HomeArchiveसप्टेंबरअखेर दाखल होणार...

सप्टेंबरअखेर दाखल होणार बहुचर्चित राफेल!

Details
सप्टेंबरअखेर दाखल होणार बहुचर्चित राफेल!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
राफेल विमानाची चर्चा जितकी उत्पादन करणाऱ्या फ्रान्समध्ये नसेल झाली तितकी हिंदुस्थानात झाली. वास्तविक पाहता याच्या खरेदीचा करार मनमोहन सिंह सरकार असताना झाला होता. त्यात १२६ विमानं होती. पण त्याची संख्या मर्यादित करून ३६ वर आणली ती मोदी सरकारने. त्यापूर्वी ते फ्रान्सला गेले, नंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी करार केला, ते साल होते २०१६. यापूर्वीचा करार रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच केली होती. तिथून यात महाघोटाळा तोही तीस हजार कोटी रूपयांचा, अशी जी राळ उडवली ती अजूनही उडतेच! काहींच्या मते हा पद्धतशीर कट होता मोदी सरकारला बदनाम करण्याचा. कारण काँग्रेसच्या काळातील करार! त्यातील काही कोणाला मिळणार असेल नसेल पण देशाची जगभरात नाचक्की मात्र भरपूर झाली.

उपलब्ध माहितीनुसार, सप्टेंबर महिनाखेरीस दोन राफेल विमाने भारतीय हवाई दलात सामील होतील, तर उर्वरित ३४ पुढील दोन वर्षांत मिळतील. सध्याच भारतीय हवाई दलाचे काही जण फ्रान्सच्या मार्सेन येथे ‘ऑपरेशन गरूड’मध्ये सहभागी होण्यास गेले होते. तिथेही राफेल उड्डाणाचा अनुभव घेतला. काही दिवसांपूर्वी फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर जिग्लर यांनी भोपाळ येथे एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. ठरल्या वेळेनुसार, विमाने मिळतील असं सांगत मला कोणत्याही विवादाशी देणेघेणे नाही. मी अंतिम परिणाम नि तथ्य याकडे पाहतो. राफेल एक उत्कृष्ट विमान असून भारताने त्याची निवड केली हे आम्हाला सन्मानाचे वाटते. दोन देशातील संरक्षण भागीदारी पुढे न्यायची असून गेल्या ५० वर्षांत जे आम्ही केले ते पाहा. इंडो फ्रेंच तंत्रज्ञान, फ्रान्सचे तंत्र याने भारतीय वायू सेना उड्डाण करीत आहे असं ते म्हणाले.

आपल्या कारकिर्दीत राफेल दाखल व्हावे यासाठी सध्याचे हवाई दल प्रमुख बी. सी. धनोआ प्रयत्नशील आहेत असं म्हणतात. सप्टेंबरअखेर ते सेवेतून निरोप घेतील. त्यांच्यामागे बरेच वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यांनीदेखील राफेल गेमचेंजर ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. २००२ साली ऑपरेशन पराक्रम झालं तेव्हा पाकिस्तानात तितकी तोंड देण्याची क्षमता नव्हती. त्यांनी तंत्र सुधारणा केली. राफेल येण्याने पाक नियंत्रण रेखा किंवा सीमेवर येण्याची हिम्मत दाखवणार नाही. कारगिल युद्धातील शहिदांना त्यांनी मिग 21 ची स्वारी करून मे महिन्यात श्रद्धांजली अर्पण केली. बठींडा येथील भसियाना वायू तळावरून त्यांनी उड्डाण केले. कारगिलचा विसावा विजय दिन २६ जुलै रोजी आहे. अजय अहुजा कारगिलच्या ‘ऑपरेशन सफेद सागर’चे नेतृत्त्व करताना शहीद झाले होते.

