Details
संगीत बारीत लावण्यांचा कलाविष्कार!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लावणी सम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर आणि आकांक्षा कदम, पुष्पा सातारकर या लावण्यवतींच्या बहारदार लावण्यांनी मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या संगीत बारी कार्यक्रमात एकच रंगत आली. रसिक प्रेक्षक यामुळे पुरते घायाळ झाले. लावण्यांची अदाकारी, नजाकत आणि वेगवेगळ्या पठडीतील कलाविष्काराने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
लेखक भूषण कोरगांवकर यांचे तर दिग्दर्शन सावित्री मेधातूल यांचे होते. चंद्रकात लाखे (पेटी), सुनील जावळे (तबला), विनायक जावळे (ढोलकी) तसेच गायिका लताबाई वाईकर आदींचा कलाविष्कारही उपस्थितांना यावेळी अनुभवता आला. भूषण कोरगांवकर आणि सावित्री मेधातूल यांनी तमाशांचे फड धुंडाळून, तिथे राहून लावणी प्रकाराचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचनदेखील उपस्थितांसाठी उपयुक्त ठरले.”
“केएचएल न्यूज ब्युरो