HomeArchiveश्री साईबाबांचा पुण्यतिथी...

श्री साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव ७ ऑक्टोबरपासून!

Details
श्री साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव ७ ऑक्टोबरपासून!

    02-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ ते गुरूवार दिनांक १० ऑक्टोबर २०१९ या काळात १०१वा श्री पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सवाच्या मुख्य दिवशी दिनांक ८ ऑक्टोबर रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. साईभक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.
 
 
श्री साईबाबांनी १०० वर्षांपूर्वी दसऱ्याच्यास दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्यादिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानंतर आजतागायत हा पुण्यतिथी उत्सव नव्या उत्साहात साजरा केला जात आहे. विजयादशमी म्हाणजे श्री साईबाबांची पुण्यितिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्त हा उत्स व साजरा करतात. त्यानुसार दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ ते दिनांक १० ऑक्टोबर २०१९ या काळात १०१वा श्री पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत असून उत्सवानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
उत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.१५ वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चिरिताचे अखंड पारायण, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराच्या शेजारील स्टेजवर होणार आहे. सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होणार आहे. रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. उत्सवाचा हा पहिला दिवस असल्यामुळे अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.
 
 
मंगळवार, दिनांक ८ ऑक्टोबर हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे. यादिवशी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ९.०० वाजता भीक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होऊन सकाळी १०.३० वाजता समाधी मंदिरासमोरील मुख दर्शन हॉल स्टेजवर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद तर सायंकाळी ५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन व मिरवणूक कार्यक्रम, सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. उत्सवाचा हा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० यावेळेत श्रींसमोर कलाकारांची हजेरी कार्यक्रम होईल.
 
 
बुधवार, दिनांक ९ ऑक्टोबर उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम होईल. सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल.
 
 
उत्सवाच्या सांगता दिवशी गुरूवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ६.४५ वाजता गुरूस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल.
 
 
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ ते गुरूवार दिनांक १० ऑक्टोबर २०१९ या काळात १०१वा श्री पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सवाच्या मुख्य दिवशी दिनांक ८ ऑक्टोबर रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. साईभक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.”
 
 
श्री साईबाबांनी १०० वर्षांपूर्वी दसऱ्याच्यास दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्यादिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानंतर आजतागायत हा पुण्यतिथी उत्सव नव्या उत्साहात साजरा केला जात आहे. विजयादशमी म्हाणजे श्री साईबाबांची पुण्यितिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्त हा उत्स व साजरा करतात. त्यानुसार दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ ते दिनांक १० ऑक्टोबर २०१९ या काळात १०१वा श्री पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत असून उत्सवानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
“उत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.१५ वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चिरिताचे अखंड पारायण, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराच्या शेजारील स्टेजवर होणार आहे. सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होणार आहे. रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. उत्सवाचा हा पहिला दिवस असल्यामुळे अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.”
 
 
“मंगळवार, दिनांक ८ ऑक्टोबर हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे. यादिवशी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ९.०० वाजता भीक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होऊन सकाळी १०.३० वाजता समाधी मंदिरासमोरील मुख दर्शन हॉल स्टेजवर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद तर सायंकाळी ५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन व मिरवणूक कार्यक्रम, सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. उत्सवाचा हा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० यावेळेत श्रींसमोर कलाकारांची हजेरी कार्यक्रम होईल.”
 
 
“बुधवार, दिनांक ९ ऑक्टोबर उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम होईल. सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल.”
 
 
“उत्सवाच्या सांगता दिवशी गुरूवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ६.४५ वाजता गुरूस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल.”
 
 
“हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.”

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाशिर्डीसमाधी मंदिरदीपक मुगळीकरपुण्यतिथीविजयादशमीपालखीमिरवणूकद्वारकामाई मंदिर

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content