल्याचे निदर्शनास आले असून तो तसेच त्याच्या कंपनीविरूद्ध अनेकदा आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीही दाखल झाल्या आहेत. त्याला याआधी COFEPOSA खाली प्रतिबंधात्मक अटक झाली आहे.
 
हा गृहस्थ सिमला येथे असून एका प्रख्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत असल्याची खबर मिळाली. सिमला येथे शोध घेण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या एका पथकाने त्याला 07.10.2020 रोजी सिमला येथून ताब्यात घेतले. न्यायालयासमोर त्याला हजर करून 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून तिहार तुरुंगात त्याचा रवानगी केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Continue reading

ऊर्जा प्रकल्पांच्या संरक्षणासाठी इराणमध्ये ‘मानवी साखळी’!

पश्चिम आशियातील युद्ध आता एका निर्णायक आणि भयानक वळणावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर, इराणने आपल्या देशातील वीजनिर्मिती केंद्र आणि पायाभूत सुविधा वाचवण्यासाठी अनोखी शस्त्रास्त्रे वापरण्याऐवजी 'मानवी ढाल' (ह्यूमन शिल्ड) तयार करण्याचा...

खुर्चीची मस्ती डोक्यात जाऊ देऊ नका!

आपल्या रोकठोक आणि निर्भीड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. "सत्ता आज आहे, उद्या नसेल; पण खुर्चीची मस्ती कधीही डोक्यात जाऊ देऊ नका," अशा शब्दांत गडकरींनी नेत्यांना खडेबोल...

‘छोटू गॅस’ सिलिंडरच्या कोट्यात दुप्पट वाढ

देशातील विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या स्थलांतरित मजुरांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५ किलो वजनाच्या 'फ्री ट्रेड एलपीजी' (एफटीएल) सिलिंडरच्या दैनंदिन वाटप कोट्यात सरकारने आता दुप्पट वाढ केली आहे. "छोटू गॅस" म्हणून या सिलिंडरची कष्टकरी...
Skip to content