HomeArchiveसचिन घरोटे ठरला...

सचिन घरोटे ठरला स्वातंत्र्यवीर दौडचा पहिला विजेता!

Details
सचिन घरोटे ठरला स्वातंत्र्यवीर दौडचा पहिला विजेता!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या परिसरातील रविवारची सकाळ भरून गेली होती अबालवृद्ध धावपटूंनी. कारण होते स्वातंत्र्यवीर दौड 2019 च्या पहिल्या पर्वाचे. यात सहभागी होण्यासाठी मुंबईसह नागपूर, पुणे, सातारा, पालघर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतील हजारो स्पर्धक उत्साहाने यात सहभागी झाले. भारतीय सीमेवर शत्रूंशी झुंजणाऱ्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना सहाय्य म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येवर याचे आयोजन करून एक आगळीवेगळी आदरांजली यानिमित्ताने दिली गेली. स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धक तसेच शिवाजी पार्क व परिसरातील नागरिकांचा उत्साह विशेष होता.

या पहिल्या मॅरॅथॉनचा विजेता होण्याचा मान पटकावला सचिन घरोटे याने. स्पर्धेचे विशेष म्हणजे टीम व्हिजन या अंधांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे अंध स्पर्धकदेखील यात सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, विश्वस्त मंजिरी मराठे, राजेंद्र वराडकर, विकास सबनीस तसेच उषा सोमण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पारटकर, नगरसेवक अरविंद भोसले, स्वप्नील सावरकर, अभिनेते श्रीरंग देशमुख, निवेदिका मालविका मराठे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. स्पर्धाप्रमुख विज्ञानेश मासावकर तसेच गुरूरचरणसिंह सिद्धू यांनी संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.

विविध गटांतील पहिल्या तीन विजेत्यांची नावे अशीः 10 किमी – पुरूष – 18 ते 27 वयोगट – संदीप पाल, विनोद सामावडवी, प्रवीण यादव, 28 ते 37 वयोगट – अनिल कोरवी, दीपक बंडपे, किसन लाल, 38 ते 47 वयोगट – तानाजी, नितीन, अरूण. 48 ते 57 वयोगट – पांडुरंग, नागोराव भोयर, निहाल, 58 वर्षांवरील – केशव मोटे, युजीन कॉड्रस, बजरंग चव्हाण, महिला विभाग – 18 ते 27 वयोगट – आरती, शिवानी गुप्ता, प्रमिला, 28 ते 37 वयोगट – मिनाज नादूस, बड्रीयन करवचवाला, देवयानी कदम, 37 ते 48 वयोगट – डॉ. इंदू टंडन, शारदा भोयर, माधवी सुब्रमण्यम, 48 ते 57 वयोगट – अरूधन अल्फोन्स, चित्रा नाडकर्णी, अंजना जंगी, 58 वर्षांवरील – नीता रामकृष्ण व दक्षा गडाविया.
5 किमी – गटातील पहिले चार विजेते – पुरूष विभाग, अॅम्युअल अलिया, मोहन, अविनाश पवार, अक्षय पडवळ, महिला विभाग – रूपा अशोक, सविता यादव, साक्षी राजे, सायरी म्हैसधुसे. 3 किमी – गटातील पहिले तीन विजेते – मुले – सुजीत कामत, पवन पटेल, देवेश हुमरमठेकर – मुली – गायत्री शिंदे, अश्विनी मेकाल, ओशिन दुखंडे.

3 किमी, 5 किमी तसेच 10 किमी अशा तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण अडीच लाख रूपये किंमतीची पारितोषिके दिली गेली तसेच सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रमाणपत्रदेखील देण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने अनेक पातळ्यांवर कार्य करून समाजात विविध माध्यमांतून राष्ट्रभक्ती वृद्धींगत करण्यावर भर दिला जातो. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला तसेच आरोग्य जपण्याचा संदेशदेखील दिला गेला. अशाप्रकारची ही स्पर्धा पहिल्यांदाच होत असून येणा-या काळात त्याचे स्वरूप अधिक व्यापक करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दिली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content