शेजारील राष्ट्राच्या विमान क्षमतांची त्यांनी माहिती देत सांगितले की, देशाला आपल्या सुरक्षेसाठी ४२ स्क्वाड्रनची गरज आहे. सध्या फक्त ३१ आहेत. पाकिस्तानकडे सध्या २३ आहेत तर प्रमुख आठ हवाईठाणी आहेत. चीनच्या बळाकडे नजर टाकल्यास त्यांच्याकडे २१०० इतकी जेट नि बॉम्बफेकी विमाने आणि १४ हवाईतळ आहेत, ज्यांना भारतविरोधात वापरता येऊ शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राफेलची तैनाती ही सीमेलगतच्या अंबाला तळावर असल्याने नुकतेच पाकिस्तान्यांनी येथील लढाऊ विमाने हटवा तरच हवाई हद्द खुली करतो असं हास्यास्पद विधान केलं होतं. या अंबाला तळावर जवळपासच्या लागून असलेल्या घरांजवळ स्थानिक कबुतरं पाळत आहेत. त्याचा धोका येथील धावपट्टीवरून उड्डाण किंवा उतरणाऱ्या विमानांना होतोय. यासंदर्भात हवाई अधिकाऱ्यांनी संबंधित पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. गेल्या काही काळात यात वाढ झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भविष्यात राफेल विमानांचा मोठा तळ इथे होणार असल्याने धोका अधिकच वाढलाय.

जून महिन्याच्या अखेरीस जग्वार या लढाऊ विमानाला पक्षाची टक्कर बसल्याने वैमानिकाच्या सावधगिरीने मोठा अपघात होता होता टळला. इंजिनात बिघाड झाल्याने आपत्कालीन स्थितीत ते उतरवले असे सांगितले जात असले तरी पक्षाची धडक असावी ही शंका व्यक्त होतेय. वैमानिकाने तातडीने निर्णय घेत जास्तीची इंधन टाकी नि बॉम्बफेक साहित्य खाली फेकत विमान हलके केल्याने ते सुरक्षितरित्या खाली उतरले. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. या वस्तू नंतर ताब्यात घेण्यात आल्या. सकाळी आठच्या सुमारास सरावासाठी हे उड्डाण केले होतं. या वस्तूंच्या पडण्याने लोकांमध्ये घबराट झाली असली तरी रहिवासी क्षेत्रात मोकळ्या जागेत त्या पडल्या. हे पक्षी बहुधा जोरदार आवाजाला घाबरून विमानावर धडकत असावेत असा अंदाज एका अधिकाऱ्याने व्यक्त केला.

या हवाई तळावर मे २०२० ला एखादे राफेल विमान तैनात होण्याची शक्यता वर्तवत १७ व्या स्क्वाड्रनचा हिस्सा होईल असे सांगितले जाते. अशा तळाजवळ कबुतर पाळण्याची परवानगी देऊ नये असे पालिका प्रशासनाला कळवले आहे. शत्रूकडून नाही तर पक्षी धडकेने कोट्यवधींची विमाने दुर्घटनाग्रस्त होणे जास्त गंभीर मामला आहे. दरम्यान,सुखोई 30 आणि राफेलची ताकद एकत्र आल्यास हवाई दल अधिक घातक होईल. त्यामुळे शत्रूला त्याची चिंता करावी लागेल. व्हॉईस एअर मार्शल आर. के. एस. भादोरीया यांनी फ्रान्सच्या सरावावेळी हे मत व्यक्त केलं. त्यांनी स्वतः राफेल उडवलं आहे. आमचं तंत्र अधिक भेदक असून आम्ही ज्या ताकदीने हल्ला करू ते त्यांना भारी पडेल. त्याने एलओसी पार करण्याची हिंमत होणार नाही. तथापि, पुढील काळात पक्ष्याप्रमाणेच वैमानिकाला, तळावर देखभाल करणाऱ्या कर्मचारी चमुला आपली चूक होणार नाही याची मोठी सावधानता बाळगावी लागेल. कारण, वैमानिकाचा जीव लाख मोलाचा असतोच नि लढाऊ विमानही! आगामी नव्या विमानाला आणि ते घेऊन आसमंतात फिरणाऱ्या चालकाला शुभेच्छा द्यायलाच हव्यात. नाही का? मग म्हणूया, जय हिंद!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content