Details
श्री साई मंदिर संकुलात साकारणार ध्यानमंदिर!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
श्री साईबाबा संस्थालन विश्वस्त, व्यवस्था, शिर्डीच्या वतीने मंदिर परिसरातील साई सत्य व्रत हॉलच्या पहिल्या मजल्यावर ध्यानमंदिर बांधकामाचा शुभारंभ संस्थातनचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्वंस्त बिपीन कोल्हे, अॅड. मोहन जयकर, विश्वास्त तथा नगराध्यमक्षा योगिता शेळके, नलिनी हावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, सूर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, उपकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
आजपर्यंत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने अनेक उपक्रम राबविले गेले आहेत. या उपक्रमांमध्ये ध्यानमंदिर उभारणे हा एक अनोखा असा उपक्रम आहे. साईंची शिर्डी नगरी नेहमी गजबजलेली असते. अशा या गजबलेल्या ठिकाणी ज्या साईभक्तांना १० ते १५ मिनिटे ध्यान करायची अशी शांततामय जागा नव्हती. त्याामुळे साईभक्तांकडून अनेक दिवसांपासून ध्यानकेंद्र उभारणीची मागणी होत होती. म्हणूनच समाधीस्थानाला लागूनच असलेल्या परिसरात साईभक्तांच्या ध्यानासाठी ध्यानमंदिर उभारण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. या ध्यानकेंद्रात १२५ साईभक्त ध्यानासाठी बसू शकतील. हे ध्यानकेंद्र साऊंडप्रुफ व वातानुकूलित असेल जेणेकरून त्याठिकाणी शांतता निर्माण होऊन भक्तांना ध्यान करता येईल. यामुळे साईभक्त शिर्डीतून जाताना भक्ती भाव आणि शांतता घेऊन जातील, असे डॉ. हावरे यांनी यावेळी सांगितले.
हे ध्यानमंदिर उभारणीसाठी अंदाजे ४० लाख रूपये खर्च करण्याात येणार असून त्यात २७०० चौ. फुट बांधकाम क्षेत्रपळ व १२५ व्यक्तींची आसनक्षमता असणार आहे. या कामाचे कार्यादेश भानू कन्ट्रक्शषन, मुंबई यांना देण्यात आले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो